IPS चा फुल फॉर्म काय आहे? । IPS full form in Marathi

IPS हा शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा लगेच आपल्या डोळ्यासमोर एखादा पोलीस ऑफिसर दिसतो. बऱ्याच वेळा चित्रपटांमध्ये आपण IPS हिरो किंवा हिरोईन बघितली असेल. किंवा न्यूज मध्ये किंवा पेपर मध्ये IPS हे नाव नक्कीच वाचले असेल. परंतु आपल्याला आयपीएस (IPS ) चा फुल फॉर्म माहिती आहे का? किंवा आयपीएस कसे बनता येते याची माहिती जाणून घ्यायचा तुम्ही प्रयत्न कधी केला आहे का?

आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला IPS चा फुल फॉर्म सांगणार आहोत. त्याचबरोबर IPS म्हणजे काय? आयपीएस कसे होता येते? आयपीएस चे वेतन आणि सुविधा याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

IPS चा फुल फॉर्म काय आहे? | IPS full form in Marathi

सर्वात आधी आपण आयपीएस ( IPS ) चा फुल फॉर्म जाणून घेऊ.  IPS चा फुल फॉर्म Indian Police Service” असा आहे, मराठीमध्ये याला “भारतीय पोलीस सेवा” असे म्हटले जाते.

IPS meaning in Marathi 

IPS हे एक भारतीय सरकार तर्फे दिले जाणारे पोलीस ऑफिसरचे एक उच्च पद आहे. आयपीएस अधिकारी हा त्याला दिलेल्या प्रदेशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सांभाळत असतो. लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही IPS वर असते. IPS हा जिल्ह्यातील सगळ्यात मोठा पोलीस अधिकारी असतो.

आपल्या प्रदेशामध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांवर आळा बसवणे हे आयपीएस चे काम असते. जसे की चोरी, खून, दंगल, इत्यादी गोष्टी होऊ नयेत यासाठी आयपीएस अधिकारी कार्य करत असतो.

आयपीएस IPS होण्यासाठी पात्रता काय असते?

 1. आयपीएस होण्यासाठी तुम्हाला UPSC नागरी सेवा परीक्षा पास व्हावी लागते.
 2. यासाठी तुमचे आयुर्मान कमीत कमी 21 वर्षे असणे गरजेचे आहे.
 3. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवाराने पदवी मिळवणे आवश्यक आहे.
 4. उमेदवार भारताचा नागरिक असणे बंधनकारक आहे.
 5. जनरल कॅटेगिरी साठी 32 वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
 6. तर SC /ST साठी कमाल वयोमर्यादा ही 37 वर्षे आहे तर ओबीसी साठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आहे.

UPSC या परीक्षेमध्ये तीन पायऱ्या असतात, पूर्व, मुख्य आणि मुलाखत. या परीक्षेसाठी तुम्हाला मुख्यतः सामान्य ज्ञान, इतिहास नागरीशास्त्र,अर्थशास्त्र, गणित, इंग्रजी इत्यादी विषयांचा अभ्यास करावा लागतो. भारतामध्ये दरवर्षी लाखो मुले ही परीक्षा देतात आणि म्हणूनच या परीक्षेसाठी खूप जास्त स्पर्धा आहे.

आयपीएस (IPS ) परीक्षेद्वारे कोण कोणत्या पदांवर नियुक्ती केली जाते?

 • सहायक पोलिस अधीक्षक (ASP) । Assistant Superintendent of Police
 • पोलिस महानिरीक्षक (IGP) । Inspector-General of Police
 • पोलिस उपअधीक्षक (DSP) । Deputy Superintendent of Police
 • पोलिस महासंचालक (DGP) । Director-General of Police
 • अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ASP) । Additional Superintendent of Police
 • पोलिस अधीक्षक (SP) । Superintendent of Police
 • पोलिस उपमहानिरीक्षक (DIG) । Deputy Inspector General of Police

IPS चे वेतन आणि सुविधा

आयपीएस ची सॅलरी ही त्याच्या पदावर अवलंबून असते. भारतात सातव्या वेतन आयोगानुसार IPS चे वेतन दरमहा 56,100 ते 225,000 एवढे आहे. याव्यतिरिक्त आयपीएसला बऱ्याच प्रकारचे भत्ते दिले जातात. वेळेनुसार आणि प्रमोशन नुसार आयपीएस चा पगार हा वाढत जातो.

आयपीएस ला मिळणाऱ्या इतर सुविधा

आयपीएस ऑफिसर ला त्याच्या पगारा आणि भत्त्यांव्यतिरिक्त इतर अनेक सुविधा सरकार पुरवते. ज्यामध्ये प्रामुख्याने घर, गाडी, कुक, नोकर चाकर, सुरक्षा रक्षक, पेट्रोल,मोबाईल बिल, इत्यादींचा समावेश आहे. या व्यतिरिक्त रेल्वे प्रवास व विमान प्रवासाचा खर्च देखील भारतीय सरकार उचलते.

निष्कर्ष –

तर मित्रांनो, आजच्या या लेखात आपण IPS फुल्ल फॉर्म इन मराठी, त्याचबरोबर IPS अधिकारी बनण्यासाठी काय करावे लागते, IAS अधिकारी काय कामे करतो आणि IAS अधिकारीला मिळणाऱ्या सोयीसुविधा, वेतन याबद्दल आपण सविस्तर जाणून घेतल्या आहेत. तुमच्या काही शंका असतील तर खाली दिलेल्या कंमेंट मध्ये नक्की विचारा.

Leave a Comment