आजच्या पोस्टमध्ये आपण “DCPS Full Form in Marathi” बद्दल माहिती घेणार आहोत. सर्वाना वाटते सरकारी नोकरी करावी कारण सरकारी नोकरीचा एक महत्वाचा फायदा असतो कि निवृत्त झाल्यांनतर पेंशन मिळते. निवृत्तीवेतन हा नोकरीनंतर खूप मोठा आर्थिक आधार असतो, त्यामुळे निवृत्त झाल्यावर कोणती आर्थिक अडचण येणार नाही यामुळे अनेकजण सरकारी नोकरीकडे वळतात.
निवृत्त झाल्यावर कोणाला आर्थिक अडचण यावी नाही म्हणून सरकारने एक योजना आणली त्याला निवृत्तीवेतन योजना म्हणजे DCPS असे म्हणतात. अनेकांना DCPS Meaning in Marathi माहित नसतो त्यामुळे आपण आजच्या पोस्टमध्ये याबाबदल माहिती घेत आहोत. तर चला मग DCPS Full Form बद्दल मराठीमध्ये माहिती घेऊयात.
डिसिपीएस (DCPS) चा फुल फॉर्म | DCPS Full Form in Marathi
DCPS चा फुल फॉर्म “Defined Contribution Pension Scheme” असा होतो आणि याला मराठीत “परिभाषित योगदान पेन्शन योजना” असे म्हणतात. DCPS योजनेनुसार सरकारी कर्मचाऱ्याच्या महिन्याच्या पगारातून काही पगार कापला जातो आणि तो पेंशन फ़ंड मध्ये जमा होतो. कर्मचाऱ्यांची निवृत्ती झाल्यांनतर हीच रक्कम मासिक पेन्शन म्हणून दिली जाते.
DCPS ही योजना केंद्र सरकारच्या १ जानेवारी २००४ रोजी किंवा त्यानंतर भरती झालेल्या कर्मचार्यांसाठी लागू आहे. त्यामुळे १ जानेवारी २००४ पूर्वी भरती झालेल्या कर्मचार्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. अशा कर्मचार्यांना Old Pension Scheme (OPS) लागू होते.
DCPS या योजनेमध्ये, कर्मचार्यांच्या पगारातून दरमहा त्यांच्या पेंशन फंडात १०% रक्कम जमा केली जाते आणि सरकार देखील कर्मचार्यांच्या समान रक्कम पेंशन फंडात जमा करते. म्हणजेच, कर्मचार्यांच्या अंशदाबरोबर सरकारचे देखील अंशदान पेंशन फंडात जमा होतात. या फंडातील रक्कम बाजारात गुंतवणूक केली जाते आणि त्यातून मिळणारे परतावा देखील फंडात जमा होत असतात. यामुळे निवृत्तीनंतर कर्मचार्यांना चांगली रक्कमची मासिक पेंशन मिळते.
DCPS योजनेचे फायदे –
- कर्मचार्यांची निवृत्तीवेतनाची खात्री: या योजनेमुळे कर्मचार्यांच्या निवृत्तीवेतनाची खात्री होते. त्यांना दरमहा नियमित पेंशन मिळत असते, ज्यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक अडचणी येण्याची शक्यता कमी होते.
- सरकारवरील पेंशन खर्चाचा बोजा कमी: या योजनेमुळे सरकारवरील पेंशन खर्चाचा बोजा कमी होतो. कारण पारंपारिक पेंशन योजनेपेक्षा या योजनेमध्ये सरकारचे अंशदान निश्चित असते.
- बाजारपेठेचा परतावा मिळवण्याची संधी: या योजनेमध्ये पेंशन फंडातील रक्कम बाजारात गुंतवणूक केली जाते. त्यामुळे बाजारपेठेचा परतावा मिळवण्याची संधी असते. यामुळे कर्मचार्यांच्या अंदाजे निवृत्तीवेतनात वाढ होऊ शकते.
- कर्मचार्यांना बचत करण्याची प्रेरणा: या योजनेमुळे कर्मचार्यांना त्यांच्या पगारातून दरमहा १०% रक्कम निवृत्तीवेतनासाठी बचत करण्याची प्रेरणा मिळते.
आजची DCPS Full Form in Marathi पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि विविध फुल फॉर्म बद्दल जाणून घेण्यासाठी या ब्लॉगला पुन्हा पुन्हा भेट देत राहा.