ANM हा एक मेडिकल कोर्स असून आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला ANM full form in Marathi, त्याचबरोबर ए एन एम कोर्स म्हणजे काय? हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला कुठे नोकरी मिळू शकते, त्याचबरोबर पगार काय असू शकतो इत्यादी माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
ANM full form in Marathi | ए एन एम फुल फॉर्म इन मराठी
ANM म्हणजे Auxiliary Nurse midwifery (ऑक्झिलरी नर्स मिडवायफ्री). मराठी भाषेमध्ये याला सहाय्यक परिचारिका असे संबोधले जाते.
ANM म्हणजे काय? | ANM meaning in Marathi
ANM हा एक मेडिकल कोर्स असून यामध्ये सहाय्यक परिचारिका होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. सहाय्यक परिचारिका म्हणजेच नर्स होय. रुग्णांची काळजी घेणे त्यांना योग्य ती औषधे देणे इत्यादी कामे या डिप्लोमा कोर्सच्या अंतर्गत शिकवली जातात.
लोकांच्या आरोग्य संबंधित सर्व माहिती या कोर्समध्ये तुम्हाला शिकवली जाते. थेरी बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज देखील या कोर्समध्ये दिले जाते.
रुग्णांची काळजी कशी घ्यावी याबरोबरच, इतर अनेक गोष्टी जसे की पेशंटला सलाईन लावणे, इंजेक्शन देणे, हॉस्पिटल मधील इतर इलेक्ट्रॉनिक मशीन सांभाळणे, पेशंटची बीपी, शुगर चेक करणे, प्रत्येक पेशंटचा रेकॉर्ड मेंटेन ठेवणे, इत्यादी अनेक स्वरूपाची कामे या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना शिकवली जातात.
या नर्स कुशल डॉक्टरांसोबत काम करत असतात, डॉक्टरांना हवी असलेली मदत या नर्सद्वारे होत असते त्यामुळे त्यांचे काम देखील फार महत्त्वाचे असते.
ANM कोर्ससाठी पात्रता काय आहे?
कोरोना काळापासून भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये मेडिकल क्षेत्रामधील कामगारांची मागणी खूप जास्त वाढली आहे. संपूर्ण भारतातील अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हा कोर्स शिकवला जातो.
हा कोर्स करण्यासाठी काही किमान पात्रता निकष आम्ही खाली नमूद केलेले आहेत.
- इयत्ता बारावी नंतर तुम्ही या कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ शकता.
- ए एन एम ला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही किमान बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- मान्यताप्राप्त बोर्डाकडून किमान 45% मिळवणे आवश्यक आहे.
ANM प्रवेश प्रक्रिया
भारतातील बऱ्याच विद्यापीठांमध्ये हा कोर्स शिकवला जातो. या कोर्सला ऍडमिशन घेण्याआधी तुम्हाला एक पूर्व परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेचे नाव आहे Maharashtra Nursing CET. ज्यामध्ये उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळतो.
काही विद्यापीठांमध्ये वैयक्तिक मुलाखत व पूर्व परीक्षेद्वारे मेरिट लिस्ट लावली जाते व त्यानुसार विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी प्रवेश घेता येतो.
ANM कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कुठे नोकरी मिळते?
हा एक प्रकारचा सर्वोत्कृष्ट कोर्स असून तुम्हाला 100% नोकरी मिळण्याची खात्री यामध्ये असते. त्याचबरोबर यामध्ये लोकांची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळते, ज्यामुळे समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होते.
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही होम नर्स म्हणून देखील काम करू शकता. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये देखील तुम्ही काम करू शकता. किंवा भारतातील विविध इस्पितळांमध्ये तुम्ही सहाय्यक परिचारिका म्हणून काम पाहू शकता. ANM हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मुख्यतः अर्भक, गरोदर स्त्रिया, आबालवृद्धांची काळजी घेण्याचे काम करता.
ANM झाल्यानंतर किती पगार मिळू शकतो?
विविध हॉस्पिटल्स प्रमाणे विविध पगार तुम्हाला हा कोर्स झाल्यानंतर मिळू शकतो. नोकरीच्या ठिकाणावर देखील हे अवलंबून आहे. तरीसुद्धा तुम्हाला किमान 15,000 रुपये पासून पगार मिळू शकतो.
हा कोर्स झाल्यानंतर तुम्ही पुढील शिक्षण म्हणजेच B. SC Nursing किंवा GNM हा कोर्स देखील करू शकता.
निष्कर्ष –
तर मित्रांनो मला आशा आहे ANM full form in Marathi या लेखात दिलेल्या माहितीवरून तुम्हाला आता ANM या टर्म बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. आम्ही या लेखात ANM meaning in marathi सोबत तुम्हाला पगार किती भेटू शकतो, पात्रता, प्रवेश प्रक्रिया याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. तुम्हाला तरी सुद्धा काही कळले नसेल तर खाली कंमेंट मध्ये नक्की सांगा.