CID full form in Marathi | सीआयडी फुल फॉर्म इन मराठी

CID full form in Marathi | सीआयडी फुल फॉर्म इन मराठी

आपण सर्वांनीच कधी ना कधी CID या मालिकेचा एपिसोड बघितला असेल. CID ऑफिसर्स किती चलाकिने एखाद्या केसचा शोध लावतात हे आपण सगळ्यांनी या मालिकेमध्ये बघितलेलं आहे. या मालिकेमध्ये दाखवल्या गेलेल्या धडाकेबाज CID ऑफिसर्स मुळे ही मालिका संपूर्ण देशभरात अल्पावधीतच हिट झाली.

परंतु मित्रांनो तुम्हाला CID चा फुल फॉर्म माहिती आहे का? खऱ्या आयुष्यातले सीआयडी ऑफिसर्स नक्की कसे असतात. CID काय काम करते? CID साठी कोणती परीक्षा द्यावी लागते? इत्यादी माहिती आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.

सीआयडी फुल फॉर्म इन मराठी | CID full form in Marathi

CID म्हणजेच “Crime Investigation Department” मराठी भाषेमध्ये याला “गुन्हे अन्वेषण विभाग” असे म्हटले जाते.

CID म्हणजे काय?

Crime investigation department म्हणजेच सीआयडी होय. सीआयडी चा जन्म हा फार जुना आहे. 1902 साली ब्रिटिश राजवटीमध्ये CID ची स्थापना करण्यात आली. देशामध्ये कायदा व सुव्यवस्था टिकवणे हा याचा मुख्य उद्देश होता.

आपल्या महाराष्ट्रातील पुणे येथे सीआयडी चे मुख्यालय आहे. CID हे असं विभाग आहे जिथे गुन्ह्यांची पडताळणी अगदी गुप्त पद्धतीने होते. पोलिसांसारखा किंवा आर्मी सारखा सीआयडी ऑफिसर्सला कोणताही स्पेशल युनिफॉर्म नसतो, ते सिव्हिल युनिफॉर्म मध्येच मोठ मोठ्या गुन्हेगारांना पकडतात.

डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हे सीआयडी खात्याचे प्रमुख अधिकारी मानले जातात. राज्यातले मोठमोठे गुन्हे किंवा अति संवेदनशील गुन्ह्यांचा तपास सीआयडी विभागाकडे सोपवला जातो. दहशतवाद्यांना पकडण्याचे काम देखील सीआयडी ऑफिसर्स करू शकतात. सीआयडी ऑफिसर्स सामान्य कपड्यांमध्ये असल्यामुळे कोणीही सहजासहजी त्यांना ओळखू शकत नाही. CID हे राज्य सरकारच्या अंतर्गत काम करते.

CID ऑफिसर होण्यासाठीची पात्रता

  • सीआयडी ऑफिसर बनण्यासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असणे अनिवार्य आहे.
  • उमेदवाराचे पदवीपर्यंतचे शिक्षण सरकारमान्य विद्यापीठातून झालेले असणे आवश्यक आहे.
  • सीआयडी मधील कॉन्स्टेबल या पदासाठी तुम्हाला कमीत कमी दहावी पास असणे गरजेचे आहे.
  • भारतीय संघ सेवा (UPSC )आयोगाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये उमेदवाराला चांगले मार्क्स मिळणे आवश्यक आहे.
  • सर्वात मुख्य म्हणजे सीआयडीमध्ये जाण्यापूर्वी उमेदवाराचे मेडिकल चेकअप केले जाते. यामध्ये जर तो तंदुरुस्त असेल तरच उमेदवाराला सिलेक्ट केले जाते.
  • सीआयडी मध्ये भरती होण्यासाठी उमेदवार हा Single म्हणजेच लग्न न झालेला असणे गरजेचे आहे.

CID मध्ये असलेले इतर विभाग

सीआईडी चे विभाग खालीलप्रमाणे आहेत

  • CB-CID
  • बँक आर्थिक घोटाळे
  • डॉग स्काड
  • अँटी ड्रग्स
  • हरवेलेल्या व्यकती
  • दहशत विरोधी
  • ह्यूमन ट्रॅफिक मानवी हक्क

CID आणि CBI मध्ये काय फरक आहे :-

सीआयडी आणि सीबीआय या दोन्ही विभागांचे काम गुप्तपणे चालते. हे दोन्ही विभाग देशातील मोठमोठ्या आणि अति संवेदनशील केसेस सोडवण्याचे काम बघतात. CBI हा विभाग केंद्र सरकारच्या अंतर्गत येतो तर CID हा विभाग राज्य सरकारच्या अंतर्गत येतो.

CID हे राज्यातील महत्त्वाच्या गुन्हेगारांचा शोध घेतात. तर CBI हे देशातील महत्त्वाच्या गुन्हेगारांचा शोध घेतात त्याचबरोबर देशाबाहेरील भारतीय गुन्हेगारांवर देखील त्यांचे लक्ष असते.

धन्यवाद

Leave a Comment