आरआयपी (RIP) चा फुल फॉर्म | RIP Full Form in Marathi

मित्रांनो, तुम्ही RIP हा शब्द ऐकला असेल किंवा सोशल मीडियावर पाहिलाच असेल आणि जर तुम्हाला Rip Full Form in Marathi आणि Rip Meaning in Marathi माहीत नसेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात. आजच्या या पोस्टमध्ये आपण RIP चा फुल फॉर्म आणि इतर आवश्यक माहिती पाहणार आहोत. या पोस्टमध्ये तुम्हाला RIP Full Form in Marathi बदल माहिती मिळेल.

Whatsapp, Facebook, Instagram इत्यादींवर  आज RIP हा शब्द अनेकदा वापरला जात आहे. विशेषत: कंमेंट मध्ये अनेकदा हा शब्द दिसतो. यामुळे आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला RIP ची माहिती देत आहोत. ज्यामुळे तुम्हाला पण RIP चा अर्थ समजेल आणि तुम्ही पण RIP शब्दाचा वापर करू शकता, कारण Meaning माहिती नसल्याशिवाय कोणीही हा शब्द वापरू शकत नाही

आरआयपी (RIP) चा फुल फॉर्म | RIP Full Form in Marathi

आपल्याला माहितच आहे की प्रत्येक धर्मात, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू झाल्यानंतर शोक व्यक्त करण्याची सांस्कृतिक आणि धार्मिक प्रक्रिया वेगवेगळी असते. हिंदू संस्कृतीत, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, मृतदेह जाळला जातो आणि अंतिम संस्कार केले जातात. त्याचप्रमाणे, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, ख्रिश्चन धर्माचे लोक त्या व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी Rest in Peace (RIP) शब्द वापरून अंतिम संस्कार करतात. त्यानुसार ते मृत व्यक्तीला थडग्यात झोपवतात आणि त्यांच्या कबरीवर ‘Rest in Peace’ हा शब्द लिहितात.

शोक व्यक्त करण्याचे किंवा श्रध्दांजली वाहण्याचे शब्द वेगवेगळ्या धर्मानुसार आणि देशानुसार आणि भाषेनुसार वेगवेगळे असतात, परंतु प्रत्यक्षात या सर्वांचा उपयोग मृत्यूनंतर व्यक्तीला शांती मिळावी किंवा त्याला श्रद्धांजली वाहताना शोक व्यक्त करण्यासाठी केला जातो. RIP हा शब्द प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माच्या लोकांना किंवा मुस्लिम धर्माच्या लोकांना श्रद्धांजली म्हणजे अंतिम निरोप देण्यासाठी वापरला जातो. तर आता आपल्याला RIP Full Form in Marathi समजला असेल आता आपण RIP Meaning in Marathi पाहुयात.

RIP चा मराठी अर्थ – RIP Meaning in Marathi

RIP चा मराठी अर्थ “आत्म्यास शांती लाभो” कारण जेव्हा कोणी मरतो तेव्हा लोक त्याच्यासाठी प्रार्थना करतात आणि RIP म्हणतात अशा प्रकारे ते त्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी RIP म्हणून विनंती करतात. RIP हा श्रद्धांजली वाहण्यासाठी वापरला जाणारा एक शब्द आहे. वास्तविक जीवनापेक्षा सोशल मीडिया वर हा शब्द जास्त वापरला जातो.

आपल्या सर्वांना माहित आहे की मृत्यू हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे तरीही आपण आपल्या प्रिय व्यक्तीला कायमचा निरोप द्यायला तयार नाही. एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूबद्दल आपण शोक किंवा सहानुभूती व्यक्त करतो आणि शोकग्रस्तांसोबत सहानुभूती आणि चिंता व्यक्त करतो, परंतु अशा परिस्थितीत आपल्या भावना व्यक्त करणे खूप कठीण आहे.

RIP शब्दाचा इतिहास – History of RIP in Marathi

RIP हा शब्द सर्वात प्रथम पाश्चात्य देशांमध्ये वापरला गेला होता. कालांतराने तो हळूहळू इतर देशांमध्ये वापरला जाऊ लागला. RIP हा शब्द ख्रिश्चन धर्मात 13 व्या ते 16 व्या शतकात पहिल्यांदा या शब्दाचा वापर सुरू झाला आणि आजही वापरला जात आहे. एकविसाव्या शतकात सोशल मीडियाच्या जाळ्यामुळे त्याचा वापर सातत्याने वाढत असल्याने लोक फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सएप च्या माध्यमातून कोणाचा मृत्यू झाल्यावर त्यास श्रद्धांजली देण्यासाठी वापरत आहेत.

हिंदू धर्मात RIP शब्द का वापरू नये?

हिंदू धर्माचा असा विश्वास आहे की मृत्यूनंतर आत्मा ताबडतोब नवीन जन्म घेतो. दोन जन्मांमध्ये विश्रांतीसाठी जागा नसते. मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात एक दिवस मानला जातो ज्याला Judgemental Day असे नाव आहे. यात असे मानले जाते की हा एक दिवस येईल.

त्या दिवशी सर्वांना त्यांच्या पापाची सजा मिळेल. त्यामुळे दफन केलेल्या देहास विश्रांती मिळण्यासाठी RIP चा शब्द वापरला जातो. हिंदू धर्मात असे नाही, हिंदू धर्मात शरीराला अग्नीच्या अधीन केले जाते त्यामुळे देहास शांती मिळण्याचा विषय येत नाही. म्हणूनच RIP म्हणण्याऐवजी हिंदूंनी ‘ओम शांती’ म्हणणे योग्य राहील.

निष्कर्ष –

तर मित्रांनो, आपल्याला आजची RIP Full Form and Long Form in Marathi ही छोटी माहिती तुम्हाला कशी वाटली, कृपया कमेंट करून सांगा, जर तुम्हाला आजची ही पोस्ट खरोखरच आवडली असेल, तर कृपया ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. जेणेकरून तुमच्या मित्रांनाही RIP या शब्दाचा नेमका अर्थ कळू शकेल.

आजच्या माहिती संबंधित काहीही अडचण असेल तर कंमेंट मध्ये विचारायला विसरू नका. मराठी मध्ये अजून महत्त्वाचे Full Forms, Long Forms बद्दल माहिती मिळवण्यासाठी या वेबसाईट वर पुन्हा-पुन्हा येत राहा. आजचा RIP Full Form in Marathi हा लेख आवडला असेल तर सोशल मीडियावर मित्रांसोबत नक्की शेअर करा.

2 thoughts on “आरआयपी (RIP) चा फुल फॉर्म | RIP Full Form in Marathi”

Leave a Comment