सीएए चे फुल फॉर्म काय आहे? । CAA Full form in Marathi
CAA कायदा जेव्हा संसदेमध्ये पारित करण्यात आला होता तेव्हा या कायद्याचा खूप विरोध करण्यात आला होता, कारण या मध्ये मुस्लिम धर्मीय लोकांना वगळण्यात आले होते. पण आपल्या भारतीय सरकारने असे का केले होते? तसेच या कायद्यानुसार कोणाला सर्वात जास्त फायदा झाला आणि CAA full form in Marathi नक्की काय आहे, असे खूप सारे प्रश्न सर्वांच्या समोर आहेत, आणि त्याच सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयन्त मी आजच्या या लेखात करणार आहे, त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा.
तर चला मग जाणून घेऊया
CAA आहे काय? । What is CAA in Marathi
CAA म्हणजे “Citizenship Amendment Act” ज्याला मराठीमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा असे म्हटले जाते. हा कायदा केंद्र सरकारने 2019 मध्ये पारित केला होता.
हा एक असा कायदा आहे ज्यामुळे कोणाचं नागरिकत्व हिरावून घेतलं जात नाही तर या कायद्यामुळे भारतीय नागरिकत्वासाठी जे योग्य आहेत त्यांना नागरिकत्व दिले जाते. या कायद्यानुसार जे कोणी शरणार्थी आहेत जे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशातून ३ १ डिसेंबर 2014 ला किंव्हा यापूर्वी भारतामध्ये आले होते, त्यामधील योग्य नागरिकांना भारताचे नागरिकत्व भेटते. पण या कायद्यानुसार, भारतामध्ये त्याच लोकांना नागरिकत्व मिळते ज्यांना वरील तीन देशांमध्ये धार्मिक छळाचा सामना करावा लागला होता आणि त्याच कारणामुळे ते भारतामध्ये आले होते.
या कायद्याचा मुख्य उद्देश पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश मधून आलेले हिंदू, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध आणि पारसी या धर्मातील निर्वासितांना भारतामध्ये नागरिकत्व मिळवून देणे. या कायद्यामध्ये मुस्लिम समाजातील लोकांना सामील केलेले नाही आहे. त्यामुळे सर्वात जास्त विरोध हा विरोधी पक्षाने केला होता. पण या गोष्टीचं स्पष्टीकरण देताना भारतीय सरकार असे म्हटले आहे कि या वरील तीन देशांमध्ये मुस्लिम हे मेजॉरिटी मध्ये येतात आणि अल्प सख्यांक मध्ये मोडत नाहीत, त्यामुळे मुस्लिम धर्मीय लोकांना त्या देशांमध्ये राहताना कोणत्याही प्रकारचा धार्मिक छळ सहन करावा लागत नाही आहे. आणि म्हणूनच या कायद्यामध्ये मुस्लिम धर्मीय लोकांचा समावेश केला गेला नाही आहे.
CAA कायदा काम कसं करतो?
CAA कायदा त्या नागरिकांना स्वतःहून नागरिकत्व देत नाही, फक्त तो त्या नागरिकांना भारताच्या नागरिकत्वाची अर्ज करण्यासाठी योग्य बनवते. याचाच अर्थ असा आहे त्यांना या गोष्टीचा पुरावा द्यावा लागेल की ते भारतामध्ये पाच किंवा पाच वर्षाहून अधिक काळ राहिले गेले आहेत, सोबत त्यांना या गोष्टीचा देखील पुरावा द्यावा लागतो की त्यांना त्यांच्या देशांमध्ये धार्मिक छळ झाला होता. एकदा का त्यांनी नागरिकत्वाचे अर्ज केले की हे पूर्णपणे भारत सरकारच्या हातामध्ये आहे की त्यांना भारताचे नागरिकत्व द्यायचे की नाही.
यापूर्वीच्या कायद्यानुसार भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारत देशामध्ये कमीत कमी 11 वर्षे राहणे आवश्यक होते, पण आता जो कायद्यात दुरुस्ती करण्यात आलेली आहे त्यानुसार ही अट सहा वर्ष करण्यात आलेली आहे, याचमुळे धार्मिक अल्पसंख्यांक लोक जे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान मधून येऊन भारतामध्ये स्थायिक झालेले आहेत त्यांना आता भारतीय नागरिकत्व घेणे सोपे होईल.
FAQ
Q . CAA कायद्याचं भारतीय नागरिकांना फायदा होईल का?
CAA कायद्यामुळे भारतीय नागरिकांना कोणताही फायदा होणार नाही आहे, फक्त पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशातून आलेल्या लोकांना भारतीय नागरिकत्व भेटणे सोपे होऊन जाईल.
Q . CAA साठी अर्ज नोंदणी कशी करावी?
ज्या लोकांना भारताचे नागरिकत्व पाहिजे त्यांना CAA Portal वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल, यामध्ये ऑफलाइन पद्धतीने कोणत्याही प्रकारचा अर्ज केला जात नाही आहे, भारतीय सरकार लवकरच CAA संबंधी एक नवीन एप्लीकेशन देखील सुरू करणार आहे.
Q. CAA कायदा लागू कधी झाला?
नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा 11 डिसेंबर 2019 पासून लागू झालेला आहे
तर मित्रांनो CAA Full form in Marathi या लेखात दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला आता CAA कायदा काय आहे आणि त्यामुळे कोणाला सर्वात जास्त फायदा झाला आहे हे समजले असेल, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंबंधी तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट मध्ये नक्की विचारा.