(DNA Full Form) डीएनए (DNA) म्हणजे काय आहे?

(DNA Full Form) DNA हे नाव तुम्ही अनेकवेळा ऐकले असेल. विद्यार्थी असाल तर विज्ञानाच्या पुस्तकात DNA बद्दल असेलच. अनेकांनी DNA हे नाव फक्त ऐकले आहे किंवा वाचले आहे परंतु याचा Full Form खूप जणांना माहीत नाहीये. प्रत्येक जीवांच्या शरीरातील एक महत्त्वाचा रेणूंपैकी डीएनए हा एक आहे. आपल्या सर्वांमध्ये DNA असतो आणि तो व्यक्तिपरत्वे वेगळा आढळतो. आपण जर अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतून केली असेल तर DNA शी आपण परिचित असाल.

मित्रांनो, माणसांचे शरीर वेगळे असते, डोळ्यांचे रंग वेगळे असतात आणि शारीरिक रूपे वेगवेगळी असतात. तुमच्या लक्षात आले असेल की एखाद्या व्यक्तीला त्यांच्या पालकांप्रमाणेच डोळ्यांचा रंग वारसा मिळू शकतो, तसेच शारीरिक वैशिष्ट्ये त्यांच्या पालकांसारखीच असतात. अश्या अनुवांशिक बदलाचे कारण DNA असतो. पालकांची जनुकीय माहिती मुलाला मिळते, आणि हि प्रक्रिया प्रत्येक जीवात अशीच चालू असते. ज्याला आपण अनुवंशिकता असे सुद्धा म्हणतो.

आजच्या DNA Full Form in Marathi या पोस्टमध्ये आपण DNA चा Full Form आणि आवश्यक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या शरीरातील एक आवश्यक घटक असल्याने याची माहिती असणे सामान्य ज्ञानाच्या दृष्टीने गरजेचे आहे. या लेखात आपण डीएनए म्हणजे काय, डीएनए कुठे सापडतो, डीएनए कसा बनलेला असतो, डीएनए चा इतिहास, ई माहिती आपण या पोस्टमध्ये शिकणार आहोत. तर चला जास्त वेळ न घालवता मुख्य महितीकडे वळूयात.

(DNA Full Form) डीएनए (DNA) म्हणजे काय आहे?

डीएनए (DNA) चा फुल फॉर्म “Deoxyribonucleic Acid” असा होतो आणि याला मराठीत “डिऑक्सिराइबोन्यूक्लिक आम्ल” असे म्हणतात. डीएनए रेणू चार वस्तूंनी बनलेले असतात आणि रेणूंची रचना वक्र शिडीसारखी असते. डीएनए जिवंत पेशीशी संबंधित आहे. तो शिडीसारखा आकाराचा असतो. आपण DNA ला 3D Structure द्वारे स्पष्ट्पणे पाहू शकतो.

डीएनए हे एक Nucleic Acid आहे.  DNA अंतर्गत सर्व सजीव प्राणी आणि अगदी विषाणूंमध्ये सर्व सजीव डीएनए च्या विकासासाठी सूचना दिल्या जातात. सोप्या शब्दांत सांगायचे तर, डीएनए ही एका प्राण्याच्या शरीरात असलेली जनुकीय संहिता आहे ज्याद्वारे मानवी शरीराची सर्व वैशिष्ट्ये निश्चित केली जाऊ शकतात.

खरं तर तुमच्या शरीराचा डीएनए तुम्हाला सांगतो की तुम्ही कोण आहात. तुझी ओळख काय आहे? जेव्हा मूल जन्माला आले, तेव्हा त्याच्या आईवडिलांचा अनुवंशिक सामग्रीचा डीएनए मुलाच्या शरीरात प्रवेश करतो. एखाद्या व्यक्तीचे आई-वडील कोणते आहेत हे शोधण्यासाठी DNA चा वापर केला जाऊ शकतो.

थोडक्यात सांगायचे झाले तर सर्व सजीव प्राणी, वनस्पती, कीटक यांच्यातील जनुकीय घटक ज्यापासून बनतात ते रेणू म्हणजे DNA. DNA च्या साखळीला गुणसूत्र (Chromozome) असे म्हणतात, हे DNA च्या सर्वात लहान घटकांपासून बनलेले असतात त्या घटकाला DNA Unit असे म्हणतात. मानवाच्या शरीरातील एका गुणसूत्रात 3.35 कोटी DNA Unit असतात.
प्रत्येक प्राण्यातील गुणसूत्रांची संख्या वेगळी असते.

मानवात 46 गुणसूत्र असतात आणि कुत्र्यात 78 असतात. काही प्राण्यात गुणसूत्रांची संख्या सारखी असते परंतु त्यांची रचना वेगवेगळी असते. असेच DNA चे काही Unit मिळून जनुके बनवतात, यांवर सजीवांची जनुकीय वैशिष्ट्ये अवलंबून असतात.

4 thoughts on “(DNA Full Form) डीएनए (DNA) म्हणजे काय आहे?”

Leave a Comment