JEE full form in Marathi | जे ई ई फुल फॉर्म इन मराठी

JEE full form in Marathi | जे ई ई फुल फॉर्म इन मराठी

JEE हे नाव तुम्ही नक्कीच कुठे ना कुठेतरी ऐकले किंवा वाचले असेल. ज्या विद्यार्थ्यांना आपले पुढील शिक्षण वैद्यकीय क्षेत्रामध्ये करायचे आहे, म्हणजेच डॉक्टर बनायचे आहे अशांना NEET ही परीक्षा द्यावी लागते. अगदी याच प्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना आपले करिअर अभियांत्रिकी(Engineering) मध्ये करायचे आहे अशांना JEE ही परीक्षा द्यावी लागते. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ही परीक्षा दिली असेल किंवा काही जण देणार असतील, परंतु तुम्हाला JEE चा फुल फॉर्म माहिती आहे का?

आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला JEE full form in Marathi, JEE म्हणजे काय आणि JEE बद्दल इतर सर्व माहिती सांगणार आहोत.

JEE full form in Marathi । जेईई फुल फॉर्म इन मराठी

JEE म्हणजे “JOINT ENTRANCE EXAMINATION” (जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन) मराठीमध्ये आपण याला संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणतो.

JEE म्हणजे काय? । JEE meaning in Marathi

JEE म्हणजेच “JOINT ENTRANCE EXAMINATION” होय. ज्या विद्यार्थ्यांना आपले करिअर अभियांत्रिकी मध्ये करायचे आहे अशा सर्वांना ही परीक्षा द्यावी लागते. जर तुम्हाला भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) आणि इतर सरकारी तंत्रज्ञान संस्था (GFIT) विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर JEE परीक्षा देणे अनिवार्य आहे.

JEE ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते । JEE MAINS आणि JEE ADVANCED.

JEE MAINS :-

 • जे विद्यार्थी जेईई मेन्स या परीक्षेमध्ये पास होतात तेच विद्यार्थी जेईई ऍडव्हान्स साठी पात्र असतात.
 • भारतीय राष्ट्रीय परीक्षा NTA द्वारे या परीक्षेचे आयोजन करण्यात येते.
 • गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांवर आधारित विविध प्रश्न विचारले जातात.
 • मराठीसह इतर अनेक भाषांमध्ये ही परीक्षा आपल्याला देता येते.
 • दोन सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. जानेवारी ते एप्रिल. JEE MAIN PAPER 1 आणि JEE MAIN PAPER 2.
 • JEE MAIN PAPER 1 हा BE /BTech प्रवेशासाठी आहे तर paper 2 हा B. Arch साठी आहे.

JEE MAINS परीक्षा पद्धत :-

 • ऑनलाइन पद्धतीने कम्प्युटर वरती तुमची परीक्षा घेतली जाते.
 • या परीक्षेसाठी तुम्हाला एकूण तीन तासांचा कालावधी दिला जातो. दिव्यांग परीक्षार्थीसाठी चार तासांचा कालावधी दिला जातो.
 • बहुविकल्पीय म्हणजेच MCQ s प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. चार पर्यायांपैकी एक पर्याय योग्य असतो.

एकूण 90 प्रश्नांसाठी 300 गुण असतात.

 • गणित – 100
 • भौतिकशास्त्र -100
 • रसायनशास्त्र – 100

JEE MAINS पेपर 2 :-

राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी ही परीक्षा मुख्यतः अभियांत्रिकी आणि वास्तुकला अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाते.

JEE mains चा दुसरा पेपर हा दोन अभ्यासक्रमांसाठी घेतला जातो.

B. Arch. आणि B. Planning

परीक्षा पद्धत :-

ही परीक्षा देखील ऑनलाईन घेतली जाते ज्यामध्ये गणित आणि ॲप्टीट्यूड टेस्ट घेतली जाते.

Offline – रेखांकन परीक्षा (drawing test)

B. Planning ही परीक्षा ऑनलाईन घेतली जाते व या दोन्ही परीक्षांसाठी तीन तासांचा कालावधी असतो.

JEE ADVANCED :-

 • ही परीक्षा केवळ JEE MAINS उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देऊ शकतात ज्यामुळे त्यांना आयआयटी मध्ये प्रवेश मिळू शकतो.
 • या परीक्षेमध्ये देखील गणित, भौतिकशास्त्र आणि रासायनिक शास्त्राबद्दल प्रश्न विचारले जातात.
 • जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात अशा विद्यार्थ्यांना भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मध्ये प्रवेश मिळतो.

JEE Advanced पेपर 2 विभाग –

विभाग विभाग 1 (गुण) विभाग 2 (गुण) विभाग 3 (गुण) विभाग 4 (गुण)
भौतिकशास्त्र 12 12 24 12
रसायनशास्त्र 12 12 24 12
गणित 12 12 24 12

एकूण 180 गुणांच्या या परीक्षेमध्ये तीन तासांचा कालावधी दिला जातो.

JEE नंतर करिअरच्या संधी :-

JEE या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, तुम्हाला भारतातील नामांकित आयआयटीमध्ये प्रवेश मिळतो व इथून पदवी मिळवल्यानंतर  तुम्ही सरकारी किंवा खाजगी कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करू शकता. IIT मधून पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना लाखो रुपये पगार असलेली नोकरी मिळते.

धन्यवाद.

Leave a Comment