CET full form in Marathi | सीईटी फुल फॉर्म इन मराठी.

बारावीनंतर आपल्याला जर मेडिकल किंवा इंजीनियरिंग कॉलेज साठी प्रवेश घ्यायचा असेल तर CET ही परीक्षा द्यावी लागते हे आपण सर्वांनी ऐकले असेल. परंतु सीईटी चा फुल फॉर्म जाणून घ्यायचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? CET म्हणजे काय? त्याचबरोबर CET परीक्षा कशा प्रकारे होते? याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

CET full form in Marathi | सीईटी फुल फॉर्म इन मराठी

CET म्हणजेच Common Entrance Test. मराठी भाषेमध्ये याला “सामान्य प्रवेश परीक्षा” असे म्हटले जाते.

CET म्हणजे काय?

CET म्हणजे Common Entrance Test. जे विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छितात त्या सर्वांना सीईटी ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेच्या गुणांवर तुम्हाला महाविद्यालयात प्रवेश दिला जातो.

ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी नंतर मेडिकल कॉलेज किंवा इंजीनियरिंग कॉलेज साठी प्रवेश हवा आहे. अशा विद्यार्थ्यांना CET ही परीक्षा द्यावी लागते. नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी (NRA) ही संस्था देशामध्ये सीईटी परीक्षा घेत असते.

CET ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुमच्या गुणांनुसार तुम्हाला कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे हे समजते. तुमची पदवी झाल्यानंतर जर तुम्हाला मास्टर्स डिग्री करायची असेल तरी तुम्हाला सीईटी ही परीक्षा देणे अनिवार्य आहे.

CET परीक्षा कशा प्रकारे होते?

CET ही परीक्षा पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते. या परीक्षेसाठी मुख्यतः चार विषयांचा अभ्यास करावा लागतो. ज्यामध्ये गणित, इंग्रजी, समाजशास्त्र आणि विज्ञान विषयाचा समावेश आहे.

  • पेपरचा कालावधी :- 2 तास
  • एकूण गुण – 100

या परीक्षेमध्ये तुम्हाला MCQ टाईप चे प्रश्न विचारले जातात . ज्यामध्ये एका प्रश्नासाठी तुम्हाला चार ऑप्शन्स दिले जातात. त्यातील एक बरोबर पर्याय तुम्हाला निवडावा लागतो.

MHT CET म्हणजे काय?

MHT CET meaning in Marathi?

MHT CET म्हणजे महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट होय. ही परीक्षा महाराष्ट्र सरकार तर्फे घेतली जाते. जे विद्यार्थी बारावी सायन्स मधून उत्तीर्ण झालेले आहेत व ज्यांना पुढे मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज साठी प्रवेश घ्यायचा आहे अशांना ही परीक्षा देणे अनिवार्य आहे.

मेडिकल कॉलेज साठी वेगळे विषय तर इंजीनियरिंग साठी वेगळ्या विषयांचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. यात कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नसते.

राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या काही इतर CET परीक्षा :-

  1. Joint Entrance Examination (JEE) । संयुक्त प्रवेश परीक्षा
  2. National Eligibility cum Entrance Test (NEET) । राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा
  3. NATA | नॅशनल एप्टीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर
  4. Common Management Admission Test (CMAT) । सामान्य व्यवस्थापन प्रवेश परीक्षा
  5. Common Law Admission Test (CLAT) । सामान्य कायदा प्रवेश परीक्षा.

Leave a Comment