भारतात पूर्वीच्या काळी गाव खेड्यांमध्ये व बऱ्याच ठिकाणी जेवण बनवण्यासाठी चुलींचा वापर केला जायचा. यासाठी बऱ्याच प्रमाणात वाळलेल्या लाकडाची आवश्यकता असायची आणि त्यामुळे वृक्षतोड देखील मोठ्या प्रमाणात होत होती. चुलीतून निघणाऱ्या धुरांमुळे घरातील स्त्रियांना देखील त्रास व्हायचा. यामुळे श्वसनाचे विकार देखील मोठ्या प्रमाणावर वाढले होते.
परंतु जसजसा काळ बदलत गेला तसा एलपीजी सिलेंडरचा वापर वाढत गेला. भारत सरकारने सर्व ठिकाणी LPG सिलेंडर पोहोचवायला सुरुवात केली. ज्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. परंतु या LPG चा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का? LPG गॅस म्हणजे नेमकं काय? LPG गॅस चा वापर? LPG गॅस चे फायदे इत्यादी माहिती आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.
LPG full form in Marathi | एलपीजी फुल फॉर्म इन मराठी
LPG म्हणजे “Liquified Petroleum gas”. मराठी भाषेमध्ये आपण याला “द्रविभूत पेट्रोलियम वायू” असे म्हणू शकतो.
LPG म्हणजे काय? | What is LPG in Marathi
LPG म्हणजे liquefied Petroleum gas होय. हा एक प्रकारचा ज्वलनशील वायू असून भारतामध्ये याचा वापर मुख्यतः जेवण बनवण्यासाठी स्वयंपाक घरात केला जातो. या गॅस मध्ये इतरही अनेक चांगले गुणधर्म असल्या कारणाने ऊर्जा स्त्रोत म्हणून याचा वापर केला जातो.
हा वायू सहज साठवता येत असल्यामुळे सिलेंडर मध्ये साठवून याचा सर्वत्र उपयोग केला जातो.
LPG गॅस चा वापर
जसे की आम्ही वरती सांगितले आहे एलपीजी गॅस चा वापर हा भारतामध्ये स्वयंपाक घरात जास्त केला जातो. हा वायू मुख्यतः वायु स्वरूपात असतो परंतु सिलेंडर मध्ये दाबून भरून हा वायू द्रव स्वरूपात साठवून वापरला जातो.
या वायूला कोणताही गंध, रंग किंवा चव नाही. परंतु सिलेंडर मध्ये भरण्याआधी या वायूमध्ये प्रोपेन आणि बीटेन नावाचा गंध असलेला वायू मिसळला जातो, जेणेकरून सिलेंडर जर कधी लीक झाला तर लोकांना वास येऊन लिकेज थांबवता येईल.
हा वायू अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे जर आगीच्या संपर्कात आला तर स्फोटकाचे काम करतो. आणि म्हणूनच स्वयंपाक घरातील गळती थांबवण्यासाठी याच्यामध्ये इतर गंध असलेले वायू सोडले जातात ज्यांचं प्रमाण अगदी नगण्य असतं. जगभरामध्ये जरी या वायूचा उपयोग स्वयंपाक घरात केला जात असला तरी देखील बऱ्याच ठिकाणी या वायूचा उपयोग गाड्यांमध्ये इंधन म्हणून देखील केला जातो.
बऱ्याच कारखान्यांमध्ये देखील या एलपीजी गॅस चा वापर केला जातो जसे की पोलाद कारखाने, काचेच्या वस्तू बनवणारे कारखाने इत्यादी.
LPG गॅस स्वयंपाकासाठी वापरणे सुरक्षित असते का?
LPG गॅस मध्ये कोणत्याही प्रकारचे विषारी वायू नसतात, त्यामुळे या गॅस मधून निघणाऱ्या धुरामुळे कोणताही आजार होऊ शकत नाही. हा वायू कोणत्याही प्रकारचे प्रदूषण करत नसल्यामुळे तुमच्या आरोग्याला, व आपल्या पृथ्वीवरील ओझोन थराला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
लाकूड जाळल्यानंतर अनेक प्रकारचे विषारी वायू बाहेर निघतात, ज्यामुळे गंभीर श्वसनाचे विकार होऊ शकतात. परंतु एलपीजी सिलेंडर मधील हा वायू द्रव स्वरूपात असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे श्वसनाचे विकार आपल्याला होत नाहीत.
त्यामुळे LPG सिलेंडर वापरणे हे पूर्णपणे सुरक्षित मानले जाते.
धन्यवाद.