फॅक्स फुल फॉर्म इन मराठी | FAX full form in Marathi 

नमस्कार मित्रांनो,

आजच्या काळात जर एखाद्याला आपल्याला कोणता संदेश किंवा एखादे कागदपत्र पाठवायचे असेल तर आपण ई-मेल, किंवा इतर सोशल मीडिया एप्लीकेशन चा वापर करतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का आधीच्या काळामध्ये, जर कोणाला कमी वेळात एखाद्या लांब ठिकाणी कागदपत्रे पाठवायची असेल तर ते कशाने पाठवत? तर यासाठी सर्रास फॅक्स मशीनचा उपयोग केला जायचा. परंतु FAX या शब्दाचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का?

आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला FAX full form in Marathi, त्याचबरोबर फॅक्स मशीन म्हणजे काय? FAX मशीन चे फायदे, FAX बद्दल अधिक माहिती सांगणार आहोत.

FAX full form in Marathi | फॅक्स फुल फॉर्म इन मराठी.

FAX म्हणजे “Facsimile Automated Xerox”. मराठीमध्ये याला फॅसीमाईल मशीन किंवा फॅक्स मशीन म्हणून संबोधले जाते.

FAX म्हणजे काय?

फॅक्स हे एक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिवाइस असून, एखादे डॉक्युमेंट इकडून तिकडे पाठवणे, किंवा रिसिव्ह करण्याचे काम करते.

खास करून सरकारी कार्यालय, व्यापारी कार्यालय इत्यादी ठिकाणी याचा वापर जास्त केला जाई. या मशीन द्वारे इलेक्ट्रॉनिक्स स्वरूपात डॉक्युमेंट्स पाठवले जाते.

जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फॅक्स पाठवायचा असेल तर तिकडे देखील फॅक्स मशीन किंवा कम्प्युटर असणे गरजेचे आहे. यासाठी इंटरनेट कनेक्शनची देखील आवश्यकता असते.

इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये फॅक्स मशीन डॉक्युमेंट ला चेंज करते व दुसऱ्या फॅक्स मशीनला पाठवते. अशा प्रकारे विशिष्ट डॉक्युमेंटची सेम फोटोकॉपी मिळते.

अलेक्झांडर ब्रेन यांनी 1846 मध्ये या ऐतिहासिक फॅक्स टेक्नॉलॉजी चा आविष्कार केला.

Alexander Bain
Alexander Bain

Fax नंबर म्हणजे काय?

मित्रांनो आपल्या प्रत्येकाचे जसे मोबाईल नंबर वेगवेगळे असतात, तसेच फॅक्स मशीनला देखील वेगवेगळे नंबर असतात ज्याद्वारे आपण आपल्याला हवे असलेल्या फॅक्स मशीन सोबत संपर्क जोडू शकतो.

FAX मशीन चे फायदे

1) बऱ्याच वेळा ईमेल द्वारे मोठ्या फाइल्स ला ट्रान्सफर करण्यासाठी वेळ लागतो, परंतु फॅक्स मशीनद्वारे आपण लार्ज साईजचे डॉक्युमेंट्स देखील खूपच कमी वेळात पाठवू शकतो.

2) फॅक्स मशीन कोणताही सामान्य व्यक्ती देखील सहजरित्या वापरू शकतो. यासाठी कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नाही.

3) फॅक्स मशीन वापरणे स्वस्त आहे.

4) फॅक्स मशीन चा वापर हा खूपच सुरक्षित आहे. यामध्ये कुठलाही मालवेअर घुसण्याची शक्यता नाही.

5) आपण सेट केलेल्या नंबर वरच फॅक्स मशीन फॅक्स पाठवते.

FAX मशीनचे नुकसान

1) फॅक्स मशीन साठी टेलिफोन लाईन खूपच गरजेची आहे. ही जर डाऊन झाली तर फॅक्स पाठवता येत नाही.

2) FAX मशीन खराब देखील होऊ शकते त्यामुळे वेळेवर मशीनची सर्विस करणे गरजेचे आहे.

3) फॅक्स मशीन मध्ये मल्टी टास्किंग चा ऑप्शन नसल्यामुळे आपण एका वेळेस फक्त एकच काम करू शकतो.

4) फॅक्स मशीन द्वारे पाठवण्यात आलेल्या डॉक्युमेंट्स मध्ये काही वेळा अक्षरे छोटी मोठी झालेली असू शकतात.

5) फॅक्स मशीन द्वारे पाठवण्यात आलेल्या इमेज ची क्वालिटी देखील कमी असते.

धन्यवाद

Leave a Comment