EWS Full Form in Marathi | EWS काय असते?

आज आपण अनेक ठिकाणी किंवा बातम्यांमध्ये “EWS” हा शब्द वारंवार ऐकतो. त्यामुळे आजच्या पोस्टमध्ये आपण EWS Full Form in Marathi काय आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आज या ब्लॉग पोस्टमध्ये, आपण EWS Full Form in Marathi याची संपूर्ण माहिती घेऊयात. तर चला सुरू करूयात.

EWS Full Form in Marathi – काय असते EWS प्रमाणपत्र आणि कसे काढायचे?

EWS चा फुल फॉर्म “Economically Weaker Section” “आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक” असा आहे. हे भारतातील सामान्य श्रेणीतील लोकांसाठी एक उप-वर्ग आहे ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

काय असते EWS Certificate?

EWS म्हणजे “Economically Weaker Sections” अर्थात “आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक”. हे भारतातील उच्चवर्णीय समाजातील गरीब लोकांसाठी 10% आरक्षण प्रदान करते. हे आरक्षण 2019 मध्ये 103 व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे लागू केले गेले.

EWS आरक्षणासाठी पात्र होण्यासाठी, कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयेपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती जमीन, 1000 चौरस फूटपेक्षा जास्त घर, किंवा 10 लाख रुपयेपेक्षा जास्त बँक डिपॉझिट नसावे.

EWS आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील दुर्बल नागरिकांना एक प्रमाणपत्र बनवावे लागते त्याला EWS Certificate असे म्हणतात. जे आयकर प्रमाणपत्रासारखे आहे. EWS प्रमाणपत्र General Category मधील आर्थिकदृष्ट्या गरीब लोकांसाठी असते.

EWS आरक्षण पात्रता

EWS आरक्षणासाठी पात्र होण्यासाठी, उमेदवारांनी खालील गोष्टी पूर्ण करणे आवश्यक आहे –

उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील असावा.

उमेदवाराचे कौटुंबिक उत्पन्न वार्षिक ₹8 लाखांपेक्षा जास्त नसावे.

उमेदवार कोणत्याही आरक्षण श्रेणीतील नसावा, जसे की SC, ST, OBC ई.

कसे बनवायचे EWS Certificate?

EWS आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सामान्य श्रेणीतील लोकांना EWS प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करावा लागेल. त्यासाठी त्यांना त्यांच्या भागातील तहसील कार्यालयात जाऊन तेथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागणार आहे.

EWS प्रमाणपत्र काढण्यासाठी अद्याप कोणतीही ऑनलाइन प्रक्रिया नाही. त्यामुळे आत्ता तुम्हाला फक्त ऑफलाइन अर्ज करावा लागेल. EWS Application Form तुम्हाला तहसील कार्यालयात मिळतील. तुम्हाला ते भरावे लागेल आणि आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करावे लागेल.

EWS प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे

EWS प्रमाणपत्र काढण्यासाठी, तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता लागेल. ज्याच्या आधारे तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचे सिद्ध करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल –

1. आधार कार्ड

2. उत्पन्नाचा दाखला

3. पॅन कार्ड

4. रेशन कार्ड

5. बँक स्टेटमेंट

6. स्व – घोषणापत्र

7. मतदार ओळखपत्र

EWS प्रमाणपत्र वैधता

जर तुम्हाला तुमचे EWS प्रमाणपत्र मिळाले तर ते फक्त 1 वर्षासाठी वैध असते. त्यानंतर तुम्हाला त्याचे नूतनीकरण करावे लागेल. तुम्ही हे लक्षात ठेवावे की तुम्हाला तुमचे EWS प्रमाणपत्र आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच मिळते. कारण ते पुढील आर्थिक वर्षापर्यंतच वैध असते.

निष्कर्ष

आजच्या पोस्टमध्ये, मी तुम्हाला EWS Full Form in Marathi, EWS Meaning in Marathi संबंधित सर्व आवश्यक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आज मी तुम्हाला EWS काय आहे, EWS Long Form काय आहे, EWS प्रमाणपत्र कसे मिळवायचे याबद्दल माहिती दिली आहे.

आपल्याला जर आजची आमची पोस्ट आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला इतर काही प्रश्न विचारायचे असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा आणि अश्याच प्रकारच्या अधिक माहितीसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन करा. धन्यवाद!

Leave a Comment