MSCIT full form in Marathi । MSCIT course म्हणजे काय?
मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये आपण एम एस सी आय टी(MSCIT) संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला सुद्धा MSCIT कोर्स करायचा आहे का? तुम्हाला या कोर्सची fees, duration जाणून घ्यायचे आहे का? तसेच हा कोर्स केल्यानंतर तुम्ही कुठे कुठे जॉब साठी अप्लाय करू शकता यासंबंधी संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला देणार आहे.
What is MSCIT Course in Marathi
मित्रांनो MSCIT म्हणजे “Maharashtra State Certificate in Information Technology”. जो राष्ट्र सरकारद्वारे माहिती तंत्रज्ञान (IT) संबंधी एक साक्षरता अभ्यासक्रम आहे. MSCIT हा तीन महिन्यांचा कोर्स MKCL म्हणजे Maharashtra Knowledge Corporation Limited यांनी 2001 मध्ये सुरुवात केली होती. आता पर्यंत 1.5+ करोड पेक्षा अधिक लोकांनी या कोर्स च्या माध्यमातून सर्टिफिकेट मिळवले आहे.
MSCIT मध्ये अभ्यासक्रम कोणता असतो?
MSCIT मध्ये तुम्हाला Windows ऑपरेटिंग सिस्टम, MS Word, MS Excel, MS PowerPoint, MS outlook यासंबंधी कम्प्युटर संबंधीची माहिती तुम्हाला या कोर्समध्ये शिकवली जाते. सोबत कम्प्युटर चालू कसं करायचं, कसा बंद करायचं, रिस्टार्ट कसे करायचे याविषयीची बेसिक माहिती या कोर्समध्ये शिकवली जाते. याचबरोबर तुम्ही कम्प्युटर आणि मोबाईल वापरताना स्वतःची आणि स्वतःच्या ऑनलाईन आयडेंटिटीची काळजी कशी घ्यायची याबाबत देखील तुम्हाला परिपूर्ण ज्ञान दिले जाते. या पूर्ण कोर्सची विभागणी 50 सेशन्स मध्ये करण्यात आलेली आहेत. प्रत्येक सेशन हे दोन तासाचा आहे. आणि जर तुम्ही प्रत्येक सेशन हे दररोज कम्प्लीट केले तर 50 दिवसात तुम्ही हा कोर्स पूर्ण करू शकता.
MSCIT ची परीक्षा कधी होते?
एम एस सी आय टी चा पेपर हा 100 मार्कचा असतो. ज्यामधील 50 मार्क्स हे तुम्ही 50 सेशन्स मधून मिळवू शकता आणि राहिलेले 50 मार्क्स हे तुम्ही जी शेवटला एक्झाम द्याल त्याबद्दल तुम्हाला भेटतील. ही फायनल एक्झाम msbte द्वारे घेतली जाते. परीक्षेची तारीख तुम्हाला परीक्षेच्या काही दिवस आधी कळवण्यात येते. मात्र शेवटच्या फायनल एक्झाम मध्ये तुम्हाला पात्र होण्यासाठी तुमच्या 50 सेशन्स मधून 20 मार्क्स तुम्हाला मिळणं अपेक्षित असते. तसेच हि परीक्षा झाल्यावर लगेच तुम्हाला एक तात्पुरते प्रमाणपत्र दिले जाते आणि फायनल सर्टिफिकेट तुम्हाला ३ महिन्यानंतर तुमच्या सेंटर ला भेटून जाते, तसेच जर तुम्ही या परीक्षेत fail झालात तर तुम्ही 500 रुपये देऊन पुन्हा १ महिन्यानंतर परीक्षा देऊ शकता. तसेच तुम्ही हि परीक्षा इंग्लिश, हिंदी आणि मराठी यांपैकी कोणत्याही हि भाषेत देऊ शकता.
MSCIT course ची फीज किती असते?
MSCIT course ची फीज 4000-5000 एवढी लागते. MSCIT यासाठी तुम्ही कोणत्याही जवळच्या एमएससीआयटी इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन या कोर्स संबंधीचे अधिक माहिती विचारू शकता का.
MSCIT कोर्स दहावी नंतर करावा कि बारावी नंतर करावा ?
MSCIT तुम्ही कधीही करू शकता. पण मी तुम्हाला सल्ला देईन कि तुम्ही दहावी झाल्यानंतर लगेच एमएससीआयटी कोर्स करून घ्या. कारण बारावी नंतर CET परीक्षेची तयारी करायची असते, त्यामुळे तुम्हाला MSCIT साठी तेव्हा वेळ देता येणार नाही.
MSCIT प्रमाणपत्र किती महत्त्वाचा आहे?
मित्रांनो तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर एम एस सी आय टी चा सर्टिफिकेट खूपच महत्त्वाचं होते. कारण आता प्रत्येक सरकारी जॉब ला apply करताना MSCIT सर्टिफिकेट मागितले जाते.