एनसीसी फुल फॉर्म इन मराठी । NCC full form in Marathi

तुम्ही शाळेत असताना बऱ्याच वेळा NCC पथक जॉईन केलं असेल. बऱ्याच कवायती आणि शाळेमध्ये धमाल देखील केली असेल. परंतु NCC चा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का? आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला NCC full form in Marathi सांगणार आहोत.

NCC म्हणजे National Cadet Corps(नॅशनल कॅडेट कॉरप्स) होय. मराठी भाषेमध्ये याला “राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा दल” असे म्हटले जाते. तर हिंदीमध्ये याला राष्ट्रीय छात्र सुरक्षा दल असे संबोधले जाते.

NCC म्हणजे काय? । NCC meaning in Marathi

NCC म्हणजे National Cadet Corps. आपल्या भारताच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आपले जवान हे 24 तास तैनात आहेत. परंतु जर देशाच्या अंतर्गत काही आणीबाणीची वेळ आली तर आपल्या जवानांची कमतरता भासू नये म्हणून, NCC ची स्थापना करण्यात आली. शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एनसीसी पथकामध्ये भरती केले जाते.

या पथकामध्ये विद्यार्थ्यांना शिस्त,अनुशासन, त्याचबरोबर काही शस्त्रांचं ज्ञान दिलं जातं. अशा विद्यार्थ्यांना जर पुढे जाऊन भारतीय सैन्यामध्ये सेवा द्यायची असेल तर ते NCC पथक जॉईन करू शकतात. भारतीय सैन्यामध्ये अशा विद्यार्थ्यांना पहिले प्राधान्य दिले जाते.

इंडियन आर्मी मध्ये भरती झाल्यानंतर जे काही सुरुवातीचे प्रशिक्षण दिले जाते, ते एनसीसी कॅडेट्सला देखील दिले जाते.

NCC ची स्थापना केव्हा झाली?

NCC HISTORY बद्दल बोलायचे झाले तर Pandit HN Kunzru यांनी 16 एप्रिल 1948 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर लगेचच काही दिवसांमध्ये एनसीसी ची स्थापना दिल्ली येथे केली. एनसीसी चे मुख्यालय आजही दिल्ली येथे स्थित आहे. भारतीय आर्मी नंतर एका तरुण पिढीची फळी तयार करणे हे उद्देश एनसीसी चे होते. एनसीसी नॅशनल कॅडेट कॉरप्स ऍक्ट देखील तयार करण्यात आला.

आणीबाणीच्या काळासाठी राखीव मनुष्यबळ तयार करणे हा NCC चा मुख्य हेतू त्यावेळेस होता. परंतु आता स्वतंत्र नागरी सेवा करणे हा एनसीसीचा मुख्य हेतू आहे.

NCC चे ब्रीदवाक्य आणि ध्वज

तरुण पिढीमध्ये सैन्याविषयी आकर्षण निर्माण करणे व सैन्याबद्दल आत्मीयता निर्माण करण्यात एनसीसी यशस्वी ठरली आहे. एनसीसी चे आताचे ब्रीद वाक्य “ऐक्य आणि शिस्त” असे आहे.

1954 साली NCC चा ध्वज तयार करण्यात आला ज्यामध्ये, लाल, निळा आणि आकाशी हे रंग वापरलेले आहेत. Unity and discipline हे ब्रीद वाक्य देखील यावर कोरलेले आहे.

निष्कर्ष 

तर मित्रांनो मला अशा आहे NCC full form in Marathi च्या लेखात दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. तुमचे काही doubts असतील तर खाली कंमेंट मध्ये नक्की विचारा.

Leave a Comment