ICU full form in Marathi | आय सी यु फुल फॉर्म इन मराठी

ICU full form in Marathi | आय सी यु फुल फॉर्म इन मराठी

नमस्कार मित्रांनो,

ICU म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक अशी रूम उभी राहते ज्यामध्ये एखादा पेशंट आहे आणि त्या रूम मध्ये जाण्यासाठी सक्त मनाई आहे. कोणालाही अशा ठिकाणी जायची इच्छा नसलेली इस्पितळातली एक डेंजर रूम.

कधी ना कधी इच्छा नसताना आपण प्रत्यक्षात देखील ICU नेमका कसा असतो हे हॉस्पिटल मध्ये बघितले असेल. बऱ्याच वेळा चित्रपट आणि सिरीयल मध्ये देखील आपण ICU बघत आलो आहोत. परंतु तुम्हाला ICU चा फुल फॉर्म माहिती आहे का?

आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला “ICU full form in Marathi”, याबरोबरच ICU म्हणजे काय? ICU ची वैशिष्ट्ये काय आहेत?, व ICU बद्दल इतर सर्व माहिती सांगणार आहोत.

आय सी यु फुल फॉर्म इन मराठी | ICU full form in Marathi

ICU म्हणजेच Intensive Care Unit ( इंटेन्सिव्ह केअर युनिट). आपल्या मराठीमध्ये याला “अतिदक्षता विभाग” असे म्हटले जाते.

रुग्णाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्यानंतर या विभागामध्ये त्याच्यावर पुढील उपचार केले जातात.

ICU म्हणजे काय? | What is ICU in Marathi?

icu full form in marathi
ICU full form in marathi

ICU म्हणजे Intensive Care Unit होय. अत्यंत गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना आयसीयू मध्ये दाखल केलं जातं. या विभागामध्ये त्यांच्यावर देखरेख ठेवून योग्य तो उपचार केला जातो. असे पेशंट 24 तास डॉक्टर आणि नर्सेसच्या निगराणीखाली असतात.

अशा रुग्णांना लागणारी योग्य ती सगळी उपकरणे या विभागामध्ये असतात. प्रत्येक छोट्या मोठ्या इस्पितळात ICU हा विभाग असतो. बऱ्याच वेळा ज्या रुग्णाची परिस्थिती अत्यंत गंभीर असेल किंवा ज्याचे जगण्याचे चान्सेस अत्यंत कमी असतील अशा रुग्णांना इथे डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवले जाते.

आपत्कालीन घटनेतील जास्त गंभीर जखमी रुग्णांना देखील इथे ठेवण्यात येते. त्याचबरोबर एखाद्या रुग्णाचा आजार अधिक गंभीर झाला तर अशावेळी रुग्णाला ICU मध्ये पाठवले जाते.

ज्यांचा आजार जास्त गंभीर झाला आहे, किंवा अत्यंत जखमी झालेले आहेत अशा रुग्णांच्या प्रत्येक हालचालीकडे 24 तास डॉक्टर आणि नर्स लक्ष ठेवून असतात व अशांना वाचवण्याचा प्रयत्न इथे केला जातो.

ICU ची वैशिष्ट्ये काय आहेत?

1) आयसीयू मध्ये उच्च प्रशिक्षित डॉक्टरांची एक टीम 24 तास उपलब्ध असते. एखाद्या रुग्णाची परिस्थिती जर जास्त बिकट झाली तर त्यावर उपचार करण्यासाठी हे डॉक्टर्स कायम तत्पर असतात.

2) इतर विभागापेक्षा खूप कमी बेड ICU विभागामध्ये असतात. जेणेकरून अत्यंत गरज असलेल्या गंभीर रुग्णालाच इथे दाखल केले जावे आणि येथील रुग्णांना इतर रुग्णांचा त्रास होऊ नये म्हणून देखील इथे खूप कमी बेड असतात.

3) या विभागामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना देखील खूप कमी वेळासाठी प्रवेश दिला जातो. रुग्णांची अत्यंत काळजी या ठिकाणी घेतली जाते.

4) इतर विभागात नसलेली जीवनावश्यक लागणारी सर्व उपकरणे ICU विभागात असतात.

ICU विभागातील उपकरणे :-

1) व्हेंटिलेटर :-

एखाद्या रुग्णाला जेव्हा श्वास घ्यायला देखील अडचण होते अशा वेळेस या रुग्णाला व्हेंटिलेटर वर ठेवलं जातं. हे मशीन रुग्णाला श्वास घेण्यासाठी मदत करते. अशा वेळी असे रुग्ण फक्त हो किंवा नाही असे मान हलवून संकेत देऊ शकतात.

2) हार्ट मॉनिटर :-

आयसीयू विभागातील अत्यंत महत्त्वाचं हे उपकरण आहे. रुग्णाच्या हृदयाची गती मोजण्याचं महत्त्वाचं काम हे करते. एका स्क्रीनवर रुग्णाच्या हृदयाची गती रेषेमार्फत हे उपकरण दाखवते. या रेषा वेगवेगळ्या रंगाच्या असून या समोर काही आकडेही दर्शवले जातात.

रुग्णाच्या हृदयाची गती खूप जास्त किंवा खूप कमी झाली तर हे उपकरण विशिष्ट आवाज करून याचा संकेत देते.

3) फीड ट्यूब :-

अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाला जेव्हा खाणे पिणे जमत नसेल अशा वेळेस ही फीड ट्यूब लावली जाते.

ICU मधे किती खर्च होतो?

ICU हे असं विभाग आहे जिथे रुग्णांवर 24 तास लक्ष दिले जाते व त्यांची काळजी घेतली जाते. आणि यामुळेच इतर विभागांपेक्षा आयसीयू मध्ये रुग्णांना ठेवण्याचा खर्च देखील जास्त आहे.

प्रत्येक खाजगी रुग्णालयामध्ये याचे रेट्स कमी जास्त असू शकतात. परंतु सरकारी रुग्णालयांमध्ये याची कोणतीही फी घेतली जात नाही.

जर तुमच्याकडे मेडिक्लेम असेल तर तुमचा काहीही खर्च होणार नाही. तर मला अशा आहे तुमहाला आता ICU full form in Marathi या लेखातून ICU बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. काही शंका वाटली तर खाली कंमेंट करा.

धन्यवाद.

Also Read

DNA Full Form in Marathi

ECG Full Form in Marathi

Leave a Comment