AMPC चा फुल फॉर्म काय आहे, या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी तुम्ही या वेबसाईटवर आला आहात. आजच्या APMC Full Form in Marathi या पोस्टमध्ये आपण APMC बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या लेखात आपण पाहुत की APMC म्हणजे काय, APMC चा इतिहास, APMC चे फायदे आणि अजून बरेच काही आपण या लेखात शिकणार आहोत. त्यामुळे पूर्ण माहिती मिळवण्यासाठी या पोस्टला शेवटपर्यंत वाचावे.
आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. देशातील 70 टक्के पेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात शेतकऱ्यांचा वाटा असतो. शेतकरी प्रत्येक वर्षी त्यांच्या शेतात पीक काढतात व ते विकण्यासाठी जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जातात. या कृषी उत्पन्न बाजार समितीलाच APMC असे म्हणतात. तर चला APMC चा फुल फॉर्म पाहुयात.
APMC Full Form in Marathi | APMC फुल फॉर्म काय आहे?
APMC चा फुल फॉर्म “Agriculture Produce Marketing Committe” असा होतो. APMC ला मराठीत “कृषी उत्पन्न बाजार समिती” असे म्हणतात. कृषी उत्पन्न बाजार समित्या किंवा एपीएमसी, व्यापार बाजारातील मध्यस्थांकडून शेतकऱ्यांचे शोषण दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले आहे.
एपीएमसी (APMC) म्हणजे काय? (APMC Meaning in Marathi)
शेतकर्यांना त्यांच्या मालासाठी योग्य भाव न मिळणे ही आजही समस्या नसून खूप दिवसापासून हे चालू आहे, हे रोखण्यासाठी स्वातंत्र्यानंतर बरेच प्रयत्न झाले, त्यात 1970 च्या दशकात कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली, ज्याला APMC असे म्हणतात. या समितीचा उद्देश शेतकऱ्यांना बाजारातील फसवणूक व शोषणापासून वाचवायचे असा होता. एपीएमसी कायद्याच्या अंमलबजावणीनंतर, कृषी बाजारपेठेत सुव्यवस्था आणण्यासाठी आणि मध्यस्थांच्या हातून शेतकऱ्यांची पिळवणूक रोखण्यासाठी प्रशंसनीय कामगिरी झाली आहे.
बर्याच राज्यांचे स्वतःचे एपीएमसी कायदे असायचे, परंतु केंद्रीय स्तरावर कायदा आल्यानंतर त्याचा खरा उद्देश सफल होऊ शकला नाही कारण वेळ आणि गरजेनुसार एपीएमसी प्रणाली विकसित होऊ शकली नाही, त्यात वाढ झाली. बाजाराची रचना पण सर प्लस कृषी समितीमुळे खरेदी विक्रीत वाढ झाली. APMC चा शेतकऱ्यांना जास्त काही लाभ झाला नाही.
नवीन APMC कायदा
1) शेतकरी आता माल APMC मध्ये न आणता थेट व्यापाऱ्याला विकू शकतात.
2) शेतकऱ्याकडे कोणालाही माल विकण्याचा अधिकार आता आहे.
3) जर शेतकऱ्याने एपीएमसी मार्केटमध्ये माल विकला नाही तर त्याला एपीएमसी निवडणूक लढवण्याची संधी मिळणार नाही आणि एपीएमसी मार्केटिंग कमिटीचा तो भाग राहणार नाही.
4) इतर शेतकरी, निर्यातदार, ग्रेडर, प्रोसेसर, पॅकर आता थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करू शकतात आणि एपीएमसी मार्केटमध्ये जाण्याची गरज नाही.
5) राज्याची मक्तेदारी मोडीत काढली जाईल आणि खाजगी यार्ड चालवण्याचा मार्ग मोकळा होईल.
6) खाजगी यार्डांसाठी परवाने दिले जातील.
7) शेतकर्यांसाठी त्यांच्या मालाचा व्यापार आणि विक्री करण्यासाठी थेट खरेदी केंद्रे असतील
8) अशा बाजारपेठांच्या व्यवस्थापन आणि विकासामध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारीला परवानगी देण्यात आली आहे.
APMC चे फायदे कोणते आहेत?
1) किसान विधेयकांतर्गत शेतकऱ्यांना पीक विकण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
2) शेतकरी बाजाराबाहेर कोठेही आपला माल विकू शकतो.
3) या विधेयकानुसार कोणत्याही शेतकऱ्याला त्याच्या पिकांसाठी सरकारला कोणताही उपकर भरावा लागणार नाही.
4) शेतकरी आणि व्यापारी एकमेकांशी थेट संपर्क साधू शकतील.
निष्कर्ष
आजच्या या पोस्टमध्ये, आम्ही तुम्हाला APMC Full Form in Marathi बद्दल मराठीमध्ये माहिती दिली आहे, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली, तर ही पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच शेअर करा. आणि तुम्हाला एपीएमसीशी संबंधित कोणतेही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला सांगू शकता त्यासाठी खाली कंमेंट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.