अलीकडच्या काळात BTS हे नाव तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकले असेल. आजच्या युगातील बरेच तरुण-तरुणी या BTS चे फॅन आहेत. आपल्या Instagram च्या बायो मध्ये देखील BTS LOVER, किंवा BTS आर्मी असे लिहितात. परंतु हे बी टी एस म्हणजे नेमकं काय आहे आणि या BTS चा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला BTS full form in Marathi त्याचबरोबर इतरही माहिती देणार आहोत.
BTS full form in Marathi | बी टी एस फुल फॉर्म इन मराठी
BTS म्हणजे “Bangtan Sonyeondan”. बीटीएस हा दक्षिण कोरियाचा एक म्युसिकल बँड ग्रुप आहे. दक्षिण कोरियन भाषेमध्ये Bangtan sonyeondan म्हणजेच “बुलेटप्रूफ स्काऊट्स” होय. संपूर्ण जगभरामध्ये या बँड ग्रुपचे चाहते आपल्याला बघायला मिळतात. खूपच कमी वेळामध्ये जगप्रसिद्धी या बँड ग्रुपने मिळवली आहे.
BTS बद्दल अधिक माहिती
हा एक कोरियन मुलांचा बँड ग्रुप असून यामध्ये 7 मुलांचा समावेश आहे. 2013 साली या सात जणांनी मिळून दक्षिण कोरियाच्या सियाल मध्ये BTS बँड सुरु केला. सुरुवातीच्या काळात त्याला खूप स्ट्रगल करावा लागला. पण हळूहळू त्यांच्या गाण्यांद्वारे त्यांनी यशाचे शिखर गाठले. स्वतःवर प्रेम करा या अल्बम मधून त्यांनी तरुणांना संदेश दिला.
तरुणांना प्रेरित करणारे संगीत आणि हृदयस्पर्शी गीते त्यांनी बनवली. BTS ग्रुपची मुख्यतः सर्व गाणी ही कोरियन भाषेमध्ये आहेत. तरी देखील आज जगभरात त्यांचे करोडो चाहते आहेत.
BTS सदस्यांची नावे
या ग्रुपमध्ये टोटल सात सदस्य असून त्यातील तीन जणांना त्यांच्या खऱ्या नावाने ओळखले जाते. Jin, Jimin, आणि Jungkook. तर इतर चार सदस्यांना त्यांच्या स्टेजवरील नावांवर ओळखले जाते. RM (real me), J-hope, Suga आणि V. RM म्हणजेच किम नामजून हा या ग्रुपचा लीडर आहे.
बीटीएस एवढे प्रसिद्ध का आहेत
1) बी टी एस हा ग्रुप स्वतः गाणी लिहितो, स्वतः संगीत देऊन त्यावर ते डान्स देखील करतात.
2) त्यांची प्रत्येक गाणी ही अर्थपूर्ण, तरुणांना प्रेरणा देणारी , याचबरोबर सामाजिक विषयाला हात घालणारी गाणी आहेत.
3) प्रसिद्धी मिळवल्यानंतर देखील हा ग्रुप खूपच नम्र आहे. आजूबाजूच्या माणसांशी, चाहत्यांशी देखील ते खूपच नम्रपणे संवाद साधतात.
4) संगीत ही एक भाषा आहे, आणि बीटीएस ची मुख्यतः गाणी ही कोरियन भाषेत असूनही आज जगभरातील लोकांना ती ऐकायला आवडतात.
5) Youtube ला सर्वाधिक पाहिलेली गाणी ही बीटीएस ची आहेत. डायनामाइट, फेक लव, माइक ड्रॉप, आयडॉल, ही बी टी एस ची काही गाजलेली गाणी आहेत.
6) BTS बँड हा त्याच्या चाहत्यांना एक कुटुंब मानतो, व त्यांच्या यशाचे सर्व श्रेय हे चाहत्यांना देतो. त्यांच्या भाषणामध्ये ते दर वेळेस त्यांच्या समर्थकांचा उल्लेख करतात, त्यांचा हाच साधेपणा आज लाखो लोकांची मने जिंकत आहे.