PGDM full form in Marathi | पी जी डी एम फुल फॉर्म इन मराठी

जर तुमची पदवी पूर्ण झाली असेल आणि तुम्ही पुढील शिक्षणासाठी काय करायचं हा विचार करत असाल किंवा MBA की PGDM या दोन्ही कोर्समध्ये कन्फ्युज असाल तर आम्ही तुम्हाला या आर्टिकल मध्ये PGDM कोर्स बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. PGDM full form in Marathi, PGDM म्हणजे नेमकं काय? PGDM कोर्स करण्यासाठी कोणत्या उत्तम संस्था आहेत? इत्यादी माहिती या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

PGDM full form in Marathi | पी जी डी एम फुल फॉर्म इन मराठी

PGDM म्हणजे “Post graduation diploma in management” मराठी मध्ये याला पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मॅनेजमेंट असे म्हणतात.

PGDM म्हणजे काय?

PGDM हा पदवीनंतर केला जाणारा दोन वर्षांचा एक पूर्ण वेळ कोर्स आहे. बऱ्याच जणांना पदवीनंतर मॅनेजमेंट मध्ये आपले करिअर करायचे असते पण जर त्यांना एमबीए करता आले नसेल किंवा MBA ची फीज जास्त असेल तर तुम्ही PGDM हा कोर्स करू शकता.

ज्या विद्यार्थ्यांना मार्केट आणि उद्योग व्यवस्थापनाबद्दल अधिक चांगले शिक्षण घ्यायचे असेल त्यांच्यासाठी PGDM हा कोर्स खूपच फायदेशीर आहे. MBA या कोर्स प्रमाणेच PGDM मध्ये देखील तुम्ही बऱ्याच प्रकारचे स्पेशलायझेशन करू शकता. PGDM झाल्यानंतर तुम्हाला सरासरी सहा ते सात लाख रुपये वार्षिक पगार मिळू शकतो.

PGDM करण्यासाठी पात्रता

1) PGDM करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही सरकार मान्य विद्यापीठातून पदवी मिळवणे आवश्यक असते.

2) विद्यार्थ्यास पदवीला किमान 50% गुण असणे आवश्यक आहे.

3) कोणत्याही शाखेतून तुम्ही PGDM साठी प्रवेश घेऊ शकता.

4) PGDM ला प्रवेश घेण्याआधी तुम्हाला Common Aptitude Test, Xavier aptitude test, Management Aptitude, Graduate Management Aptitude Test यापैकी एखादी परीक्षा द्यावी लागते.

PGDM अभ्यासक्रमातील विषय

PGDM केलेले विद्यार्थी दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टर ला त्यांच्या आवडीचा विषय निवडून स्पेशलायझेशन करू शकतात.

  1. मार्केटिंग
  2. फायनान्स
  3. सेल्स मॅनेजर
  4. ह्यूमन रिसोर्स मॅनेजर
  5. IT
  6. बिझनेस अनालिटिक्स मॅनेजमेंट
  7. फॉरेन ट्रेड
  8. सप्लाय चेन मॅनेजमेंट
  9. इव्हेंट मॅनेजमेंट
  10. रिटेल
  11. ऑपरेशन मॅनेजमेंट

PGDM करण्यासाठी भारतातील सर्वोत्तम संस्था

भारतातील PGDM अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या शीर्ष संस्थांची यादी

  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगलोर
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोलकाता
  • झेवियर्स लेबर रिलेशन इन्स्टिट्यूट, जमशेदपूर
  • एसपी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, मुंबई
  • व्यवस्थापन विकास संस्था, गुडगाव
  • मॅनेजमेंट स्टडीज फॅकल्टी, नवी दिल्ली
  • आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन संस्था, नवी दिल्ली
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, दिल्ली
  • नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई

निष्कर्ष

तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो मला आशा आहे तुम्हाला आता PGDM full form in Marathi या लेखामधून PGDM संबंधी संपूर्ण माहिती जाणून घ्यायला मदत झाली असेल. तुमच्या काही शंका असतील किंव्हा तुम्ही अजून देखील PGDM आणि MBA या दोन कोर्स मध्ये confuse असाल तर कंमेंट मध्ये तुमच्या शंकेची नोंद करा. मी लवकरात लवकर तुमच्या शंकेचे निरसन करेन.

Leave a Comment