इस्रो फुल फॉर्म इन मराठी | ISRO full form in Marathi 

नमस्कार मित्रांनो,

आपल्या भारताची स्पेस एजन्सी ISRO ने यशस्वीपणे चंद्रावरती लँड केले आहे. आणि या अभूतपूर्व गोष्टीची भारताबरोबरच संपूर्ण जगाने दखल घेतली. ISRO चा डंका संपूर्ण जगामध्ये वाजला. पण मित्रांनो तुम्हाला इसरो चा फुल फॉर्म माहिती आहे का? नसेल माहिती तर आजच्या या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला ISRO full form in Marathi, आणि इसरो बद्दल अधिक माहिती सांगणार आहोत.

ISRO full form in Marathi | इसरो फुल फॉर्म इन मराठी

ISRO म्हणजेच “Indian Space Research Organisation”. आपल्या मराठीमध्ये याला भारतीय अंतराळ संशोधन संस्था असे म्हटले जाते. इस्रोचे मुख्यालय बंगलोर येथे असून ही संस्था जगातील सर्वात मोठ्या संस्थांपैकी एक आहे. आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी अंतराळ विज्ञान आणि संशोधन करून देशाची या क्षेत्रामध्ये प्रगती करणे हे इस्रोचे उद्दिष्ट आहे.

ISRO बद्दल अधिक माहिती

15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना झाली. याआधी या संस्थेला INCOSPAR(Indian National Committee for Space Research) या नावाने ओळखले जायचे. भारताच्या या संस्थेवर पंतप्रधान देखरेख करतात. आजच्या घडीला जवळपास 20 हजार कर्मचारी इस्रो मध्ये काम करत आहेत आणि जवळपास 14000 करोड रुपये इस्रोचे वार्षिक बजेट आहे.

मित्रांनो तुमच्या माहिती साठी, 1920 साली एस के मित्रा(शिशिर कुमार मित्रा) यांनी ionosphere व रेडिओ याबाबत बरेच प्रयोग केले. पुढे जाऊन सी व्ही रमण व मेघनाथ सहा यांनी अंतराळ संशोधनाचे बरेच कार्य केले. विक्रम साराभाई व डॉक्टर होमी भाभा यांनी अंतराळ संशोधनाच्या कामामध्ये आपले मोलाचे योगदान दिले. अंतराळ संशोधनासाठी लागणारे प्राथमिक प्रयोग यशस्वीपणे पार पाडले.

यानंतर 1980 च्या दशकापासून भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी ISRO मध्ये मोलाची कामगिरी बजावली. भारताला सुरक्षित करण्यासाठी अनेक क्षेपणास्त्र त्यांनी बनवली. अनेक बॅलेस्टिक मिसाईल त्याचबरोबर 1980 च्या दशकात रोहिणी उपग्रह देखील त्यांच्याच काळात ISRO द्वारे launch करण्यात आला.

इसरो से उद्दिष्ट

1) वेगवेगळ्या स्पेस मिशनचे डिझाईन करणे, उपग्रह तयार करणे, प्रक्षेपणाद्वारे स्पेस बद्दल अधिक माहिती जाणून घेणे हे इस्रोचे उद्दिष्ट आहे.

2) रिमोट सेन्सिंग उपग्रह, नेव्हिगेशन उपग्रह, दळणवळणाचे उपग्रह इत्यादी अनेक उपग्रहांवर इसरो लक्ष ठेवते.

3) देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपग्रह विकसित करणे, गुप्तचर माहिती गोळा करणे, व भारतीय सैन्याला मदत करण्याचे काम देखील इस्रो करते.

4) पर्यावरणात होणारे बदल, आपत्तींचे निरीक्षण, महासागरांबद्दलची माहिती आणि विविध डेटा ISRO गोळा करते.

इस्रोच्या पुढील मोहिमा :-

आदित्य L1, गगनयान, मंगळयान 2, छोटे उपग्रह अंतराळात सोडणे, इत्यादी इस्रोच्या पुढील मोहिमा आहेत.

धन्यवाद

Leave a Comment