PSI फुल फॉर्म इन मराठी | PSI full form in Marathi

PSI फुल फॉर्म इन मराठी | PSI full form in Marathi.

नमस्कार मित्रांनो,

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पीएसआय(PSI) हा शब्द कुठे ना कुठे ऐकला वाचला असेल. PSI म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एखाद्या पोलीस ऑफीसर ची प्रतिमा उभी राहते. आपल्यापैकी बऱ्याच जणांचे पीएसआय होण्याचे स्वप्न देखील असेल.

परंतु आपल्याला PSI चा फुल फॉर्म माहिती आहे का? आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला पीएसआय फुल फॉर्म इन मराठी बरोबरच, PSI कसे होता येते? PSI चा पगार किती असतो? त्याचबरोबर PSI ची जबाबदारी काय असते हे सर्व जाणून घेणार आहोत.

PSI फुल फॉर्म इन मराठी | PSI full form in Marathi

PSI म्हणजेच “Police Sub Inspector” होय. मराठीमध्ये आपण याला पोलीस उपनिरीक्षक असे म्हणतो.

PSI म्हणजे काय?

What is PSI in Marathi
What is PSI in Marathi

Police Sub Inspector म्हणजेच पीएसआय हे एक पोलीस खात्यातील प्रमुख पद आहे. मराठीमध्ये या पदाला पोलीस उपनिरीक्षक असे म्हटले जाते. अत्यंत मानाचं असलेलं हे पद मिळवण्यासाठी तुम्हाला MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेद्वारे उत्तीर्ण व्हावे लागते. या परीक्षेमधून PSI पदाची भरती केली जाते. आज महाराष्ट्रातील लाखो तरुण या परीक्षेची तयारी करतात.

PSI होण्यासाठी काय करावे लागते?

PSI पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता

कोणतेही शाखेतून पदवीधर असणारा विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतो. या पदवी मध्ये विद्यार्थी पास असणे गरजेचे आहे.

PSI होण्यासाठी किमान वय 19 असणे गरजेचे आहे तर कमाल वय हे 31 असणे गरजेचे आहे. (राखीव प्रवर्गांसाठी यामध्ये सूट देण्यात आलेली आहे.)

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी लागणारी शारीरिक पात्रता चाचणी :-

उमेदवारांची शारीरिक क्षमता यामध्ये तपासली जाते. ज्यामध्ये उंची, वजन, गोळा फेक, धावणे, पुल अप्स अशा विविध गोष्टींची परीक्षा घेतली जाते.

उंची: पुरुषांची किमान उंची 165 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे, तर स्त्रियांसाठी 157 सेंटीमीटर उंची असणे गरजेचे आहे.

छाती (Chest) ( फक्त पुरुषांसाठी): पुरुषांची छाती न फुगवता 79 cm पर्यंत असणे गरजेचे आहे व फुगवल्यानंतर 84 cm असणे गरजेचे आहे.

धावणे (Running): पुरुषांना 800 मीटर धावणे तर स्त्रियांसाठी 400 मीटर धावणे.

लांब उडी (Long Jump): पुरुषांसाठी कमीत कमी 4.5 मीटर लांब उडी तर स्त्रियांसाठी 4 मीटर लांब उडी.

गोळा फेक: पुरुषांना 7.26 किलोग्रॅम वजनाचा गोळा साडेसात मीटर पर्यंत लांब फेकणे तर स्त्रियांना 4 किलो वजनाचा गोळा सहा मीटर लांब फेकणे.

पूल अप्स: किमान 8 पूल अप्स मारणे गरजेचे असते एका पुलप्स साठी 2.5 असे एकूण वीस गुण दिले जातात.

PSI साठीचा अभ्यासक्रम

PSI होण्यासाठी तुम्हाला किमान तीन परीक्षा पास होणे गरजेचे आहे.

  • पूर्व परीक्षा: प्राथमिक स्वरूपाच्या या परीक्षेमध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता, अंकगणित,सामान्य ज्ञान, इतिहास,भूगोल, भारतीय राज्यघटना,चालू घडामोडी, इत्यादी विषयांचा अभ्यास करावा लागतो.
  • मुख्य परीक्षा: या परीक्षेसाठी तुम्हाला पुढील विषयांचे सखोल ज्ञान असणे गरजेचे असते.
  • मराठी: मराठी भाषेचे ज्ञान त्यातील व्याकरण आणि शब्दसंग्रह.
  • इंग्रजी: इंग्रजी भाषेचे ज्ञान त्यातील व्याकरण, निबंध लेखन, भाषा शुद्धता (language proficiency).
  • सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी.
  • इतिहास, भूगोल, सामान्य ज्ञान, पर्यावरण, अंकगणित राज्यघटना,तर्कशास्त्र चाचणी, बौद्धिक क्षमता. इत्यादी विषयांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे असते.

PSI ची प्रमुख जबाबदारी?

  • आपल्या अंतर्गत असलेल्या पोलीसठाण्याचे व्यवस्थापन करणे.
  • समाजामध्ये कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करणे.
  • संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, गस्त घालणे.
  • घडलेल्या गुन्ह्यांचा शोध घेणे पुरावे गोळा करणे.

PSI चा पगार किती असतो?

38,600 ते 1,22,800 पर्यंत पगार PSI ला असतो. या व्यतिरिक्त इतरही अनेक सुविधा शासनातर्फे पुरवल्या जातात.

धन्यवाद

2 thoughts on “PSI फुल फॉर्म इन मराठी | PSI full form in Marathi”

Leave a Comment