CEO फुल फॉर्म इन मराठी | CEO full form in Marathi

भारतीय वंशाचे असलेले सुंदर पीचाई हे गुगलचे CEO आहेत, आणि वर्षाला त्यांना जवळपास दोन हजार कोटी रुपये पगार आहे अशी बातमी मागच्या वेळेस खूपच व्हायरल झाली होती. परंतु मित्रांनो तुम्हाला सीईओ म्हणजे काय हे नेमकं माहिती आहे का? त्याचबरोबर CEO चा फुल फॉर्म काय आहे याचा विचार कधी तुम्ही केला आहे का?

आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला सीईओ फुल फॉर्म इन मराठी (CEO full form in Marathi) सांगणार आहोत. एवढेच नाही तर, CEO चा पगार किती असतो? CEO काय काम करतो? इत्यादी माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा.

CEO full form in Marathi | सीईओ फुल फॉर्म 

CEO म्हणजे Chief Executive Officer, सीईओ ला मराठी मध्ये “मुख्य कार्यकारी अधिकारी” असे म्हटले जाते.

CEO म्हणजे काय?

अगदी नावाप्रमाणेच तुम्हाला समजले असेल सीईओ हा एखाद्या कंपनीचा किंवा संस्थेचा मुख्य अधिकारी असतो. कंपनीचे व्यवस्थापन आणि इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी हा सीईओ पाहत असतो.

कंपनीचे उच्चपद म्हणजे सीईओ चे पद असते. कंपनीचे संपूर्ण कामकाज आणि व्यवस्थापन बघण्यासाठी सीईओ हा नेहमी कार्यरत आणि सक्षम असतो. आपल्या कंपनीचे ए टू झेड नॉलेज सीईओ ला असते. कंपनीला कसा जास्तीत जास्त फायदा मिळवून देता येईल याचा विचार सीईओ करत असतो.

CEO कसे बनले जाते?

मित्रांनो सीईओ होणे एवढे देखील सोपे नाही. कोणती डिग्री घेऊन तुम्हाला सीईओ होता येत नाही. यासाठी तुम्हाला अथक परिश्रम आणि मेहनत घ्यावी लागते. तुमचा अनुभव देखील सीईओ या पदासाठी बघितला जातो. तुमची निर्णय घेण्याची क्षमता, कंपनी बद्दल असलेले तुमचे ज्ञान विचारात घेतले जाते. तुम्ही किती सक्षमरीत्या निर्णय घेऊ शकता हे देखील पाहिले जाते. बिझनेस नेटवर्किंग बद्दल तुमच्याकडे ज्ञान असणे गरजेचे आहे.

कंपनीचे संचालक मंडळ सीईओ पदासाठी एकमत देऊन सीईओ निवडतात. बऱ्याच सीईओज कडे MBA degree असते. सीईओ बनण्यासाठी तुम्हाला अनेक वर्ष कंपनीसाठी काम करावे लागते.

CEO काय काम करतो?

  1. आपल्या कंपनी बद्दलचे सगळे महत्वाचे निर्णय हा सीईओ घेत असतो.
  2. आपल्या व्यापारामध्ये कोणत्याही प्रकारची मोठी समस्या आल्यास, ती समस्या सोडवण्यासाठी कंपनीच्या कामांमध्ये योग्य तो बदल हा सीईओ करत असतो.
  3. कंपनीचे गोल्स अचिव करण्यासाठी योग्य ती प्लॅनिंग सीईओ करत असतो.
  4. कंपनीचे उत्पादन, जाहिरात, वितरण आणि उत्पादनाची गुणवत्ता यावर सीईओ निरीक्षण ठेवतो.
  5. सीईओ च्या हाताखाली असणाऱ्या सर्वांना जबाबदाऱ्या सोपवण्याचे काम देखील सीईओ करतो.
  6. कंपनीचे भांडवल योग्य ठिकाणी गुंतवणे व कंपनीला जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचं काम CEO करतो.

निष्कर्ष

आता आपल्याला CEO चा फुल फॉर्म मराठीत काय होतो (CEO Full Form in Marathi) हे कळले असेलच. सोबतच आपण CEO बद्दल अधिक माहिती जसे CEO कसे बनले जाते, CEO काय काम करतो याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली. तरी सुद्धा तुम्हाला CEO या टर्म संबंधी काही शंका असेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment