आज संपूर्ण देशामध्ये निवडणुकांचा माहोल आहे. विरोधक बऱ्याच वेळा मतदानासाठी ईव्हीएम चा वापर करू नका असे सांगताना तुम्ही ऐकले किंवा वाचले असेल. परंतु ह्या ईव्हीएम EVM चा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का? आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला EVM full form in Marathi, त्याचबरोबर ईव्हीएम चा फायदा काय आहे ? VVPAT म्हणजे काय? ईव्हीएम सर्वात आधी केव्हा वापरले गेले? इत्यादी बद्दलची माहिती सांगणार आहोत.
EVM full form in Marathi | ईव्हीएम फुल फॉर्म इन मराठी
EVM म्हणजे “Electronic Voting Machine” होय. मराठीमध्ये याला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र असे म्हणतात. तुम्ही देखील कधी ना कधी हे यंत्र जरूर वापरले असेल.
EVM म्हणजे काय? | EVM Meaning in Marathi
ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. भारतामध्ये या मशीनचा वापर जवळपास सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये केला जातो. तीन युनिट जोडून या मशीनला बनवण्यात आलेले आहे. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्होटर व्हेरिफाइबल पेपर ऑडिट ट्रेल मशीन (VVPAT). असे तीन युनिट या मशीनमध्ये असतात. केबल द्वारे हे युनिट जोडले जातात. बॅलेट मशीन हे मतदान करण्यासाठी ठेवले जाते तर कंट्रोल युनिट हे मतदान अधिकार्याकडे असते.
बॅलेट युनिटवर उमेदवारांची नावे असतात, पक्षाचे चिन्ह व एक बटन असते. हे बटन दाबून मतदार आपले मत देऊ शकतो.
VVPAT म्हणजे काय?
VVPAT म्हणजे Voter Verifiable Paper Audit Trail. जेव्हा ईव्हीएम मशीन बद्दल लोक प्रश्न उपस्थित करू लागले , त्यानंतर VVPAT वापरण्यात येऊ लागले. हा एक प्रकारचा प्रिंटर तुम्ही समजू शकता. मतदाराने मतदान केल्यानंतर ते कोणत्या व्यक्तीला केलेलं आहे याबद्दलची माहिती देणारी एक पावती व्हीव्हीपॅट मधून बाहेर पडते. आपण दिलेले मत योग्य व्यक्तीलाच गेलेले आहे याची खात्री व्हीव्हीपॅट द्वारे होते.
EVM चा फायदा काय आहे?
EVM मशीन वापरल्यामुळे बरेच फायदे आपल्याला झालेले आहेत. त्यातील काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत :-
- निवडणूक प्रक्रिया सुलभ होण्यास मदत झाली.
- निवडणुकांमध्ये होणारा खर्च आणि वेळ हा बऱ्याच प्रमाणात वाचतो.
- बॅलेट पेपर मुळे होणारी वृक्षतोड कमी झाली.
- EVM सुरक्षित असून ते हॅक करता येऊ शकत नाही.
सर्वात आधी ईव्हीएम मशीन कुठे वापरण्यात आले?
भारतातील केरळ राज्यातील पतुर या ठिकाणी 1982 साली ईव्हीएम मशीन हे सर्वप्रथम वापरण्यात आले. हा एक यशस्वी प्रयोग होता. 1951 साली घटनेमध्ये दुरुस्ती करून इलेक्ट्रॉनिक मतदान करणे हे कायदेशीर करण्यात आले.
ईव्हीएम ची निर्मिती कोण करते?
भारतामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ (bhel ) आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या दोन कंपन्या ईव्हीएम ची निर्मिती करतात. या दोन्ही कंपन्या भारतीय सरकारच्या मालकीच्या आहेत. 8 ते 17 हजार रुपये एवढी किंमत एका ईव्हीएम मशीनची असते.
Conclusion
तर मित्रांनो आजच्या या EVM full form in Marathi च्या लेखात आपण EVM म्हणजे काय?, VVPAT म्हणजे काय? आणि EVM चा फायदा काय आहे? या संबंधी सविस्तर माहिती पहिली, तरी सुद्धा तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.