आपल्या भारतामध्ये दहा पैकी पाच मुलांना पुढे जाऊन इंजिनियर व्हायचे असते. एखाद्या लहान मुलाला जरी आपण विचारले तरी बरेच जण मला मोठा होऊन इंजिनियर व्हायचंय असे म्हणतात. थोडा मोठा झाल्यानंतर बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की त्यांना IIT मधून इंजिनिअरिंग करायचं आहे.
IIT हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल, त्याचबरोबर इकडे ऍडमिशन मिळणे देखील फार अवघड मानले जाते. परंतु तुम्हाला IIT full form in Marathi माहिती आहे का? आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला IIT full form in Marathi, IIT म्हणजे काय? IIT ची FEES त्याचबरोबर आयआयटी बद्दल इतर सर्व माहिती सांगणार आहोत.
IIT full form in Marathi | आयआयटी फुल फॉर्म इन मराठी
IIT म्हणजेच Indian Institute of Technology ( इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी). मराठीमध्ये आपण याला भारतीय तंत्रज्ञान संस्था असे म्हणतो.
IIT म्हणजे नेमकं काय ?
IIT ही भारतात असणारी शैक्षणिक संस्था आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था फक्त अभियांत्रिकी आणि विज्ञान या क्षेत्रातील शिक्षण विद्यार्थ्यांना पुरवते.
IIT ही सरकारी संस्था असून भारतीय सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. आजच्या घडीला भारतामध्ये एकूण 23 IIT आहेत. ज्या सर्व ऑटोनॉमस म्हणजेच स्वायत्त आहेत. ज्यांचा कारभार ते स्वतः सांभाळतात.
भारतामध्ये IIT चे शिक्षण हे उच्च स्तराचे मानले जाते, भारत तथा जगभरामध्ये IIT या संस्थांनी नावलौकिक मिळवला आहे.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये या IIT स्थित असून इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची सुविधा देखील उपलब्ध आहे. आयआयटी या संस्थांमध्ये प्रामुख्याने इंजिनिअरिंग साठी प्रवेश दिला जातो, याचबरोबर पदवी उत्तर अभ्यासक्रम म्हणजेच एम एस सी, एम टेक साठी देखील तुम्ही आयआयटीमध्ये प्रवेश घेऊ शकता.
इंजीनियरिंग मध्ये देखील वेगवेगळ्या शाखा उपलब्ध आहेत जसे की सिव्हिल इंजीनियरिंग,मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कंप्यूटर इंजीनियरिंग, इत्यादी शाखांमध्ये तुम्ही पदवी प्राप्त करू शकता.
IIT मधून पीएचडी देखील प्राप्त करता येते.
IIT साठी प्रवेश परीक्षा व पात्रता
आयआयटी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला JEE ही पूर्व परीक्षा द्यावी लागते. JEE ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. जर तुम्हाला पदव्युत्तर कोर्स करायचा असेल तर GATE ही पूर्व परीक्षा द्यावी लागते.
जे विद्यार्थी बारावी विज्ञान शाखेतून शिकत आहेत किंवा उत्तीर्ण झालेले आहेत असे विद्यार्थी IIT JEE या परीक्षेसाठी पात्र असतात.
भारतामध्ये ही एक खूप जास्त प्रतिष्ठित नावाजलेली परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो मुले या परीक्षेसाठी बसतात.
या परीक्षेला बसण्यासाठी तुम्हाला बारावीला Maths म्हणजेच गणित हा विषय असणे आवश्यक आहे.
ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला IIT engineering colleges मध्ये प्रवेश मिळतो.
JEE परीक्षेचे स्वरूप
IIT JEE ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. मुख्यतः दोन पायऱ्यांमध्ये ही परीक्षा घेतली जाते.
- IIT JEE Mains
- IIT JEE advance
IIT JEE MAINS ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आणि गुणवत्ता यादीत पात्र ठरल्यानंतरच IIT JEE Advanced ही एक्झाम तुम्ही देऊ शकता.
IIT JEE advance ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादीत तुमचे नाव आल्यास तुम्हाला तुमच्या गुणांनुसार आयआयटी कॉलेजेस मध्ये प्रवेश दिला जातो.
IIT JEE ही एक्झाम संगणकावर आधारित असून यामध्ये MCQ टाईप प्रश्न विचारले जातात. ज्यामध्ये तुम्हाला तीन तासांचा कालावधी दिला जातो.
IIT colleges साठी किती फी आहे?
IIT colleges च्या फीज बद्दल बोलायचं झालं तर तुम्ही कोणत्या कोर्ससाठी प्रवेश घेत आहात यावर हे अवलंबून आहे. जर तुम्ही जनरल कॅटेगरी मध्ये असाल तर आठ ते दहा लाख रुपये फी मोजावी लागेल. SC, ST, OBC विद्यार्थ्यांसाठी फीस मध्ये concession मिळते.