सीएनजी फुल फॉर्म इन मराठी | CNG full form in Marathi

सीएनजी फुल फॉर्म इन मराठी | CNG full form in Marathi

आपल्या भारतामध्ये साधारण चार ते पाच वर्षांपूर्वी CNG हे नावं ऐकायला देखील मिळत नव्हते. गाडीमध्ये इंधन म्हणून पेट्रोल आणि डिझेलचाच सर्वत्र वापर करताना आपल्याला दिसत असत. पेट्रोल आणि डिझेल हे सर्वसामान्यांना परवडणारे देखील नव्हते. याचे मेन कारण असे की पेट्रोल आणि डिझेल हे आपण आयात करतो.

पण काही वर्षांपूर्वी सीएनजी मार्केटमध्ये आले आणि त्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. हा एक प्रकारचा गॅस आहे जो पेट्रोल आणि डिझेल पेक्षा कमी किमतीत मिळत होता. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु या CNG चा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का?
​​
आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला CNG full form in Marathi, सांगणार आहोत. याचबरोबर CNG म्हणजे नेमकं काय? CNG कुठून मिळतो ? त्याचबरोबर सीएनजी बद्दल इतर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हे आर्टिकल नक्की वाचा.

सीएनजी फुल फॉर्म इन मराठी | CNG full form in Marathi

CNG म्हणजे Compressed Natural Gas. मराठीमध्ये याला संकुचित नैसर्गिक वायू असे आपण म्हणू शकतो.

पेट्रोलियमच्या जगामध्ये याला कॉम्प्रेस्ड गॅस म्हणून ओळखले जाते. आजच्या काळात हा पेट्रोल आणि डिझेल ला एक उत्तम पर्याय म्हणून उदयास आलेला आहे. सर्वत्र याचा वापर वाढत चाललेला आहे.

CNG म्हणजे नेमकं काय?

CNG हा एक प्रकारचा कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस असून याचा उपयोग इंधनासाठी केला जातो. बाकी उपलब्ध असलेल्या इंधनांपेक्षा हा सुरक्षित आणि स्वस्त पर्याय आहे. याचबरोबर पर्यावरणाला कोणतीही हानी यामुळे पोहोचत नाही. पर्यावरण पूरक असल्यामुळे या गॅसची मागणी सर्वत्र वाढत आहे.

CNG meaning in Marathi
CNG meaning in Marathi

CNG कुठून मिळतो?

CNG हा एक प्रकारचा नॅचरल गॅस असून. हा भूमिगत वायू आहे. जमिनीमध्ये खोलवर उत्खनन करून हा मिळवता येतो. जिथे तेलाच्या खाणी आहेत तिथे हा वायू हमखास आढळतोच. अशा खाणींच्या ठिकाणी या वायूची उपलब्धता सर्वात जास्त असते.

भारतामध्ये जरी याचा उपयोग आता सर्वत्र होत असला तरी देखील याचा सर्वप्रथम उपयोग हा अमेरिकेच्या ओहीयो राज्यात 1960 साली करण्यात आला. परंतु दुर्दैवाने या वायूचा इंधन म्हणून केला गेलेला प्रयोग फसला, यानंतर यासाठी प्रयत्न चालू होते.

CNG चा उपयोग आणि फायदे :-

  • डिझेल आणि पेट्रोलच्या तुलनेत हा वायू खूपच कमी विषारी घटक हवेत सोडतो. सजीवांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा वायू घातक नाही.
  • दुसऱ्या महायुद्धानंतर सीएनजी गॅसवर चालणारे वाहनांचा उपयोग सर्वात जास्त करण्यात आला.
  • सीएनजी हा वायू गंधरहित रंगरहित व चवरहित असतो.
  • सीएनजी गॅस मध्ये मुख्य गॅस हा मिथेन गॅस मानला जातो, तेल खाणी कोळसाच्या खाणी व इतर ठिकाणी या गॅसचे भंडार उपलब्ध असते.
  • बाकी इंधन जसे की पेट्रोल व डिझेल यांच्यापेक्षा हा वायू खूपच स्वस्त आहे.
  • हवेपेक्षाही या वायूचे वजन कमी असल्याकारणाने या वायूची गळती जरी झाली तरी नुकसान फारच कमी होते.

भारतामध्ये CNG चा वापर 

सध्या भारतामध्ये पाच हजारहून अधिक सीएनजी स्टेशन्स उपलब्ध आहेत. हा वायू पेट्रोल आणि डिझेल पेक्षा स्वस्त असल्याकारणाने भारत सरकारचे उद्दिष्ट आहे की पुढील काही वर्षांमध्ये आठ हजार सीएनजी स्टेशन्स सुरू करण्यात येतील.
​​​
महानगर गॅस,इंद्रप्रस्थ वायू आणि गुजरात गॅस या कंपन्या भारतामध्ये सीएनजी बनवतात व सेल करतात.

Leave a Comment