जर तुम्ही देखील आत्ता कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये शिकत असाल, आणि भविष्यामध्ये तुमचं देखील एमबीए करायचं स्वप्न असेल, तर तुम्हाला MBA बद्दल नक्कीच माहिती घेतली पाहिजे. सर्वात आधी एमबीए (MBA) चा फुल फॉर्म जाणून घेणे फार महत्त्वाचा आहे. आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला MBA full form in Marathi बरोबरच, MBA मध्ये किती प्रकारचे स्पेसिलायझेशन तुम्ही करू शकता, MBA झाल्यावर तुम्हाला मला किती रुपये वेतन मिळू शकते?, MBA ची FEES किती आहे? इत्यादी माहिती जाणून घेणार आहोत.
बऱ्याच वेळा तुम्ही MBA हा शब्द कुठे ना कुठे वाचला किंवा ऐकला असेल. आपल्या नातेवाईकांमध्ये देखील काही जणांनी एमबीए ही डिग्री घेतली असेल. परंतु आपल्याला एमबीए चा फुल फॉर्म माहिती आहे का? नसेल तर हे आर्टिकल शेवटपर्यंत जरूर वाचा.
एमबीए फुल फॉर्म इन मराठी | MBA full form in Marathi
MBA म्हणजेच Master of Business Administration (मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन). आंतरराष्ट्रीय स्तरावर या पदवीला मान्यता आहे. दोन वर्षांचा कालावधी असलेल्या पदवीमध्ये तुम्हाला व्यवसायाचे व्यवस्थापन, प्रशासन आणि इतर अनेक गोष्टी शिकवल्या जातात.
What is MBA in Marathi | MBA म्हणजे नेमकं काय?
मास्टर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन ही एक पदव्युत्तर घेतली जाणारी पदवी आहे. जर तुम्हाला बिजनेस बद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर ही डिग्री तुमच्यासाठी फार महत्त्वाची ठरू शकते. ही डिग्री मिळवण्यासाठी तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण असणे गरजेचे आहे. ही डिग्री दोन वर्षांची असून यासाठी तुम्हाला आधी Entrance examination(प्रवेश परीक्षा) क्लियर करावी लागते. ज्यामध्ये मुख्यतः CAT, MAT, XAT इत्यादी परीक्षांचा समावेश होतो.
- CAT – Common Admission Test
- MAT – Management Aptitude Test
- XAT – Xavier Aptitude Test
आज देश विदेशात एमबीए प्रोफेशनल ची मागणी वाढत आहे.
MBA साठी किती फीस आहे?
एमबीए कॉलेजची फी ही कॉलेजच्या रेपूटेशनवर निर्धारित असते. भारतातील काही टॉप एमबीए कॉलेजची फीज ही 15 ते 20 लाखाच्या घरात आहे. तर काही सरकारी कॉलेजची फीज ही पन्नास हजार ते चार लाख यादरम्यान आहे.
MBA मध्ये किती प्रकारचे स्पेशलायझेशन तुम्ही करू शकता?
- General management
- Human resource
- Marketing
- Finance
- Digital media
- Operation management
- Global management
- Engineering Management
- Technology Management
- Consulting
MBA केल्यानंतर किती salary मिळते?
भारतामध्ये तुम्ही एमबीए कोणत्या कॉलेजमधून करत आहात यावर तुमची सॅलरी सर्वस्वी अवलंबून असते. जर तुम्ही भारतातल्या टॉप कॉलेजमधून एमबीए करत असाल तर तुम्हाला जवळपास 15 ते 20 लाखांचे पॅकेज देखील मिळू शकते.
जर तुम्ही एखाद्या साधारण विद्यालयातून MBA ची डिग्री घेत असाल तर तुम्हाला चार ते पाच लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज नक्कीच मिळू शकते. जसजसे तुमचे या क्षेत्रामध्ये ज्ञान आणि अनुभव वाढत जातो तस तसा तुमचा पगार देखील वाढत जातो.
तुम्ही देखील एमबीए करून चांगल्या प्रकारे तुमचे करिअर घडवू शकता.
निष्कर्ष –
मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण MBA फुल फॉर्म इन मराठी, त्याचबरोबर एमबीए बद्दलची इतर माहिती जाणून घेतली. तुम्हाला आमचा हा आर्टिकल कसा वाटला याबद्दल कॉमेंट बॉक्स मार्फत नक्की कळवा.