NPCI Full Form in Marathi : आजच्या या पोस्टमध्ये आपण NPCI या संस्थेची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यापैकी अनेकांना NPCI चा Full Form माहीत नसेल त्यामुळे खास ही गोस्ट लक्षात घेऊन आम्ही हा लेख बनवला आहे. या लेखात आपण NPCI Full Form, NPCI काय आहे, NPCI कशी कार्य करते, हे सर्व पाहणार आहोत. तर चला सुरू करूयात.
एनपीसीआई (NPCI) चा फुल फॉर्म | NPCI Full Form in Marathi
NPCI चा फुल्ल फॉर्म “National Payments Corporation of India” असा आहे. National Payments Corporation of India (NPCI) याला मराठी मध्ये “नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया” असे म्हणतात. आता आपण NPCI काय आहे?, हे पाहुयात.
NPCI काय आहे?
National Payments Corporation of India (NPCI) ही Reserve Bank of India (RBI) आणि Indian Banks Association (IBA) यांनी एकत्रित स्थापन केलेली संस्था आहे. भारतातील किरकोळ पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम चालवण्याचे कार्य NPCI संस्थेकडे असते. NPCI चा प्रचार भारतातील दहा बँक करतात, म्हणजेच या बँका NPCI च्या प्रवर्तक आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे-
स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, सिटी बँक, HSBC आणि ICICI बँक.
स्थापना
NPCI ची स्थापना Payment and Settlement Systems Act, 2007 अंतर्गत 2008 मध्ये झाली आहे. NPCI ही “ना नफा” कंपनी आहे जी Companies Act 2013 च्या 8 व्या विभागात येते. कंपनी चे मुख्यालय मुंबई मध्ये आहे.
उद्दिष्टे
1) NPCI चे मुख्य उद्दिष्ट देशातील सर्व किरकोळ पेमेंट व्यवहारांसाठी देशव्यापी मानक एकसमान आणि व्यवसाय प्रक्रियेमध्ये विविध सेवा स्तरांसह पेमेंटसाठी अनेक प्रणाली एकत्र करणे हे आहे.
2) सर्वांना परवडणारी एक पेमेंट प्रणाली तयार करणे आणि तिचा विकास करणे जेणेकरून दररोज लहान-लहान पेमेंट करणाऱ्या सामान्य माणसाला पैशाची आणि वेळेची बचत करून या प्रणाली चा लाभ घेता येईल.
3) किरकोळ विक्रेत्यांना दैनंदिन आधारावर वापरण्यासाठी परवडणारी देशव्यापी यंत्रणा डिझाइन करणे आणि अमलात आणणे.
उत्पादने
NPCI ने वेळोवेळी आपल्या उत्पादनांद्वारे बँकिंग क्षेत्रात आपले अनमोल योगदान नोंदवले आहे. NPCI ने प्रदान केलेल्या उत्पादनाची नावे खाली दिलेली आहेत.
- NFS
- IMPS
- AePS
- CTS
- RuPay
- NACH
- APBS
- *99#
- UPI
- Bharat BillPay
- NETC
- BHIM
- BharatQR
- BHIM Aadhaar Pay
निष्कर्ष –
मला आशा आहे की आपल्या सर्वांना NPCI चा Full Form समजला असेल. आपल्यापैकी जर कोणाला NPCI Full Form in Marathi, NPCI Long Form in Marathi, NPCI Meaning in Marathi मध्ये जर काही अडचण असेल तर आम्हाला खाली कंमेंट करून नक्की विचारू शकता. तुमची शंका दूर करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू.
आजच्या पोस्टमध्ये आपण NPCI Full Form in Marathi जाणून घेतलाच परंतु यासोबतच NPCI काय आहे, याची स्थापना, उद्दिष्टे, उत्पादने, याविषयी सुद्धा माहिती घेतली आहे. तरी आपल्याला हा लेख माहितीपूर्ण वाटला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करावा आणि यासारख्या आणखीन फुल्ल फॉर्म्स बद्दल माहितीसाठी या ब्लॉगला पुन्हा भेट नक्की द्या.
चांगली माहिती मिळाली sir..
Thank you deepak