CPU full form in Marathi | सीपीयू फुल फॉर्म इन मराठी
नमस्कार मित्रांनो,
संगणकामुळे मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडून आला, कारण आता 100 माणसांचं काम संगणक सहजरीत्या करू लागला आहे. पूर्वीचे संगणक आणि आताचे संगणक यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. संगणकामध्ये देखील बरेच बदल करण्यात आले. काही अंशी संगणकाची जागा आता लॅपटॉप ने घेतली आहे, तरी देखील आज कित्येक घरात आणि ऑफिसेस मध्ये संगणकाचा वापर केला जातो.
संगणकाचे मुख्यतः 4 मुख्य भाग मानले जातात. मॉनिटर, कीबोर्ड,माऊस आणि सीपीयू. संगणक वापरताना CPU हे नाव तुम्ही बऱ्याच वेळा ऐकले असेल. परंतु CPU चा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का?
आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला CPU full form in Marathi, याबरोबरच CPU म्हणजे नेमकं काय? CPU काय काम करते? CPU चा उपयोग? व सीपीयू बद्दल इतर सर्व माहिती सांगणार आहोत.
सीपीयू फुल फॉर्म इन मराठी | CPU full form in Marathi
CPU म्हणजेच “Central Processing Unit” (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट) होय. मराठीमध्ये आपण याला “केंद्रीय प्रक्रिया युनिट” म्हटले जाते.
CPU म्हणजे नेमकं काय?
मानवी शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा समजला जाणारा अवयव म्हणजे मेंदू होय. शरीराच्या सर्व छोट्या-मोठ्या हालचालींवर मेंदू नियंत्रण ठेवतो. मेंदूच्या आज्ञे नंतरच आपण हालचाल किंवा प्रक्रिया करतो. अगदी याच प्रमाणे संगणकाच्या कामांवर प्रक्रिया करण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी CPU चा निर्माण करण्यात आला आहे.
CPU काय काम करते?
CPU ला केंद्रीय किंवा मुख्य प्रोसेसर म्हणून देखील संबोधले जाते. संगणकामधील विविध एप्लीकेशन चालवण्याचे काम सीपीयू करते.
कम्प्युटर सिस्टीम मधील विविध कार्य करण्यासाठी CPU कम्प्युटर सिस्टीम चे अन्य घटक जसे की मेमरी, स्टोरेज, इनपुट /आउटपुट डिवाइस सोबत संचार करते.
कोणत्याही कॉम्प्युटिंग डिवाइसचा मेंदू म्हणून CPU काम करते.
CPU चे मुख्य काम म्हणजे कंप्यूटरने इनपुट डिवाइस च्या साह्याने दिलेल्या सूचना प्राप्त करणे व त्यावर योग्य ती प्रक्रिया करून आउटपुट डिवाइस च्या मदतीने योग्य तो आउटपुट देणे.
आतापर्यंत CPU मध्ये बऱ्याच प्रमाणात बदल झालेले आहेत. ते आपण जाणून घेऊ :-
संगणकाच्या आतापर्यंत पाच पिढ्या झालेल्या आहेत :-
1) व्हॅक्यूम ट्यूब :-
1940 ते 1956 दरम्यान संगणकाची पहिली पिढी झाली. यावेळी मेमरी म्हणून व्हॅक्युम ट्यूब आणि मॅग्नेटिक ड्रम चा वापर केला जात असे. व्हॅक्युम ट्यूब या आकाराने खूप मोठ्या असायच्या, एक संपूर्ण खोली यांच्यामुळे व्यापून जायची. आणि म्हणूनच व्हॅक्युम ट्यूबला CPU ची पहिली पिढी म्हणून ओळखली जाते.
ज्यावेळी हे CPU काम करायचे त्यावेळी त्यांच्यातील विजेचा प्रवाह हा जास्त असायचा आणि परिणामी गरम होऊन संगणक खराब व्हायचा.
या पिढीतील संगणक एका वेळी एकच काम करण्यात सक्षम होता.
2) ट्रांजिस्टर :-
1956 ते 1963 च्या काळात ट्रांजिस्टर चा उपयोग होऊ लागला. व्हॅक्युम ट्यूब ची जागा ट्रांजिस्टरने घेतल्यामुळे संगणक पूर्वीपेक्षा अधिक जलद,अधिक स्वस्त, आकाराने लहान, अधिक कार्यक्षम, आणि विश्वासार्ह झाला.
या जनरेशनच्या कम्प्युटरमध्ये देखील इनपुट आणि आउटपुट ऑपरेशन साठी पंच कार्ड चा वापर करण्यात येत होता.
3) इंटिग्रेटेड सर्किट्स :-
1964 मध्ये इंटिग्रेटेड सर्किट्स चा जन्म झाला. CPU च्या या तिसऱ्या पिढीमध्ये पंच कार्ड आणि पेपरचा वापर पूर्णपणे बंद झाला.
या जनरेशन मध्ये कीबोर्ड आणि माऊस द्वारे संगणकाशी संवाद साधता येऊ लागला.
एकाच वेळी अनेक प्रकारची कामे करण्यास सक्षम असलेले हे संगणक अत्याधिक लोकप्रिय झाले. हे संगणक कमी खर्चिक होते.
4) मायक्रोप्रोसेसर :-
1971 साली CPU च्या या चौथ्या पिढीमध्ये मायक्रो प्रोसेसर चा समावेश करण्यात आला. एका सामान्य चीप वर हजारो सर्किट तयार करण्यात आले अशी याची रचना होती.
1971 साली इंटेल 4004 ही चिप तयार करण्यात आली जी अधिक कार्यक्षम होती. पुढे 1981 साली IBM कंपनीने होम यूजर चा पहिला संगणक तयार केला.
इथून पुढे मायक्रोप्रोसेसर चा वापर बऱ्याच प्रमाणात होऊ लागला, यामुळे संगणक प्रणाली अधिक शक्तिशाली, स्वस्त व कार्यक्षम झाली.
अजूनही CPU मध्ये वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. भविष्यामध्ये आपल्याला अजून वेगळ्या प्रकारचे सीपीयू बघायला मिळू शकतात.
धन्यवाद.