RTI हा एक प्रकारचा कायदा असून खूप कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. सर्वसामान्य लोक या कायद्याचा कसा वापर करू शकतात याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. त्याचबरोबर RTI full form in Marathi, आणि RTI बद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये सांगणार आहोत.
RTI full form in Marathi | आरटीआय फुल फॉर्म इन मराठी
RTI म्हणजेच “Right to Information” होय. मराठी भाषेमध्ये आपण याला “माहितीचा अधिकार” असे म्हणू शकतो. हा एक प्रकारचा कायदा आहे ज्याची सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेऊया.
RTI म्हणजे काय?
Right to information म्हणजे माहितीचा अधिकार होय. या कायद्याद्वारे सर्वसामान्य लोकांना सरकारकडून माहिती मागवण्याचे स्वातंत्र्य प्राप्त होते. इसवी सन 1766 रोजी हा कायदा स्वीडन मध्ये सर्वप्रथम लागू करण्यात आला. भारत अशा प्रकारचा कायदा लागू करणारा 54 वा देश ठरला आहे.
11 मे 2005 साली भारत सरकारने हा कायदा मंजूर केला. 12 ऑक्टोबर 2005 पासून हा कायदा संपूर्णपणे अमलात आला.
या माहितीच्या अधिकाराद्वारे तुम्ही कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य जसे की अभिलेख, दस्ताऐवज, ई-मेल, परिपत्रके, अभिप्राय, सूचना, प्रसिद्ध पत्रके,आदेश, अहवाल, कागदपत्रे, नमुने, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील आधारसामग्री, कोणत्याही अधिकाऱ्यांचे किंवा मंत्र्यांचे अभिप्राय इत्यादी प्रकारची माहिती तुम्ही मिळवू शकता.
माहितीचा अधिकार कसा वापरायचा?
सरकारकडून विशिष्ट प्रकारची माहिती मागवण्याचे स्वातंत्र्य म्हणजेच माहितीचा अधिकार होय. 2005 नंतर संपूर्ण भारतामध्ये हा कायदा अमलात आणला गेला. ज्याप्रमाणे व्यक्तीला बोलण्याचा, भाषण करण्याचा, विचार स्वातंत्र्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे माहितीचा अधिकार देखील मानवाचा नैसर्गिक व मूलभूत अधिकार आहे.
भ्रष्टाचार कमी करण्यासाठी व लोकप्रशासनाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. प्रशासनाची धोरणे, कार्य, विविध योजना इत्यादी प्रकारची माहिती या कायद्यामुळे सर्वसामान्यांना मिळते.
माहितीचा अधिकार हा प्रशासनाच्या सर्व ठिकाणी बंधनकारक आहे. ज्या ज्या ठिकाणी प्रशासनाचा संबंध येतो त्या त्या ठिकाणी हा कायदा बंधनकारक आहे. जसे की, महानगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामसभा, सहकारी संस्था, रेल्वे, शिक्षण संस्था, स्थानिक स्वराज्य मंडळे, इत्यादी.
प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये माहिती अधिकाऱ्याची आणि अपीलीय अधिकाऱ्याची नेमणूक केलेली असते. सर्वसामान्यांना या अधिकाऱ्याबद्दल कळावे यासाठी त्याचे नावं कार्यालयाबाहेर मोठ्या अक्षरात लिहिलेले असते.
या ठिकाणी अर्ज देऊन आपण आपल्याला हवी असलेली माहिती तीस दिवसांमध्ये मिळवू शकतो. जर यापेक्षा अधिक वेळ लागला तर याबाबतीत तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला देखील तक्रार करू शकता.