DRDO Full form in Marathi | डीआरडीओ चा फुल फॉर्म काय आहे?

DRDO Full Form in Marathi – आजच्या Technology च्या युगात विज्ञानाशिवाय जगणे अशक्य आहे. कोणताही देश विज्ञान व तंत्रज्ञानाशिवाय प्रगती करू शकत नाही. देशाला प्रगत करण्यासाठी Science and Technology सोबतच सुरक्षेवर सुद्धा लक्ष द्यावे लागते. त्यामुळे देशाला शेजारच्या देशांपासून सुरक्षित ठेवता येईल. जगात कोणत्याही देशाची प्रगती त्या देशाच्या लष्करी ताकतीवर आणि वैज्ञानिक विकासावर अवलंबून असते.

आपण पाहतो कि भारताला चीन आणि पाकिस्तान या दोन शेजारी राष्ट्रांकडून नेहमीच धोका असतो. अशा स्थितीत भारताला आपले संरक्षण मजबूत ठेवावे लागते आणि यामध्ये डीआरडीओ (DRDO) हातभार लावते, जेणेकरून भारताची सुरक्षा सुनिश्चित करता येईल. तर आजच्या लेखात आपण DRDO चा फुल फॉर्म आणि DRDO बद्दल महत्वाची माहिती पाहणार आहोत. तर चला सुरू करूयात.

डीआरडीओ (DRDO) चा फुल फॉर्म काय आहे | DRDO Full Form in Marathi

DRDO चे पूर्ण नाव “Defence Research and Development Organisation” आहे ज्याला मराठीत “संरक्षण संशोधन आणि विकास संस्था” असे म्हणतात. डीआरडीओ (DRDO) ही भारत सरकारची एक संस्था आहे. डीआरडीओ (DRDO) चे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे.

डीआरडीओ (DRDO) काय आहे?

DRDO ही भारताच्या संरक्षण क्षेत्रातील प्रमुख संशोधन आणि विकास संस्था आहे. जी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. संरक्षण तंत्रज्ञानामध्ये भारताला सक्षम करणे आणि लष्करी ताकद वाढवणे हे DRDO चे मुख्य कार्य आहे. (DRDO Full Form in Marathi) DRDO आपल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे भारतासाठी संरक्षण उपकरणे बनवते.

DRDO Full Form Defence Research and Development Organisation
स्थापना 1958
मुख्यालय डीआरडीओ भवन, नवी दिल्ली
मोटो बलस्य मूलं विज्ञानम्
Strengths Origin is in Knowledge
अध्यक्ष डॉ. समीर वी. कामत
Official Website drdo.gov.in

DRDO ही भारतातील संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी आणि प्रगत संस्था आहे. या संस्थेची स्थापना सन 1958 मध्ये झाली. DRDO च्या भारतात एकूण 52 प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. येथे वेगवेगळ्या प्रकारच्या संरक्षण तंत्रज्ञानाच्या गोष्टी बनवल्या जातात. जसे की वैमानिक, क्षेपणास्त्रे, नौदल यंत्रणा ई.

सध्या डीआरडीओमध्ये ३० हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात, त्यापैकी ५ हजारांहून अधिक वैज्ञानिक आहेत. हे सर्व भारताच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याच्या हेतूने रात्रंदिवस काम करतात. आणि भारताला लष्करी स्वरूपात मजबूत बनवतात. आता डीआरडीओ इतर देशांनाही संरक्षण विकून पैसे कमवत आहे.

डीआरडीओ (DRDO) ची कार्ये

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर DRDO (DRDO Full Form in Marathi) भारताच्या संरक्षणाशी संबंधित संशोधन करते. आणि देशासाठी संरक्षण उपकरणे तयार करते. भारताच्या संरक्षणाशी संबंधित ही आघाडीची संस्था आहे. हि संस्था भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. आणि सध्या भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे DRDO चे जबाबदार मंत्री आहेत.

या एजन्सीचे अंतिम ध्येय आहे भारताला जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज करणे आणि त्याची संरक्षण यंत्रणा भारतीय लष्कराकडे सोपवणे. जेणेकरून भारताची सुरक्षा सुनिश्चित करता येईल. भारत असा देश आहे ज्याला चीन आणि पाकिस्तान या दोन्ही बाजूंनी नेहमीच धोका असतो.

डीआरडीओ (DRDO) च्या मुख्य संस्था

डीआरडीओ अंतर्गत देशात अनेक संस्था कार्य करतात. यामध्ये लष्करासाठी आधुनिक Weapons बनवण्यासाठी रिसर्च केली जाते. डीआरडीओ च्या काही संस्था खाली दिलेल्या आहेत.

 • Advanced Systems Laboratory – Hyderabad
 • Advanced Numerical Research & Analysis Group – Hyderabad
 • Aerial Delivery Research & Development Establishment – Agra
 • Armaments Research & Development Establishment – Pune
 • Aeronautical Development Establishment – Bengaluru
 • Centre for Airborne Systems – Bengaluru
 • Centre for Artificial Intelligence and Robotics – Bengaluru
 • Centre for Fire Explosives and Environment Safety – Delhi
 • Combat Vehicles Research & Development Establishment – Chennai
 • Defence Food Research Laboratory – Mysore
 • Terminal Ballistics Research Laboratory – Chandigarh
 • Laser Science & Technology Centre – Delhi
 • Defence Research & Development Establishment – Gwalior

डीआरडीओ (DRDO) ची ध्येय आणि उद्दिष्ट्ये

डीआरडीओ ची ध्येय आणि उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे (DRDO Full Form in Marathi) –

 • विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला समृद्ध बनवणे.
 • भारतीय लष्कराला अत्याधुनिक शस्त्रे पुरवणे.
 • सीमा सुरक्षेसाठी हायटेक सेन्सर्स बनवणे.
 • देशाला उच्च दर्जाची प्रणाली आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे.
 • एक मजबूत व्यावसायिक समर्थन प्रणाली तयार करणे.
 • चांगल्या विकसित पायाभूत सुविधा आणि दर्जेदार मनुष्यबळाची स्थापना करणे

FAQ – DRDO Full Form in Marathi

DRDO ची स्थापना केव्हा झाली?

DRDO ची स्थापना 1958 मध्ये झाली.

DRDO चा मोटो काय आहे?

“बलस्य मूलं विज्ञानम” हा DRDO चा मोटो आहे.

DRDO चे मुख्यालय कोठे आहे?

DRDO चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

DRDO चे अध्यक्ष कोण आहेत?

डॉ समीर वी. कामत हे DRDO चे अध्यक्ष आहेत.

DRDO चे प्रथम अध्यक्ष कोण होते?

DRDO चे प्रथम अध्यक्ष सतीश रेड्डी हे होते.

1 thought on “DRDO Full form in Marathi | डीआरडीओ चा फुल फॉर्म काय आहे?”

Leave a Comment