BCA full form in Marathi | बीसीए फुल फॉर्म इन मराठी

इयत्ता बारावी झाल्यानंतर, पुढे काय करायचे हा प्रश्न सर्वांनाच पडतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना Computer आणि Technology मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही इयत्ता बारावी नंतर पुढील शिक्षण घेऊ शकता. यासाठी बरेचसे कोर्स आज उपलब्ध आहेत.

BCA हा कोर्स करून देखील तुम्ही चांगले करिअर घडवू शकता. BCA हे नाव तुम्ही बऱ्याच वेळा ऐकले असेल, परंतु BCA चा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का? आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला BCA full form in Marathi याबरोबरच BCA म्हणजे काय? BCA कोर्सचा कालावधी व BCA बद्दल इतर सर्व माहिती सांगणार आहोत.

बीसीए फुल फॉर्म इन मराठी | BCA full form in Marathi

BCA म्हणजे “Bachelor of Computer applications” (बॅचलर ऑफ कम्प्युटर आपलिकेशन्स) होय. मराठीमध्ये आपण याला संगणक ॲप्लिकेशन्स मध्ये पदवीधर असे म्हणू शकतो.

BCA म्हणजे काय?

BCA म्हणजे बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन्स. ज्या विद्यार्थ्यांना संगणक आणि माहिती तंत्रज्ञान या विषयांमध्ये रस असेल असे विद्यार्थी या कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ शकतात. BCA हा तीन वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स असून यामध्ये विद्यार्थ्यांना संगणकातील अनुप्रयोगांबद्दल शिकवण्यात येते. यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे सॉफ्टवेअर डेव्हलप करणे, वेबसाईट बनवणे, डेटाबेस व्यवस्थापित करणे, विश्लेषण प्रणाली याबद्दल शिकवण्यात येते.

तीन वर्षांचा हा पदवी अभ्यासक्रम असून, यामध्ये संगणकाशी संबंधित असलेल्या गोष्टी शिकवण्यात येतात या मध्ये कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, प्रोग्रामिंग लँग्वेजेस, कंप्यूटर एप्लीकेशन बद्दल माहिती शिकवण्यात येते.

BCA साठी पात्रता निकष

  • इयत्ता बारावी नंतर तुम्ही बीसीए साठी प्रवेश घेऊ शकता.
  • इयत्ता बारावी मध्ये तुम्हाला कोणत्याही स्ट्रीम मधून किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • काही कॉलेजेस मध्ये यासाठी प्रवेश परीक्षा देखील घेतली जाते. तुमच्या प्रवेश परीक्षेतील गुणांनुसार किंवा बारावीतील गुणवत्तेनुसार तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते.

BCA कोर्स चा कालावधी

BCA हा एक पदवी कोर्स असून, या कोर्सचा कालावधी तीन वर्षांचा आहे. प्रत्येक वर्षाला दोन सेमिस्टर असतात. अशाप्रकारे सहा सेमिस्टर संपूर्ण कोर्समध्ये आहेत. प्रत्येक सेमिस्टर नुसार तुमची परीक्षा घेतली जाते.

BCA विषय/ अभ्यासक्रम

मॅथेमॅटिक्स फाउंडेशन: पहिल्या सेमिस्टर मध्ये तुम्हाला बेसिक मॅथेमॅटिक्स शिकवले जाते. जर तुम्ही गणितामध्ये कच्चे असाल तर तुम्ही उत्तम कोडर किंवा प्रोग्रामर बनण्याची शक्यता कमी असते.

ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग: ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला कम्प्युटर साठी लागणाऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकवल्या जातात.

C प्रोग्रामिंग: सी प्रोग्रामिंग ही लँग्वेज अत्यंत मूलभूत मानली जाते. ऑपरेटिंग सिस्टम लिहिताना ही भाषा मुख्यतः वापरली जाते यामुळे संगणकीय सिद्धांत समजून घेण्यास मदत होते.

याबरोबरच वेब डेव्हलपमेंट, AI, ई-कॉमर्स, क्लाऊड मॅनेजमेंट, कॉम्प्युटर ग्राफिक्स, फंडामेंटल ऑफ कम्प्युटर्स, ऑपरेटिंग सिस्टिम , इत्यादी विषय तुम्हाला शिकवले जातात.

BCA कोर्स नंतर पुढे काय करू शकता?

BCA कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही खाजगी किंवा सरकारी कंपनीमध्ये देखील काम करू शकता. जर तुम्हाला नोकरी करायची नसेल तर तुम्ही याच क्षेत्रातील पुढील शिक्षण देखील घेऊ शकता. MCA म्हणजेच मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन हा दोन वर्षांचा पदव्युत्तर कोर्स देखील तुम्ही करू शकता.

धन्यवाद

Leave a Comment