बीडीओ (BDO) चा फुल फॉर्म | BDO Full Form in Marathi

BDO Full Form in Marathi – आजच्या काळात सरकारी नोकरी इतकी लोकप्रिय झाल्या आहेत कि प्रत्येक व्यक्तीचे सरकारी नोकरीचे स्वप्न बनले आहे. अधिकाधिक लोकांना प्रशासकीय सेवा क्षेत्रात नोकरी मिळवायची आहे. काही लोकांना IAS, IPS, अधिकारी तर काहींना बीडीओ (BDO) अधिकारी व्हायचे आहे. जर तुम्हाला बीडीओ अधिकारी व्हायचे असेल तर तुम्हाला कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक आहे. तुमची जर BDO बनायची इच्छा असेल तर हि पोस्ट तुमच्यासाठी खूप उपयोगाची आहे.

आजच्या BDO Full Form in Marathi या पोस्ट मध्ये आपण BDO Full Form in Marathi जाणून घेणार आहोत. यासोबतच BDO बद्दल काही महत्वाची माहितीही मिळणार आहोत. त्यामुळे हि पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचावी. मित्रांनो, जर तुम्हाला BDO Full Form in Marathi आणि BDO Meaning in Marathi जाणून घ्यायचा असेल, तर हा लेख तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे, कारण येथे बीडीओ च्या फुल फॉर्म सोबत या संबंधित मूलभूत माहिती दिली आहे.

बीडीओ (BDO) चा फुल फॉर्म | BDO Full Form in Marathi

बीडीओ (BDO) चा फुल फॉर्म “Block Development Officer” असा होतो. बीडीओ ला मराठी मध्ये गटविकास अधिकारी असे म्हणतात. बीडीओ अधिकाऱ्याला क्षेत्र किंवा ब्लॉकचा विकास अधिकारी असेही म्हणतात. आपल्या भागातील प्रत्येक विकास कामावर बारकाईने लक्ष ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे. सरकारने जारी केलेल्या विकासाशी संबंधित सर्व कामे करून देण्याची जबाबदारीही बीडीओची असते.

बीडीओ (BDO) – गटविकास अधिकारी

BDO म्हणजे गटविकास अधिकारी, BDO ला गटाच्या क्रियाकलाप आणि विकासासाठी प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त केले जाते (गट हा जिल्ह्याचा उपविभाग असतो). गटविकास अधिकारी गटाच्या नियोजन आणि विकासाशी संबंधित सर्व कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवतात. गटविकास अधिकाऱ्याला पाहावे लागते कि कोणते कार्य कोणत्या अधिकाऱ्याला दिले आहे आणि त्यांनी ते व्यवस्तीतपणे पार पाडले आहे कि नाही.

BDO पंचायत समितीच्या वतीने सर्व कागदपत्रे प्रमाणित करतो आणि योग्य प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीच्या अधीन राहून करारावर स्वाक्षरी करतो. बीडीओ यांनी पंचायत समितीच्या वतीने कर्ज वसुली, कर वसुली आणि खाते नियमित ठेवण्याच्या विशेष संदर्भात पंचायतींच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली जाते. अशी कामे जी PHE , वन, PWD, आरोग्य इत्यादी विभागांद्वारे केले जात नाहीत, त्यासाठी गटविकास अधिकारी जबाबदार असतो.

कसे बनावे गटविकास अधिकारी?

बीडीओ बनण्यासाठी लोकसेवा आयोगाची एमपीएससी हि परीक्षा द्यावी लागते. MPSC च्या आधारावर गटविकास अधिकाऱ्याच्या जागा भरल्या जातात. हि परीक्षा देण्यासाठी महत्वाचे म्हणजे तुम्ही पात्रता अटी पूर्ण केल्या पाहिजे. गटविकास अधिकारी बनण्यासाठी च्या पात्रता खालीलप्रमाणे –

  1. तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून Graduation ची डिग्री असावी.
  2. तुमचे वय २१ च्या पुढे आणि ३० च्या आत असायला हवे.
  3. तुमच्या कास्ट नुसार वयोमर्यादेत सूट दिलेली असते.
  4. आणि शेवटचे म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक असावेत.

MPSC हि परीक्षा ३ टप्प्यात असते. सर्वात आधी पूर्व परीक्षा, त्यात पास झाल्यावर मुख्य परीक्षा आणि शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत. या तिन्ही पायऱ्या चढल्यावर तुम्ही बीडीओ बनण्यासाठी योग्य असता. मेरिट नुसार लोकसेवा आयोग नेमणुका करते आणि यादी जाहीर करते.

गटविकास अधिकाऱ्याची कामे

  • ग्रामीण विकास योजनांशी संबंधित सर्व कामे जसे की गरीब घरे, कृषी योजना, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इत्यादी गट स्तरावर पूर्ण करण्यात गटविकास अधिकाऱ्याची महत्वाची भूमिका असते.
  • प्राधिकरण व इतर अधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या योजना व कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे की नाही हे गटविकास अधिकाऱ्याला पाहावे लागते.
  • पंचायत समितीने दिलेली सर्व कागदपत्रे तपासणे, त्यांचे प्रमाणीकरण व स्वाक्षरी करण्याचे काम गटविकास अधिकारी करतात.
  • राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अधिकार्‍यांसह गट स्तरावर सुरू असलेली धोरणे आणि कामे यांच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करणे.
  • तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात काही अडचण आल्यास तुमच्या भागासाठी नेमलेल्या गटविकास अधिकाऱ्याकडे तुम्ही अर्ज लिहू शकता.

गटविकास अधिकाऱ्याचा पगार

आता तुमच्या मनातील सर्वात मोठ्या प्रश्नाविषयी बोलूया ज्याची प्रत्येक व्यक्तीच्या मनात उत्सुकता असते की हा अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला किती पगार मिळेल.

वेतनश्रेणीनुसार बीडीओ चे मासिक वेतन 9000 ते 35000 पर्यंत आहे, हे त्यांचे मासिक उत्पन्न आहे. बीडीओला अनेक सेवांचा लाभ मिळतो ज्यासाठी त्यांना पैसे देण्याची आवश्यकता नाही.

निष्कर्ष

तर तुम्हाला BDO Full Form in Marathi सोबतच बीडीओ म्हणजेच गटविकास अधिकाऱ्याबद्दल आता बरीच माहिती मिळाली असेल, जसे बीडीओ कोण असतो, बीडीओ कसे बनायचे, बीडीओ चा पगार, बीडीओ ची कामे. मला आशा आहे की तुम्हाला या पोस्टमधून बरेच ज्ञान मिळाले असेल.

आजचा BDO Full Form in Marathi हा लक्ष आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका म्हणजे त्यांना देखील याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल आणि अश्याच प्रकारच्या Full Form in Marathi साठी या वेबसाईटला पुन्हा नक्की भेट द्या.

2 thoughts on “बीडीओ (BDO) चा फुल फॉर्म | BDO Full Form in Marathi”

Leave a Comment