ITI full form in Marathi | आयटीआय फुल फॉर्म इन मराठी

ITI बद्दल आपल्या सर्वांनी नक्कीच कुठे ना कुठेतरी ऐकले किंवा वाचले असेल. बऱ्याच वेळा आपल्याला समजतं की आपल्या नातेवाईकांपैकी कोणी तरी आयटीआय केला आणि आता तो चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे. परंतु तुम्हाला ITI चा फुल फॉर्म ठाऊक आहे का?

आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला ITI full form in Marathi त्याचबरोबर आयटीआय म्हणजे काय? आय टी आय साठी पात्रता? ITI साठी किती fees लागते? इत्यादी माहिती जाणून घेणार आहोत.

ITI full form in Marathi | आय टी आय फुल फॉर्म इन मराठी

ITI म्हणजे Industrial Training Institute”. मराठी भाषेमध्ये याला “औद्योगिक प्रशिक्षण संस्था” असे म्हटले जाते.

ITI म्हणजे काय?

आयटीआय म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था. भारतीय सरकार अंतर्गत स्थापन करण्यात आलेली ही एक संस्था आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय शिक्षणानंतर विविध उद्योगांचं प्रॅक्टिकल नॉलेज पुरवले जाते.

ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी नंतर पुढील शिक्षणामध्ये रस नसेल असे विद्यार्थी आयटीआय करून विविध उद्योगांचं तांत्रिक ज्ञान प्राप्त करू शकतात. दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगार आणि प्रशिक्षण मिळावे यासाठी महासंचालनालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने ITI ची स्थापना केलेली आहे.

संपूर्ण भारतामध्ये या संस्था आहेत, त्याचबरोबर आयटीआयची अनेक खाजगी आणि शासकीय कॉलेजेस आहेत, जिथे विद्यार्थ्यांना ITI च्या ट्रेड्सचे प्रशिक्षण दिले जाते.

ITI साठी लागणारी पात्रता

भारतामध्ये हजारो कंपन्या अशा आहेत जिथे कुशल आणि हुशार कामगारांची दिवसेंदिवस गरज भासत आहे. आयटीआय केल्यानंतर तुम्हाला रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. त्यासाठी लागणारी पात्रता आपण आता जाणून घेऊ.

1) इयत्ता दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही आयटीआय साठी प्रवेश घेऊ शकता.

2) आयटीआयच्या काही ट्रेड साठी तुम्ही इयत्ता आठवी नंतर देखील प्रवेश घेऊ शकता.

3) प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्याचे वय 14 वर्षांपेक्षा कमी नसावे.

4) आयटीआय ला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

ITI साठी किती फीज आहे?

अभियांत्रिकी साठी लागणाऱ्या फीस पेक्षा तर आयटीआय चे फीज नक्कीच कमी आहे. विविध राज्यांमध्ये विविध फीज असू शकते. तुम्ही आयटीआय साठी कोणता कोर्स निवडत आहात यावर तुमचे फीस सर्वस्वी अवलंबून आहे.

महाराष्ट्र मध्ये नॉन इंजीनियरिंग ट्रेड साठी ही फी 3000 ते 7000 च्या मध्ये आहे तर इंजीनियरिंग ट्रेड साठी ही फी 1700 पासून 79000 हजार एवढी आहे.

ITI मधून तुम्ही कोणते ट्रेड्स करू शकता?

आयटीआय मध्ये जवळपास 100 ट्रेड्स उपलब्ध आहेत तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हवा तो ट्रेड तुम्ही निवडू शकता. सर्वात जास्त निवडले जाणारे काही ITI ट्रेड आम्ही खाली देत आहोत.

  • Electrician
  • Fitter
  • Welder
  • Carpenter
  • Bookbinder
  • Plumber
  • Pattern maker
  • Diesel mechanical
  • Wireman
  • Mechanical
  • Pump Operator
  • Computer Operator and programming

निष्कर्ष –

मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण ITI full form in Marathi, त्याचबरोबर ITI बद्दलची इतर माहिती जाणून घ्यायला तुम्हाला मदत झाली असेल. तुम्हाला आमचा हा आर्टिकल कसा वाटला याबद्दल कॉमेंट बॉक्स मार्फत नक्की कळवा. आणि हा लेख तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा.

Leave a Comment