VISA full form in marathi | विजा फुल फॉर्म इन मराठी

VISA हा शब्द वारंवार आपण ऐकतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे बाहेरील देशांचा VISA देखील असू शकतो. आपल्या सर्वांना माहिती आहे जर आपल्याला परदेशी यात्रा करायची असेल तर VISA काढणे महत्त्वाचे असते. परंतु तुम्हाला या VISA चा फुल फॉर्म माहिती आहे का?

आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला VISA full form in Marathi, त्याचबरोबर विजा बद्दलची सर्व माहिती सांगणार आहोत.

Visa full form in Marathi | विजा फुल फॉर्म इन मराठी

आपल्यापैकी प्रत्येकाला परदेश फिरता यावा असे वाटत असते पण यासाठी पासपोर्ट आणि विजा हा फार महत्त्वाचा असतो. VISA म्हणजेच “visitors International stay admission” होय. मराठीमध्ये आपण याला “अभ्यागत आंतरराष्ट्रीय मुक्काम प्रवेश” असे म्हणू शकतो.

VISA म्हणजे काय? | What is a VISA in Marathi

VISA हा एक असा दस्तऐवज आहे जो तुम्हाला परदेशात जाण्याची अधिकृत परवानगी देतो. आपण ज्या देशांमध्ये राहतो तो देश आपल्याला पासपोर्ट देतो परंतु ज्या देशांमध्ये तुम्हाला जायचे आहे त्या देशातून VISA प्राप्त करणे गरजेचे असते.

ज्या देशांमध्ये तुम्ही राहण्यासाठी किंवा फिरण्यासाठी जात असाल तो देश तुम्हाला VISA देतो. म्हणजेच त्यांच्या देशात येण्यासाठी परवानगी देतो. ज्या देशामध्ये तुम्ही जाणार असाल त्या देशाचे सरकार हा VISA देत असते. VISA हा तुमच्या पासपोर्टवर स्टॅम्प म्हणून दिला जातो.

VISA चे वेगवेगळे प्रकार

प्रत्येक देश त्याच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे विजा जारी करत असतो. आपल्या भारतामध्ये बघायचं झालं तर वेगवेगळे 11 प्रकारचे विजा भारत सरकारकडून जारी करण्यात येतात. जसे की टूरिस्ट, ट्रांसीट, विजा ऑन अरायव्हल, जर्नलिस्ट, पार्टनर इत्यादी VISA चे प्रकार आहेत.

यातील काही मुख्य प्रकार आपण जाणून घेऊ.

1) टुरिस्ट विजा :-

ज्या व्यक्तीला एखाद्या देशात केवळ फिरण्यासाठी जावयाचे असेल तर अशी व्यक्ती टुरिस्ट विजा साठी अप्लाय करू शकते. या विजा साठी अप्लाय करण्यासाठी तुम्ही ज्या देशात फिरायला जात आहात त्यांच्या अधिकारीक वेबसाइट वर तुम्हाला विजा साठी लागणारी सर्व माहिती भेटून जाईल.

2) बिझनेस विजा :-

अगदी नावाप्रमाणेच हा विजा ज्या लोकांना बिजनेस/ व्यवसाय करायचा असेल अशा लोकांना दिला जातो. या वीजामुळे संबंधित व्यक्ती त्या देशामध्ये स्वतःचा अधिकृतपणे व्यवसाय करू शकते.

3) स्टुडन्ट विजा :-

ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे असेल अशा विद्यार्थ्यांना स्टुडन्ट विजा जारी केला जातो. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना आपल्या देशात परतणे बंधनकारक असते.

VISA साठी अर्ज कसा करावा लागतो?

Online पद्धत :-

इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही विजा प्राप्त करू शकता. यासाठी तुमचा वेळ देखील वाचतो. पाच ते दहा दिवसांच्या आत तुम्ही विजा प्राप्त करू शकता. यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला मागितलेले सर्व डॉक्युमेंट्स आणि फॉर्म भरावा लागेल.

Offline पद्धत :-

यासाठी तुम्हाला स्वतः भारतीय दूतवासात जावे लागेल. जिकडे गेल्यानंतर तुमचे सगळे अधिकृत कागदपत्रे तपासले जातील. यामध्ये तुमचे घर देखील तपासले जाऊ शकते व यानंतर तुम्हाला विजा मिळतो.

Leave a Comment