NSE BSE full form in Marathi | NSE आणि BSE फुल फॉर्म इन मराठी

NSE आणि BSE फुल फॉर्म इन मराठी | NSE BSE full form in Marathi

नमस्कार मित्रांनो,

शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट हे पैसे कमावण्याचे एक उत्तम स्रोत आहे. भारतामध्ये लाखो लोक शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करतात. 2020 च्या कोरोना लॉकडाऊन नंतर शेअर मार्केटने उच्चांक पातळी गाठली. भारतामध्ये दिवसेंदिवस शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार वाढत आहेत.

तुम्ही देखील शेअर मार्केट बद्दल news ऐकताना वाचताना NSE आणि BSE हे दोन शब्द नक्कीच ऐकले असतील. परंतु NSE आणि BSE चा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का? NSE आणि  BSE म्हणजे नेमकं काय? याबरोबर संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

NSE and BSE full form in Marathi

NSE BSE full form in Marathi
NSE BSE full form in Marathi

NSE म्हणजेच National Stock Exchange आणि BSE म्हणजेच Bombay Stock Exchange होय.

NSE म्हणजे काय?

NSE म्हणजेच  National Stock Exchange(राष्ट्रीय शेअर बाजार). भारतीय शेअर बाजारांमध्ये पारदर्शकता निर्माण करण्यासाठी  1993 साली NSE ची स्थापना करण्यात आली.

आजच्या घडीला NSE मध्ये जवळपास 1700 कंपन्या लिस्टेड आहेत. Nifty-50 हा निर्देशांक इथे वापरला जातो. याचाच अर्थ नॅशनल 50 असा होतो. यामध्ये राष्ट्रीय शेअर बाजारातील 50 अग्रण्य कंपन्याचा समावेश होतो. NSE हे एक आघाडीचे शेअर बाजार असून याचं मुख्यालय मुंबई महाराष्ट्र येथे स्थित आहे. 2021 मध्ये डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज साठी जगातील सर्वात मोठे एक्सचेंज म्हणून याला मान्यता मिळालेली आहे.

NSE जगातील चौथ्या क्रमांकावर येत असून याची मालकी काही वित्तीय संस्था, विमा कंपन्या आणि बँकांकडे आहे. भारतीय शेअर बाजारातील हे पहिले असे एक्सचेंज होते ज्याने पूर्णपणे स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक स्क्रीन ट्रेडिंग सिस्टीम प्रदान केली. 1996 साली NSE ने NIFTY-50 हा निर्देशांक जाहीर केला होता.

BSE म्हणजे काय?

BSE म्हणजे Bombay Stock Exchange बाजार. हा भारतातील सर्वात जुना समभाग बाजार आहे, याची स्थापना 1875 साली झाली. हे जागतिक स्तरावरील 11 व्या क्रमांकाचे बाजार भांडवल मूल्य असलेले हे Exchange आहे. यामध्ये जवळपास 6000 कंपन्या listed असून याची तुलना शांघाय, न्यूयॉर्क, टोकीयो तसेच लंडनच्या Stock Exchange बरोबर केली जाते. याचा निर्देशांक Sensex या नावाने 1986 पासून प्रचलित आहे.

यामध्ये 12 सेक्टरमधील BSE च्या 30 अशा कंपन्या ज्यांचे Trading Volume सर्वात जास्त आहे, अशा कंपन्यांचा समावेश होतो. यामध्ये बँकिंग सेवा, वाहन उद्योग, तेल व वायू, औषधनिर्मितीशास्त्र, दुरसंचार, माहिती तंत्रज्ञान, खनिज व धातू, दूरसंचार इ. क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्याची निवड करून त्यांचा सरासरीचा अभ्यास करून जो निर्देशांक ठरवला जातो, त्यालाच सेन्सेक्स असे म्हटले जाते.

या सेन्सेक्समध्ये निर्धारित कंपन्याची दैनंदिन उलाढाल सेन्सेक्सची कामगिरी ठरवते. या तीस कंपन्यामध्ये BSE (मुंबई शेअर बाजार) वेळोवेळी बदल केला जातो. परंतु त्यांची संख्या तीसच राहते. समजा एखाद्या दिवशी या तीस कंपन्यामध्ये सरासरी तेजी असेल, तर सेन्सेक्सची त्या दिवसाची कामगिरी तेजीकडे झुकताना दिसते. या तीस सूचित कंपन्यांच्या शेअर्सची यादी BSE द्वारे वेळोवेळी त्यांच्या पोर्टलवर घोषित केली जाते.सेन्सेक्सला BSE 30 या नावाने देखील संबोधित केले जाते.

एकूणच NSE व BSE हे दोन्ही बाजार देशातील आर्थिक पायाभूत सुविधा निर्माण करून, SEBI (सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) ने वेळोवेळी जाहीर केलेल्या नियमाधीन राहून  गुंतवणूकदार व  कंपन्या यांना सुरक्षित बाजारपेठ प्रदान करतात

Leave a Comment