NPCI काय आहे?

National Payments Corporation of India (NPCI) ही Reserve Bank of India (RBI) आणि Indian Banks Association (IBA) यांनी एकत्रित स्थापन केलेली संस्था आहे. भारतातील किरकोळ पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम चालवण्याचे कार्य NPCI संस्थेकडे असते.

स्थापना

NPCI ची स्थापना Payment and Settlement Systems Act, 2007 अंतर्गत 2008 मध्ये झाली आहे. NPCI ही "ना नफा" कंपनी आहे जी Companies Act 2013 च्या 8 व्या विभागात येते. कंपनी चे मुख्यालय मुंबई मध्ये आहे.

उद्दिष्टे

1) NPCI चे मुख्य उद्दिष्ट देशातील सर्व किरकोळ पेमेंट व्यवहारांसाठी देशव्यापी मानक एकसमान आणि व्यवसाय प्रक्रियेमध्ये विविध सेवा स्तरांसह पेमेंटसाठी अनेक प्रणाली एकत्र करणे हे आहे. 2) सर्वांना परवडणारी एक पेमेंट प्रणाली तयार करणे आणि तिचा विकास करणे जेणेकरून दररोज लहान-लहान पेमेंट करणाऱ्या सामान्य माणसाला पैशाची आणि वेळेची बचत करून या प्रणाली चा लाभ घेता येईल. 3) किरकोळ विक्रेत्यांना दैनंदिन आधारावर वापरण्यासाठी परवडणारी देशव्यापी यंत्रणा डिझाइन करणे आणि अमलात आणणे.

एनपीसीआई (NPCI) चा फुल फॉर्म काय आहे?