नमस्कार मित्रांनो,
ARMY हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर, आपली इंडियन आर्मी अगदी रुबाबदार कपड्यांमध्ये दिसू लागते. आर्मी हा शब्द जरी उच्चारला तरी आपली छाती अभिमानाने फुलून येते. दिवस-रात्र आपले भारतीय जवान आपल्या सीमांचे रक्षण करतात आणि त्यांच्यामुळेच आपण सुखाची झोप घेऊ शकतो. Army मध्ये सेवा देणाऱ्या या जवानांचे आयुष्य खरच खडतर आहे. पण तुम्हाला ARMY या शब्दाचा फुल फॉर्म माहिती आहे का? आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला Army full form in Marathi सांगणार आहोत.
Army full form in Marathi | आर्मी फुल फॉर्म इन मराठी.
ARMY म्हणजेच “Alert Regular Mobility Young”. मराठीमध्ये तुम्ही याला नेहमी दक्ष आणि गतिशील असणारे तरुण असे म्हणू शकता.
Indian Army काय काम करते?
इंडियन आर्मी ही जगातील चौथी सर्वात जास्त पावरफुल आर्मी आहे. भारत सरकार दरवर्षी हजारो करोड रुपये भारतीय सैन्यावर खर्च करते.
भारताच्या सीमांचे रक्षण करणे हे इंडियन आर्मी चे प्रमुख कर्तव्य आहे. याचबरोबर देशातील आपत्ती व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती आल्यावर मदत करणे हे देखील भारतीय सैन्याचे कर्तव्य आहे.
INDIAN ARMY च्या किती शाखा आहेत?
इंडियन आर्मी मध्ये महत्वाचे तीन प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे :-
1) भूदल: 15 ऑगस्ट 1947 रोजी भूदलाची स्थापना करण्यात आली. भूदल हे भारतीय लष्कराचं सर्वात मोठा घटक आहे. यामध्ये 13 लाख 25 हजार ॲक्टिव्ह सैनिक असून 11 लाखांपेक्षा अधिक राखीव सैनिक आहेत. भारताचे राष्ट्रपती हे तिन्ही शाखांचे प्रमुख सेनापती असतात.
2) वायुदल: 26 जानेवारी 1950 रोजी, वायुसेनेची स्थापना करण्यात आली. आजच्या घडीला जवळपास १ लाख ७५ हजार सैनिक हे वायुसेनेमध्ये कार्यरत आहेत. तर राखीव सैनिकांची संख्या १ लाख ४० हजार आहे. कोणत्याही युद्धाची दिशा बदलण्याची ताकद वायुदलत असते.
3) नौदल: देशाच्या समुद्र सीमांचे रक्षण करण्यासाठी भारतीय नौसेनेची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली. आजच्या घडीला नौसेनेमध्ये 64,००० ऍक्टिव्ह सैनिक असून 50,००० राखीव सैन्यदल कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते.
INDIAN ARMY मध्ये किती रुपये पगार मिळतो?
इंडियन आर्मी मध्ये तुम्ही सिलेक्ट झाल्यावर तुमचा पगार 21 हजार 700 ते 2 लाख 50 हजाराच्या मध्ये असू शकतो. याव्यतिरिक्त भारतीय सरकारतर्फे बऱ्याच प्रकारचे भत्ते जवानांना देण्यात येतात. जसे की मेडिक्लेम, कॅन्टीन सुविधा, जवानांच्या मुलांचे शिक्षण, राहण्याची सुविधा इत्यादी बऱ्याच प्रकारच्या सुविधा जवानांना पुरवल्या जातात. एवढेच नाही तर रिटायर झाल्यानंतर देखील मरेपर्यंत पेन्शन सुविधा जवानांना पुरवली जाते.
धन्यवाद