CA Full Form in Marathi काय आहे, आपल्याला माहिती आहे का? हे नाव आपण अनेकवेळा ऐकले असेल, पण आजही अशी अनेक नावे आहेत जी आपल्याला फक्त त्यांच्या लहान स्वरूपातच (Short Form) माहित आहेत आणि आपल्यापैकी बहुतेकांना पूर्ण रूप माहित नाही आणि CA सुद्धा असेच एक नाव आहे.
आजच्या पोस्ट मध्ये आपण CA Full Form in Marathi काय आहे हे जाणून घेणार आहोत.
सीए (CA) चा फुल फॉर्म | CA Full Form in Marathi
सीए (CA) चा फुल फॉर्म “Chartered Accountant” असा आहे आणि मराठीमध्ये CA ला “सनदी लेखापाल” असे म्हणतात. CA चे काम खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील कर आकारणीशी संबंधित आहे.
सीए (CA) म्हणजे काय – What is CA in Marathi
सीए हा अत्यंत प्रतिष्ठित पदवी अभ्यासक्रम म्हणून ओळखला जातो. सीए कोर्समध्ये विद्यार्थ्यांना अकाउंट, बिझनेस आणि टॅक्स शिकवले जाते. यासोबतच गुंतवणुकीच्या नोंदी ठेवणे, टॅक्स रिटर्न सबमिट करणे, आर्थिक कागदपत्रे तयार करणे आणि इतर कोणतीही आर्थिक कामे करणे यासंबंधीचा अभ्यास या कोर्समध्ये शिकवला जातो.
CA (CA Full Form in Marathi) कोणत्याही कंपनीला किंवा व्यक्तीला व्यवसायाशी संबंधित सल्ला देण्यास पात्र असतो. एखाद्या मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी सीएला सहज मिळू शकते. चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्सचा किमान कालावधी दहावीनंतर 4.5 वर्षे आहे (म्हणजे सीपीटी मार्गाने सामील होणाऱ्या व्यक्तींसाठी).
ग्रॅज्युएशनमध्ये सामील झालेल्या व्यक्तीसाठी चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्सचा किमान कालावधी (म्हणजे थेट प्रवेश योजनेद्वारे) 3 वर्षे आहे. चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी 3 स्तरीय प्रशिक्षण पूर्ण करावे लागते जे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) द्वारे केले जाते. तीनही स्तरांचा अभ्यास पूर्ण केल्यानंतरच तुम्ही सीए बनू शकाल.
सीए (CA) कसे बनावे – How to Become CA?
जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणीतरी शाळेत असाल आणि त्यांना CA व्हायचे असेल तर 10 वी नंतर कोणता विषय घ्यायचा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण चार्टर्ड अकाउंटंट हा अकाऊंट आणि बिझनेसशी निगडीत कोर्स आहे, त्यामुळे दहावी नंतर कॉमर्स घेतलेले बरे. सायन्स किंवा आर्ट्सचे विद्यार्थी सुद्धा सीए होऊ शकतात. परंतु कॉमर्स घेतल्याने सीए प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणे आणि पुढील अभ्यास पूर्ण करणे सोपे होते.
सीए होण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला 3 प्रकारच्या परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात, तरच तो चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकतो. या तीन सीए परीक्षा खाली दिल्या आहेत.
- CPT [Common Proficiency Test]
- IPCC [Integrated Professional Competence Course]
- Final [Course]
सीए (CA) बनण्यासाठी पात्रता – Eligibility Criteria for CA
- सीए बनण्यासाठी CPT हि प्रवेश परीक्षा घेतली जाते. दहावीनंतर विद्यार्थी परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात, परंतु परीक्षा देण्यासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- वाणिज्य, कला किंवा विज्ञान या तीनपैकी कोणत्याही शाखेतील विद्यार्थी CPT परीक्षा देण्यासाठी अर्ज करू शकतात.
- वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी 12 वीमध्ये किमान 50% गुण घेणे आवश्यक आहे, तरच ते प्रवेश परीक्षा देऊ शकतील.
- तर दुसऱ्या शाखेतील विद्यार्थ्यांना 12 वी बोर्ड परीक्षेत गणिताशिवाय 55% आणि गणितासह 60% गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतरच ते CPT परीक्षा देऊ शकतात.
- CPT परीक्षा उत्तीर्ण करणारे विद्यार्थी Institute of Chartered Accountants of India (ICAI) चे सदस्य बनतात. ICAI भारतात CA परीक्षा आणि अभ्यासक्रम आयोजित करते.
सीए (CA) ची कार्ये – Work of CA
एखाद्या कंपनीतील CA चे मुख्य कार्य म्हणजे फायनान्सशी संबंधित व्यावसायिक सल्ला देणे. CA हा वित्त आणि व्यवसाय क्षेत्रातील तज्ञ असतो. सीएद्वारे कंपनीत केल्या जाणाऱ्या काही महत्त्वाच्या कामांची नावे खालीलप्रमाणे –
- Accounts लिहिणे, आर्थिक विवरण (Financial Statements) तयार करणे.
- व्यक्ती/संस्थांची Financial Statements ची तपासणी करणे.
- नियमांच्या आधारे ते निश्चित करणे.
- साधे ते जटिल आर्थिक विश्लेषण करणे.
- कर आकारणी आणि ग्राहकांना कर संबंधित सल्ला देणे.
- उत्पादन आणि प्रक्रियांशी संबंधित खर्च निश्चित करणे.
निष्कर्ष –
आजची CA Full Form in Marathi हि पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मला आशा आहे की ही पोस्ट वाचून तुम्हाला सीए म्हणजे काय, सीए कसे बनायचे, सीए होण्यासाठी पात्रता काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली असतील.
जर तुम्हाला CA Full Form in Marathi हा लेख आवडला असेल, तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि तुम्हाला या पोस्टबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा. धन्यवाद!