JCB full form in Marathi | जेसीबी फुल फॉर्म इन मराठी

बऱ्याच वेळा रस्त्यावरून जाताना किंवा प्रवासामध्ये तुम्ही एक पिवळ्या रंगाची मोठी गाडी, साधारण ट्रॅक्टर सारखी दिसणारी गाडी तुम्ही नक्कीच बघितली असेल. मुख्यतः खोदकाम करण्यासाठी या गाडीचा वापर होतो हे तुम्हाला ठाऊक असेल. सर तुम्ही नीट लक्ष देऊन पाहिलं तर या गाडीवर मोठ्या अक्षरात JCB लिहिलेले असते. परंतु या JCB चा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का?

आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला JCB full form in Marathi, त्याचबरोबर JCB म्हणजे काय, JCB मशीनची भारतातली किंमत, JCB चा इतिहास सांगणार आहोत.

JCB full form in Marathi | जेसीबी फुल फॉर्म इन मराठी

JCB म्हणजे “Joseph Cyril Bamford” मराठी भाषेमध्ये आपण याला “जोसेफ सिरील बामफोर्ड” असे म्हणू शकतो.

JCB म्हणजे काय?

JCB हे एका कंपनीचे नाव असून,कंपनीने त्यांच्या एका मशीनला JCB हे नाव दिले आहे. या मशीन ला बैकहो लोडर असे देखील म्हटले जाते. 2003 पूर्वी भारतामध्ये या कंपनीला Escorts JCB Private Limited असे नाव देण्यात आले होते. परंतु 2003 नंतर हे नाव बदलून, JCB India Private Limited असे नाव ठेवण्यात आले.

JCB ही एक ब्रिटिश बहुराष्ट्रीय कंपनी असून बांधकामांसाठी लागणारे मशीन तयार करते. उत्खनन करण्यासाठी महत्त्वाचे समजले जाणारे बॅकहाँ लोडर ही कंपनी तयार करते.

भारत तथा जगभरामध्ये अशा अनेक कंपन्या आहेत ज्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलर चे मॅन्युफॅक्चरिंग करतात. अगदी त्याचप्रमाणे जेसीबी ही कंपनी बांधकाम, खोदकाम आणि उत्खननासाठी उपयुक्त अशा मशीन तयार करते. यालाच बॅकहाँ लोडर असे म्हणतात. ही मशीन चालवण्यासाठी चालकाकडे देखील विशेष कौशल्य असणे गरजेचे असते.

या मशीनमध्ये एक स्टेरिंग विल, तर दुसऱ्या बाजूला क्रेन सारखे लिव्हर असतात. टनक वस्तू सहजपणे ही मशीन फोडू शकते. या मशीनला दोन्ही साईडला स्टेबलाइजर लेग असल्यामुळे डोंगराळ खडकाळ भागात देखील ही मशीन सहज काम करू शकते.

JCB मशीन चे महत्व आणि फायदे

JCB च्या सहाय्याने मोठी कामे देखील सहजपणे पार पडतात. जेसीबीच्या वापरामुळे आपला वेळ आणि खर्च या दोन्ही गोष्टींमध्ये बचत होते. शेकडो माणसांचे काम जेसीबी मशीन करू शकते.

जेसीबी मशीन ही खूप मजबूत आणि शक्तिशाली आहे. रस्त्याची कामे करणे , खोदकाम करणे, जुन्या इमारती पाडणे, एखादी जड वस्तू उचलणे इत्यादी महत्त्वाच्या कामासाठी या मशीनचा उपयोग केला जातो.

कुठलीही माती किंवा खडकाळ रस्त्यावरती देखील ही मशीन सहजपणे काम करते.

भारतामध्ये JCB ची किंमत किती आहे?

लोकांच्या गरजा लक्षात घेऊन या कंपनीने वेगवेगळ्या प्रकारची बरीच उत्पादने मार्केटमध्ये आणलेली आहेत. जेसीबीची भारत तथा जगभरातील किंमत तुम्ही कोणती मशीन घेत आहात यावर डिपेंड करते.

भारतामध्ये या मशीनची सरासरी किंमत 10 लाख रुपये ते 50 लाख रुपयांपर्यंत आहे.

Leave a Comment