CCTV full form in Marathi | सीसीटीव्ही फुल फॉर्म इन मराठी
CCTV हा शब्द दैनंदिन जीवनात आपण कितीतरी वेळा ऐकतो, वाचतो आणि वापरतो ही. CCTV चा शोध लागल्यापासून गुन्हेगारीवर आळा घालने अगदीच सोपे झाले आहे. CCTV च्या भीतीने चोर देखील चोरी करण्यास घाबरतात.
मानवाचा तिसरा डोळा म्हणून हा सीसीटीव्ही काम करतो. एखाद्या गरजेच्या ठिकाणी जर हा सीसीटीव्ही लावला तर घरबसल्या आपण तेथील जागेवर निगराणी ठेवू शकतो. अशा मुळे आपला अमूल्य वेळ देखील वाचतो.
परंतु या CCTV चा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का? त्याचबरोबर CCTV बद्दल तर अनेक माहिती आम्ही या आर्टिकल मध्ये तुम्हाला सांगणार आहोत.
सीसीटीव्ही फुल फॉर्म इन मराठी | CCTV full form in Marathi
CCTV म्हणजे “Closed Circuit Television (क्लोज सर्किट टेलिव्हिजन)” मराठी भाषेमध्ये याला आपण “बंद सर्किट दूरदर्शन” असे म्हणू शकतो.
CCTV म्हणजे काय?
CCTV हा एक प्रकारचा कॅमेरा असून जो सतत रेकॉडिंग करत असतो. रस्त्यावर येता जाताना मोठमोठी दुकाने, महाविद्यालय, ज्वेलर्स, रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, इत्यादी बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्हीचा वापर केला जातो.
ज्या भागातील हालचालींवर तुम्हाला लक्ष ठेवायचे आहे, अशा ठिकाणी हा सीसीटीव्ही लावला जातो. सीसीटीव्ही हा व्हिडिओ स्वरूपात तेथील सर्व हालचाली आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतो व त्याच्या मेमरी मध्ये स्टोअर करून ठेवतो. असे केल्यामुळे कोणत्या वेळेस कोण आले गेले, किंवा जर काही अनैतिक प्रकार घडला तर नेमकं काय घडलं हे आपण CCTV च्या माध्यमातून नंतर बघू शकतो.
CCTV च्या वापरामुळे चोरीचे प्रमाण फार कमी झालेले आहे. त्याचबरोबर पोलीस विभागालाही सीसीटीव्हीमुळे क्रिमिनल केसेस चा शोध लावणे सोपे झाले आहे. तरीसुद्धा बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की सीसीटीव्ही मध्ये देखील खूप प्रकार आहेत. योग्य जागा व वातावरणानुसार योग्य सीसीटीव्ही निवडणे फार महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर सीसीटीव्ही नेमका कशासाठी तुम्ही लावत आहात हे पाहणे देखील गरजेचे असते.
CCTV चे काही प्रकार :-
- घुमट कॅमेरा
- बुलेट कॅमेरा
- सी माउंट कॅमेरा
- दिवस-रात्र vision कॅमेरा
- PTZ कॅमेरा
गडद लढाऊ तंत्रज्ञान असलेले कॅमेरे :-
अतिशय कमी प्रकाशात रंगीत छायाचित्र घेण्याची क्षमता या कॅमेरा मध्ये असते. दिवसा आणि रात्री देखील या कॅमेऱ्याचा उपयोग केला जाऊ शकतो. चेहरा ओळख,ऑडिओ, लाईन क्रॉसिंग ही या फाइटर कॅमेऱ्याची वैशिष्ट्ये आहेत.
अंतर्गत आणि बाह्य घुमट आकाराचे कॅमेरा :-
हा कॅमेरा तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिला असेल. इंडोर किंवा आउटडोर सुरक्षितता राखण्यासाठी या डोम कॅमेऱ्यांचा उपयोग केला जातो. याला अशाप्रकारे बनवण्यात आलेले आहे की सर्वसामान्य लोकांना याचे तोंड कुठे आहे हे समजत नाही. गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक असे कॅमेरे बघून विचलित होतात. त्याचबरोबर या तोडफोड करणे देखील जवळपास अशक्य आहे.
बुलेट कॅमेरा :-
लांब आणि दंडगोलाकार आकाराचे असल्यामुळे यांना बुलेट कॅमेरा असे म्हटले जाते. बुलेट कॅमेरे जास्त करून संरक्षण खात्याद्वारे वापरले जातात. ज्यांना दूरवर निगराणी ठेवायची आहे अशा ठिकाणी हे कॅमेरे लावले जातात.
या कॅमेऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे रात्रीच्या वेळी देखील उत्तम छायाचित्र रेकॉर्ड करू शकतात. त्याचबरोबर धूळ, घाण माती,ऊन,वारा, पाणी इत्यादी घटकांचा या कॅमेरावर प्रभाव पडत नाही.
धन्यवाद