OTP full form in Marathi | ओटीपी फुल फॉर्म इन मराठी.

आजच्या इंटरनेटच्या युगात, आपल्या मोबाईल फोनवरून आपण सगळ्या गोष्टी हाताळत असतो. भारतामध्ये यूपीआय पेमेंट आल्यापासून सर्वच जण आपल्या फोन मधून ऑनलाईन व्यवहार करू लागले आहेत. एकमेकांना पैसे पाठवणे आणि मिळवणे देखील फार सोपे झाले आहे. परंतु या सर्वांमुळे online चोरी करणे देखील फारच सोपे झाले आहे.

आपल्याला कोणताही व्यवहार करायचा असेल किंवा काही वेळेस आपल्या सोशल मीडिया एप्लीकेशन चे पासवर्ड चेंज करायचे असतील, किंवा कोणत्याही नवीन ॲप्लिकेशन वर लॉगिन / साइन अप करायचं असेल तर आपल्या मोबाईल फोनवर एक ओटीपी पाठवण्यात येतो. आणि तो OTP टाकल्यानंतर आपण पुढील प्रोसेस करू शकतो. पण मित्रांनो तुम्हाला या OPT माहिती आहे का? आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला OTP full form in Marathi त्याचबरोबर ओटीपी बद्दल इतर अनेक माहिती सांगणार आहोत.

OTP full form in Marathi | ओटीपी फुल फॉर्म इन मराठी

OTP म्हणजेच “One Time Password”. मराठी भाषेमध्ये तुम्ही याला “एका वेळेसाठीचा पासवर्ड” असे म्हणू शकता.

OTP म्हणजे नेमकं काय?

​OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड. मित्रांनो हा एक प्रकारचा सुरक्षा कोड आहे. मुख्यतः ऑनलाइन व्यवहारांसाठी या युनिक कोड चा वापर केला जातो. एखाद्याला पैसे पाठवणे असो, किंवा बँकेचा एखादा ऑनलाइन व्यवहार करणे डेबिट किंवा कार्डद्वारे पैसे पाठवणे, इत्यादी सर्व गोष्टींसाठी ओटीपी ने verify करणे फार महत्त्वाचे असते. आपण रिक्वेस्ट केल्यानंतर हा ओटीपी मेसेज स्वरूपात आपल्या मोबाईल फोनवर येतो. 4 ते 8 आकडी स्वरूपाचा हा ओटीपी फक्त काही काळासाठी वैध असतो. प्रत्येक वेळी हा ओटीपी बदलत असतो. याला तुम्ही सिक्युरिटी पासवर्ड असे देखील म्हणू शकता.

OTP चा फायदा किंवा गरज

इंटरनेटच्या या जमान्यात आपल्या सर्व काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या मोबाईल मध्ये स्टोअर आहेत. आपला महत्त्वाचा डेटा चोरी होण्याची दाट शक्यता असते. OTP हा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा आहे. तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असेल किंवा ऑनलाईन बँकेचे व्यवहार करायचे असतील तर OTP मुळे ते सहज आणि सुरक्षितरीत्या पार पडतात.

एखाद्या व्यक्तीकडे तुमचे नाव / युजर आयडी आणि पासवर्ड असेल तरीसुद्धा तो तुमच्या बँक खात्यातील रक्कम देऊ शकत नाही. कारण यासाठी ओटीपी व्हेरिफिकेशन होते आणि हा पासवर्ड तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल फोन मध्येच येऊ शकतो.

आजकाल गुगल देखील आपल्या युजर्स साठी ओटीपी व्हेरिफिकेशन ठेवतो जेणेकरून युजर्सचा डेटा सुरक्षित राहू शकेल. हा ओटीपी फार कमी काळ वैध असल्या कारणाने आपल्या खात्याची सुरक्षितता अजून वाढते.

OTP शेअर करावा की नाही?

OTP हा तुमचा वन टाइम पासवर्ड असून एक unique code असतो जो कधीही कुणालाही सांगू नये. असे केल्यास तुमच्या खात्यातील सर्व रक्कम लंपास होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला कोणत्या बँकेतून कॉल आला आणि ओटीपी साठी मागणी करण्यात आली तरी देखील ओटीपी शेअर करू नका. कारण कोणत्याही बँकेचा कोणताही अधिकारी तुम्हाला ओटीपी साठी मागणी करू शकत नाही.

निष्कर्ष 

मला अशा आहे तुम्हाला आता OTP full form in Marathi लेखामधून OPT महत्व समजले असेल. आजकाल सायबर क्राईम चा धोका वाढत चालला आहे यासाठीच आपण सर्वांनी दक्ष राहणे फार गरजेचे आहे. आणि म्हणूनच ई-मेल मेसेज किंवा इतर कुठेही आलेला ओटीपी कोणालाही शेअर करू नये. तुम्हाला काही शंका असतील तर खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा.

Leave a Comment