NEFT म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते? | NEFT Full form in Marathi

NEFT म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते? | NEFT Full form in Marathi

अनेकदा आपण बँकेत गेलो की आपल्याला विविध शॉर्ट फॉर्म ऐकायला मिळतात आणि त्यापैकीच एक म्हणजे NEFT होय. तर बँकिंग क्षेत्रातील NEFT नक्की काय आहे?, NEFT सुविधा देणाऱ्या बँका कोणत्या आहेत, NEFT चे फायदे काय आहेत, याचबद्दल सविस्तर माहिती आपण NEFT Full form in Marathi या लेखात पाहणार आहोत.

NEFT म्हणजे काय ।  NEFT Full Form in Marathi

NEFT शब्दाचा फुल फॉर्म हा “National Electronic Funds Transfer (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांस्फर)” असा होतो. मराठी मध्ये NEFT शब्दाचा फुल फॉर्म हा राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर असा आहे.

NEFT म्हणजे काय? ।  What is NEFT in Marathi

What is NEFT in Marathi
What is NEFT in Marathi

NEFT ही बँकिंग क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे पाठविण्याची पद्धती आहे. भारतातील NEFT सिस्टम ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून कार्यान्वित केलेली असते.  यामध्ये एका NEFT सुरू असलेल्या खात्यातून दुसऱ्या NEFT सुरू असलेल्या बँक खात्यात पैसे पाठविता येतात. आता या मध्ये एक महत्वाची गोष्ट अशी कि, NEFT पद्धतीने पैसे फक्त भारतातील बँक खात्यांमध्ये पाठविता येतात.

पैसे पाठवत असताना आपल्याला अनेकदा त्यावरील मर्यादा लक्षात घ्याव्या लागतात. मात्र NEFT च्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारावर कोणत्याही प्रकारे मर्यादा नाहीत. NEFT चे सर्व व्यवहार हे काही काळानंतर म्हणजेच टप्प्याने घडत असतात. त्यामुळे UPI इतके NEFT देवाणघेवाण ही जलद नसते. NEFT करून जेव्हा आपण पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा करतो, तेव्हा ते पैसे समोरच्या व्यक्तीच्या खात्यात पोचायला अर्धा ते २  तास इतका वेळ लागतो.

NEFT सुविधा देणाऱ्या बँक

देशातील जवळपास 100 हून अधिक बँकांमध्ये NEFT सुविधा दिली जाते. त्यामुळे ज्या बँका नोंदणीकृत आहेत त्यांच्याकडे ही सुविधा असतेच. मुख्यतः आपण NEFT व्यवहार हे मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग द्वारे करत असतो मात्र आपल्याला बँकेत जाऊन देखील NEFT करता येते.

NEFT करण्यासाठी आवश्यक माहिती

जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला NEFT करायचं असेल तर त्यासाठी त्या व्यक्ती विषयी आपल्याकडे खालील माहिती असायला हवी.

  • खातेदाराचे नाव
  • शाखेचे नाव
  • बँकेचे नाव
  • खाते प्रकार – सेविंग की करंट
  • खाते क्रमांक
  • बँकेचा IFSC

NEFT चे फायदे ।  Benefits of NEFT in Marathi

  • दिवसभरात टप्प्याने हे व्यवहार होत असल्याने जलद निधी हस्तांतरण करता येते.
  • शासकीय आणि अशासकीय कामांत फायदा होतो
  • बँकेत न जाता पैसे पाठविण्याचा व्यवहार करता येतो
  • पारदर्शक व्यवहार होतात
  • NEFT मध्ये सुरक्षा प्रणाली कडक असल्याने कोणत्याही प्रकारे गैरव्यवहार होत नाही.
  • व्यवहारावर कोणत्याही प्रकारे चार्ज (शुल्क) आकारले जात नाही

FAQ

NEFT कधी करता येते?

NEFT ही प्रक्रिया 24 तास सुरू असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या नेट बँकिंग किंवा इतर मोबाईल बँकिंग सारख्या खात्यातून NEFT कधीही करू शकता.

NEFT केल्यानंतर त्यावर काही शुल्क अर्थात चार्ज द्यावा लागतो का?

2020 पासून NEFT करत असताना कोणत्याही प्रकारे शुल्क द्यावे लागत नाही.

NEFT द्वारे भारताच्या बाहेरील बँकेत पैसे पाठविता येतात का?

नाही. NEFT द्वारे फक्त भारतातील बँक शाखेत खाते असलेल्या व्यक्तीला आणि NEFT सुरू असलेल्या बँक खात्यात पैसे पाठविता येतात.

NEFT पेक्षा वेगवान निधी हस्तांतरण सुविधा कोणती आहे?

NEFT पेक्षा RTGS ही निधी हस्तांतरण सुविधा अधिक जलद आहे. RTGS केल्यास मोठी रक्कम देखील अगदी काही सेकंद मध्ये UPI प्रमाणे पाठविता येतात.

मित्रांनो मला अशा NEFT Full form in Marathi या लेखात दिलेल्या माहिती वरून तुम्हाला NEFT संबधी संपूर्ण माहिती समजली असेल, तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की विचारा.

आमचे इतर बँकेसंबंधी चे लेख देखील नक्की वाचा

OTP full form in Marathi

ATM Full Form in Marathi

EMI Full Form in Marathi

Leave a Comment