BHMS Full form in Marathi | बी एच एम एस फुल फॉर्म इन मराठी
आपण आजारी पडतो तेव्हा आपण आपल्या येथील एखाद्या जवळच्या क्लिनिक मध्ये जाऊन उपचार घेतो. प्रत्येक क्लिनिकच्या बाहेर डॉक्टरचे नाव व त्याची पदवी लिहिलेली असते. BMS, MBBS, BHMS, MD अशी नावे तुम्ही दवाखान्या बाहेर नक्कीच वाचलेली असतील. मेडिकल क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदव्या आपल्याला प्राप्त करता येतात. त्यातीलच एक म्हणजे BHMS. परंतु तुम्हाला BHMS चा फुल फॉर्म माहिती आहे का?
आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला BHMS full form in Marathi याबरोबरच, BHMS म्हणजे काय? BHMS ही पदवी तुम्ही कशी मिळवू शकता? BHMS होण्यासाठीचा कालावधी, BHMS साठी लागणारी पात्रता, BHMS साठी भारतातील नामांकित विद्यापीठे, इत्यादी सर्व माहिती या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बी एच एम एस फुल फॉर्म इन मराठी | BHMS full form in Marathi
BHMS म्हणजेच “Bachelor of Homeopathy in medicine and surgery” (बॅचलर ऑफ होमिओपॅथी इन मेडिसिन आणि सर्जरी)
मराठी भाषेमध्ये आपण याला बॅचलर ऑफ होमिओपॅथी औषध आणि शस्त्रीका पदविका असे म्हणतो.
BHMS म्हणजे काय? | What is BHMS in Marathi
BHMS ही मेडिकल क्षेत्रातील एक पदवी असून, MBBS नंतर उच्च दर्जाची पदवी म्हणून हिचा नंबर लागतो. ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचं आहे, आणि मेरिट अभावी त्यांचा एमबीबीएस ला नंबर लागला नाही तर असे विद्यार्थी BHMS ला ऍडमिशन घेतात.
BHMS या चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात होमिओपॅथी उपचार पद्धतीचा अभ्यासक्रम शिकवला जातो. मेडिकल क्षेत्रामध्ये होमिओपॅथी आणि ऍलोपॅथी या दोन मुख्य उपचार पद्धती सांगितलेल्या आहेत. BHMS ही मेडिकल क्षेत्रातली एक पदवी असून हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी स्वतः डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करू शकतो.
बऱ्याच केसेस मध्ये होमिओपॅथी ऍलोपॅथी पेक्षा देखील प्रभावी ठरल्याचे दिसून आले आहे. अनुवंशिक किंवा काही जडलेले आजार देखील या होमिओपॅथीने बरे होतात.
BHMS साठी लागणारी पात्रता | BHMS Eligibility in Marathi
मेडिकल क्षेत्रातील प्रत्येक कोर्स साठी लागणारी पात्रता ही जवळपास सारखीच असते :-
- इयत्ता बारावी मध्ये विज्ञान शाखेतून बायोलॉजी केमिस्ट्री आणि फिजिक्स या तीन विषयांमध्ये 50% गुण मिळवणे अनिवार्य आहे. राखीव प्रवर्गासाठी यामध्ये 5% सूट दिली जाते.
- BHMS या कोर्सच्या प्रवेशासाठी तुमचे वय कमीत कमी 17 वर्षे ते जास्तीत जास्त 25 असणे गरजेचे आहे.
- जर तुम्ही राखीव गटामधून प्रवेश घेत असाल तर त्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे..
- बारावीनंतर घेण्यात येणारी NEET ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
- अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
BHMS साठी होणारी प्रवेश प्रक्रिया :-
मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्हाला आता कोणताही कोर्स करायचा असेल तर नीट ही परीक्षा द्यावीच लागते. केंद्र स्तरावर या परीक्षेचे आयोजन करण्यात येते.
नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर , तुमच्या मार्क्स आणि मेरिटनुसार तुम्हाला हवे असलेल्या कोर्स आणि हवे असलेल्या कॉलेजसाठी तुम्ही अर्ज करू शकता. सरकारी किंवा खाजगी विद्यापीठामध्ये तुम्ही अर्ज करू शकता.
जवळपास सर्वच मेडिकल कॉलेजचे ॲडमिशन हे नीट या परीक्षेच्या आधारावर घेतले जाते, परंतु भारतात काही असे देखील काही कॉलेजेस आहेत जिथे तुम्हाला त्यांची Entranance Test द्यावी लागते.
जसे की :-
NIH BHMS प्रवेश परीक्षा
- पंजाब युनिव्हर्सिटी कॉमन एन्ट्रान्स टेस्ट (PU CET)
- आंध्र प्रदेश इंजिनिअरिंग ऍग्रीकल्चर आणि मेडिकल कॉमन एन्ट्रान्स टेस्ट (AP EAMCET)
- तेलंगाणा राज्य इंजिनिअरिंग ऍग्रीकल्चर आणि मेडिकल कॉमन एन्ट्रान्स टेस्ट (TS EAMCET)
- केरळा राज्य इंजिनिअरिंग ऍग्रीकल्चर आणि मेडिकल टेस्ट (KEAM)
BHMS कोर्सचा कालावधी :-
BHMS या कोर्सचा संपूर्ण कालावधी हा ५ वर्षे ६ महिन्यांचा आहे. यामध्ये 4 वर्षे 6 महिने तुम्हाला शिक्षण दिले जाते, व यानंतर पुढील एक वर्ष तुम्हाला इंटर्नशिप करावी लागते. काही वर्षांपूर्वी इंटर्नशिपची सक्ती नव्हती, परंतु आता जर तुम्ही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप केली नाही तर त्या विद्यार्थ्याला पदवी दिली जात नाही.
इतर मेडिकल कोर्सेस प्रमाणे याही कोर्सला सत्र प्रणाली वापरली जाते. एकूण नऊ सत्र या कोर्समध्ये आहेत. प्रत्येक वर्षाला दोन सत्र असे एकूण नऊ सत्र या कोर्समध्ये आहेत. यातील 7 सत्रांचा अभ्यास तुमच्या कॉलेजमध्येच होतो.
BHMS हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही, या क्षेत्रातील पुढील शिक्षण देखील घेऊ शकता.
Also Read,