CISF full form in Marathi | सी आय एस एफ फुल फॉर्म इन मराठी

आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला CISF full form in Marathi सांगणार आहोत. याचबरोबर CISF म्हणजे काय? CISF काय काम करते? त्याचबरोबर CISF बद्दलची इतर माहिती सांगणार आहोत.

सर्वप्रथम आपण CISF full form in Marathi जाणून घेऊ.

CISF चे पूर्ण स्वरूप | CISF full form in Marathi

CISF ला इंग्रजी भाषेमध्ये “Central industrial security force” असे म्हटले जाते. तर आपल्या मराठी भाषेमध्ये याला “केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल” म्हणून संबोधले जाते.

CISF काय कामे करते?

CISF म्हणजे Central industrial security force होय. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणारी ही एक संघिय पोलीस संघटना आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी हे एक दल असून देशातील वेगवेगळ्या औद्योगिक युनिट्सना सशस्त्र सुरक्षा प्रदान करते.

आपल्या देशातील 356 हून अधिक औद्योगिक युनिट्स ज्यामध्ये जवळपास 13 खाजगी युनिट सामील आहेत अशा युनिट्स ना हे दल सुरक्षा प्रदान करते. याचबरोबर भारतीय सरकारचे पायाभूत सुविधा प्रकल्प, आणि इतर सुविधांना सुरक्षा प्रदान करते. यामध्ये बऱ्याच प्रकल्पांचा समावेश होतो जसे की भारतातील प्रमुख बंदरे, रिफायनरीज, तेल आणि खनिज क्षेत्रे, अणुऊर्जा प्रकल्प, जड औद्योगिक प्रकल्प, खाणी, अंतराळ प्रतिष्ठान,खत युनिट्स, विमानतळे इत्यादींचा समावेश आहे.

CISF चा इतिहास

15 मार्च 1969 रोजी सीआयएसएफची अवघ्या 2800 लोकसंख्येसह सुरुवात करण्यात आली. 1983 साली पास झालेल्या कायद्यानुसार CISF ला भारतीय सशस्त्र दल बनवण्यात आले.

भारतामध्ये आता जवळपास दोन लाख CISF कर्मचारी कार्यरत आहेत. CISF संवेदनशील सरकारी इमारतींचे रक्षण करणे दिल्ली मेट्रो व इतर मेट्रो स्टेशनचे रक्षण करणे, त्याचबरोबर विमानतळांना सुरक्षा प्रदान करतात.

CISF बद्दल इतर माहिती

CISF खाजगी उद्योगांना त्याचबरोबर भारत सरकारमधील इतर संस्थांना सुरक्षा सल्ला देखील प्रदान करते. आपत्ती व्यवस्थापनामध्ये देखील सीआयएसएफ फार मोठी महत्त्वाची भूमिका बजावते. CISF फायर विंग युनिट आहे जे आगीच्या दुर्घटनेमध्ये मदत करते.

CISF मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रँक देखील आहेत. ज्यामध्ये महासंचालक, अतिरिक्त महासंचालक, महानिरीक्षक, उप महानिरीक्षक, कमांडंट, डेप्युटी कमांडंट आणि असिस्टंट कमांडंट यांचा समावेश होतो.

CISF चे बोधवाक्य संरक्षण आणि सुरक्षा हे आहे. CISF चे मुख्यालय दिल्ली येथे स्थित असून याचे वार्षिक बजेट जवळपास 14 हजार कोटींचे आहे.

Leave a Comment