DAV full form in Marathi | डी ए व्ही फुल फॉर्म इन मराठी

नमस्कार मित्रांनो,

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी डी. ए. व्ही. या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेतले असेल. परंतु आपल्यापैकी किती जणांना या शाळेबद्दल संपूर्ण माहिती आहे? त्याचबरोबर तुम्हाला DAV चा फुल फॉर्म माहिती आहे का? आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला DAV फुल फॉर्म इन मराठी सांगणार आहोत, याबरोबरच या संस्थेबद्दलची सर्व माहिती या आर्टिकल मध्ये सांगणार आहोत.

सर्वप्रथम आपण DAV चा फुल फॉर्म जाणून घेऊ. DAV म्हणजेच “दयानंद अँग्लो वैदिक( Dayananda Anglo Vaidik )” स्कूल होय.

DAV (डी. ए. व्ही ) म्हणजे काय? | What is DAV in Marathi

भारतातील नामांकित आणि प्रतिष्ठित शिक्षण संस्थेपैकी ही एक गैर सरकारी शिक्षण संस्था आहे. DAV म्हणजेच दयानंद अँग्लो वैदिक शाळा होय. भारतातील सर्वात जुन्या शाळांपैकी ही एक मानली जाते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की डीएव्ही ची पहिली शाळा आजच्या पाकिस्तानमधील लाहोर येथे 1 जून 1886 रोजी उघडण्यात आली. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या स्मरणार्थ महात्मा हंसराज यांनी या शाळेची स्थापना केली.

महात्मा हंसराज यांना भारतीय शिक्षणतज्ञ आणि आर्य समाज चळवळीचे संस्थापक असलेले स्वामी दयानंद सरस्वती यांचे शिष्य मानले जाते. स्वामींच्या आशीर्वादाने 1886 रोजी गुरुदत्त विद्यार्थ्यांच्या समवेत लाहोर मध्ये या शाळेची स्थापना झाली. आजमितीला प्रत्येक राज्यात देशात आणि जगभरात DAV शाळा आपल्याला बघायला मिळतील.

दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज ट्रस्ट आणि मॅनेजमेंट सोसायटी या शाळांची देखभाल करते. महात्मा हंसराज यांनी लाहोर मधील पहिल्या शाळेचे मुख्य प्राचार्य पद भूषवले.

सध्या DAV च्या भारतासह जगभरामध्ये 75 महाविद्यालये आणि 900 शाळा आहेत. दयानंद अँग्लो वैदिक प्रणालीतील या शाळा आणि महाविद्यालय पदवी तसेच पदव्युत्तर पदवी देखील प्रदान करतात. DAV या संस्थेला तब्बल एक शतक उलटून गेलेले आहे . भारताच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक नूतनीकरणांमध्ये DAV शाळांचा महत्त्वाचा वाटा आहे.

DAV शाळेचे उद्दिष्ट | Objectives of DAV School in Marathi

DAV Full form in Marathi
DAV Full form in Marathi

विद्यार्थ्यांना पूर्ण क्षमतेनुसार मानसिक नैतिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम बनवणे हे DAV चे उद्दिष्ट आहे.

1) प्रत्येक विद्यार्थ्याची प्रतिभा ओळखून त्यांचे कौशल्य वाढवणे.

2) मुलांचे सशक्त चारित्र्य आणि निरोगी मानसिक वृत्ती वाढवण्यासाठी त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणे.

3) दैनंदिन जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी मुलांना तयार करणे.

4) मूलभूत विषय आणि मूलभूत पद्धती शिकवणे.

5) शिक्षणाबरोबरच मुलांना खेळामध्ये निपुण करणे. त्यांची सर्वांगीण वाढ यावर लक्ष केंद्रित करणे.

6) राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांना प्रशिक्षित करणे.

7) विद्यार्थ्यांना संघटित करून एकात्मतेची भावना निर्माण करणे.

8) विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करणे.

9) सहानुभूती, सत्य, प्रामाणिकता, आणि बंधुता विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे.

10) विद्यार्थ्यांना त्यांची कल्पक क्षमता विकसित करण्यासाठी संधी देणे. सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची संधी देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणे.

11) प्राचीन भारतीय विचार, परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांबद्दल विद्यार्थ्यांना जाणीव करून देणे.

12) उच्च दर्जाचे शिक्षण देऊन त्यांच्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना एक चांगला माणूस म्हणून घडवणे.

DAV शाळांची काही वैशिष्ट्ये | Features of DAV Schools in Marathi

  • प्रत्येक शाळेमध्ये, महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित कर्मचारी व शिक्षक वर्ग.
  • हिंदी व इंग्रजी भाषेला समान महत्त्व दिले जाते.
  • शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना त्यांचा छंद जोपासणे त्याचबरोबर त्यांना आवड असलेल्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी देणे.
  • पालक आणि शिक्षक यामध्ये चांगले संबंध प्रस्थापित करणे.

धन्यवाद

Leave a Comment