IAS चा फुल फॉर्म काय आहे? | IAS full form in Marathi

तुम्ही बऱ्याच वेळा IAS हा शब्द कुठे ना कुठे वाचला किंवा ऐकला असेल. बऱ्याच वेळा आपण वृत्तपत्रांमध्ये किंवा बातम्यांमध्ये वाचले किंवा बघितले असेल की एखादा विद्यार्थी खूप चांगल्या रँक ने IAS झाला. परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना IAS चा फुल फॉर्म माहिती नसतो.

आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला IAS चा फुल फॉर्म आणि याबद्दलची माहिती सांगणार आहोत त्यामुळे IAS FULL FORM IN MARATHI हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा.

IAS चा फुल फॉर्म काय आहे? | IAS full form in Marathi

IAS चा फुल फॉर्म “Indian Administrative Service” असा आहे. मराठीमध्ये याला “भारतीय प्रशासकीय सेवा” असे संबोधले जाते.

IAS बनण्यासाठी काय करावे लागते?

आपल्या भारतामध्ये IAS अधिकारी होण्यासाठी UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. ही परीक्षा देण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर तुमचे वय किमान 21 वर्षे असणे गरजेचे आहे. भारतामध्ये दरवर्षी लाखो मुले UPSC परीक्षेसाठी बसतात.

भारतामध्ये ही परीक्षा सगळ्यात कठीण मानली जाते. विद्यार्थ्याने ही परीक्षा पास केल्यानंतर त्याला IAS, IPS, IES आणि IFS सारख्या पोस्ट दिल्या जातात. वेळेचे योग्य नियोजन, कठीण परिश्रम, अभ्यास, आणि उत्तम मार्गदर्शन जर असेल तर तुम्ही देखील IAS अधिकारी होऊ शकता.

IAS अधिकारी काय कामे करतो?

प्रत्येक जिल्ह्यानुसार वं पोस्टिंगनुसार IAS अधिकाऱ्याला कामे दिले जाते. भारतीय सरकारची प्रशासकीय कामे चालू ठेवणे, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणे, कायद्याची अंमलबजावणी करणे, इत्यादी कामे IAS करतात.

IAS अधिकारी जिल्हाधिकारीच्या रूपात खूप जास्त पॉवरफुल मानला जातो. जिल्ह्यातील सर्व विभागाची जबाबदारी ही IAS कडे असते. पोलीस यंत्रणेबरोबरच इतर अनेक विभागाचे हेड म्हणून IAS अधिकारी काम बघत असतो.

IAS अधिकारी पगार आणि सुविधा

सातव्या वेतन आयोगानुसार IAS अधिकारी यांना 56,100 ते 2,50,000 एवढा पगार दरमहा दिला जातो. या पगाराबरोबरच इतर अनेक भत्ते IAS अधिकाऱ्याला दिले जातात. जसे की डिअरनेस ऑलॉवन्स , घरभाडे, मेडिकल फॅसिलिटी, कनवेन्शन ऑलॉवन्स, इत्यादी. याबरोबर भारतीय सरकारतर्फे यांना फिरायला गाडी, रहायला बंगला, कूक, सुरक्षारक्षक, नोकर – चाकर देखील दिले जातात. विमानप्रवास, रेल्वेप्रवास, फोनबिल वं इतर काही बिल्स चा खर्च देखील भारतीय सरकारद्वारे केला जातो. रिटायर्ड झाल्यानंतर देखील दरमहा लाखो रुपये पेन्शन IAS अधिकाऱ्याला मिळते.

निष्कर्ष –

तर मित्रांनो, आजच्या या लेखात आपण IAS फुल्ल फॉर्म इन मराठी, त्याचबरोबर IAS अधिकारी बनण्यासाठी काय करावे लागते, IAS अधिकारी काय कामे करतो आणि IAS अधिकारीला मिळणाऱ्या सोयीसुविधा आपण सविस्तर जाणून घेतल्या आहेत. तुमच्या काही शंका असतील तर खाली दिलेल्या कंमेंट मध्ये नक्की विचारा.

Leave a Comment