महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना काढत असते, याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही आर्थिक मदत मिळत असते. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारने नुकतीच एक योजना सुरू केली आहे जीचे नाव NSMNY असे आहे.
आपल्यापैकी अनेक जणांच्या फोन वरती काल मेसेज आला असेल की NSMNY कडून 2 हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले. तर आजच्या पोस्टमधे आपण NSMNY Full Form काय आहे हे जाणून घेणार आहोत.
(NSMNY Full Form) NSMNY म्हणजे काय?
NSMNY चा फुल फॉर्म “Namo Shetkari Maha Sammannidhi Yojana” असा आहे. याला मराठीत”नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना” असे म्हणतात. NSMNY ही महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू केलेली एक योजना आहे.
NSMNY ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे जी शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. 26 ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेची सुरुवात करण्यात आली. NSMNY योजनेचा पहिले अनुदान पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे. जे शेतकरी PM Kisan Yojana साठी पात्र आहेत ते सर्व या योजनेसाठी ही पात्र आहेत.
NSMNY चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात APBS प्रणाली द्वारे ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आलेले आहेत. वर्षाला ६ ते १२ हजार अनुदान दिले जाणार आहे असे सांगितले जात आहे.
तर हा होता NSMNY Full Form, मला आशा आहे कि आपल्याला NSMNY Meaning समजला असेल. आजची हि पोस्ट लिहायचे कारण असे कि अनेकांना पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे परंतु कोठून पैसे आले हे कोणाला माहित नाही. तर चला पोस्ट आवडली असेल तर शेअर नक्की करा.